शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

४० हजार घरांचा आकडा नेमका आला कोठून? लोकप्रतिनिधींनी ठेवले प्रशासनाच्या मर्मावर बोट

By मुजीब देवणीकर | Updated: August 22, 2023 14:29 IST

४० हजार घरांचे काय झाले? प्रशासनाच्या मर्मावरच बोट ठेवल्याने प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची पंचाईत झाली

छत्रपती संभाजीनगर : पंतप्रधान आवास योजनेंतर्गत ४० हजार घरे बांधण्यात येणार होती. त्याचे नेमके काय झाले? ७ वर्षे उलटल्यानंतर योजनेतील एकही घर का तयार झाले नाही? ४० हजार घरांचा आकडा नेमका आला कोठून? असे अनेक प्रश्न सोमवारी दिशा समितीच्या बैठकीत लोकप्रतिनिधींनी उपस्थित केले. प्रशासनाच्या मर्मावरच बोट ठेवल्याने प्रश्नांची उत्तरे देताना अधिकाऱ्यांची पंचाईत झाली. १ सप्टेंबर रोजी खास या विषयावर बैठक होईल.

स्मार्ट सिटी कार्यालयात सोमवारी दिशा समितीची बैठक घेण्यात आली. बैठकीस जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय, मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. महापालिकेमार्फत राबविण्यात येत असलेल्या पंतप्रधान आवास आणि नवीन पाणीपुरवठा या दोन योजनांच्या कामांचा आढावा घेण्यात आला. देशभरात आवास योजना यशस्वीपणे राबविण्यात आली. छत्रपती संभाजीनगरात नेमके काय झाले, असा प्रश्न करण्यात आला. योजनेसाठी मनपाला १२६ हेक्टर जागा देण्यात आली, ९० हेक्टर जागा निरुपयोगी असून, ३६ हेक्टर जागेवरच घरे विकसित केली जाणार असल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.

ईडी चौकशीची चर्चाविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी आवास योजनेत ईडीमार्फत चौकशी केली जात आहे. या चौकशीचे नेमके काय झाले, असा प्रश्न उपस्थित केला. कंत्राटदाराने एकाच आयपी ॲड्रेसवरून निविदा भरल्याप्रकरणी सिटी चौक ठाण्यात गुन्हा दाखल आहे. अधिकाऱ्यांवर कारवाई नाही, असे मनपा प्रशासकांनी सांगितले.

४० हजार घरेच का?आवास योजनेत ४० हजार घरे बांधण्याचे निश्चित झाले. हा आकडा कोठून आला? योजनेतील घराच्या किमती कशा ठरविणार? ही घरे गोरगरिबांना परवडतील का? अशा प्रश्नांची सरबत्ती लोकप्रतिनिधींनी केली. एकही प्रश्नाचे उत्तर अधिकाऱ्यांना देता आले नाही.

बोगस लाभार्थ्यांचे पुरावेआवास योजनेत एका एजन्सीची नियुक्तीसाठी जाहिरात काढली. लाभार्थी शोधण्यासाठीही जाहिरात दिली. अन्य एका एजन्सीने पैसे घेतले. बोगस लाभार्थींच्या बँक खात्यावर पैसे जमा झाले, असा आरोप लोकप्रतिनिधींनी केला. याचे पुरावे असल्याचे सांगितले, पण अधिकाऱ्यांनी मौन बाळगले.

महामेट्रोचा डीपीआरस्मार्ट सिटीने महामेट्रोला डीपीआर तयार करण्यासाठी साडेसात कोटी रुपये मंजूर केले. हे बिल अद्याप दिले नाही. महामेट्रोने राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाचे ना हरकत प्रमाणपत्र न घेताच डीपीआर तयार केला. त्यामुळे या डीपीआरला राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पाने परवानगी नाकारली. महामेट्रोला साडेसात कोटी रुपये देण्याची परवानगी न घेताच बिल कसे काढणार, असा सवाल करण्यात आला.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका