शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
“राज ठाकरे ज्यांच्या प्रचारासाठी जातात तो उमेदवार पडतोच”; ठाकरे गटाचा खोचक टोला
4
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
5
MS Dhoni चा त्रिफळा उडवताच हर्षल पटेलनं केलं असं काही; निराश फॅन्सची जिंकली मनं
6
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
7
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
8
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
9
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
10
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
11
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
12
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
13
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
14
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
15
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
16
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
17
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
18
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
19
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
20
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण

दोस्त दोस्त ना रहा...; ४ वर्ष एटीएम वापरत मित्राला १ लाख ८० हजाराला फसविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2018 7:58 PM

बँकेकडून पोस्टाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड व चेक बुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. यानंतर सलग ४ वर्षे ते वापरत त्यातून १ लाख ८० हजार रुपये परस्पर खात्यातून काढून घेतल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली.

ठळक मुद्देकौतिक देवराव पांडे यांना आयसीआयसीआय बँकेने पोस्टाद्वारे एटीएम कार्ड व चेकबुक २०१४ मध्ये पाठविले होते.पांडे यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांचे मित्र शिवाजी भिका शेळके याने पोस्टातून सोडवून घेतले.

अजिंठा (औरंगाबाद ) : बँकेकडून पोस्टाद्वारे आलेले शेतकऱ्याचे एटीएम कार्ड व चेक बुक मित्राने परस्पर सोडवून घेतले. यानंतर सलग ४ वर्षे ते वापरत त्यातून १ लाख ८० हजार रुपये परस्पर खात्यातून काढून घेतल्याची घटना तालुक्यातील वडाळा येथे घडली. शेतकऱ्याची फसवणूक केल्याप्रकरणी एका आरोपी मित्राविरुद्ध अजिंठा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. फसवणूक झालेल्या शेतकऱ्याचे नाव कौतिक देवराव पांडे (रा. वडाळा) असे असून फसवणूक करणाऱ्या मित्राचे नाव शिवाजी भिका शेळके (रा. वडाळा) असे आहे.

कौतिक देवराव पांडे यांना आयसीआयसीआय बँकेने पोस्टाद्वारे एटीएम कार्ड व चेकबुक २०१४ मध्ये पाठविले होते. पांडे यांचा अशिक्षितपणाचा फायदा घेत त्यांचे मित्र शिवाजी भिका शेळके याने पोस्टातून सोडवून घेतले. १९ सप्टेंबर, १४ ते २१ फेब्रुवारी २०१८ या दरम्यान त्या एटीएम कार्ड व चेकबुकद्वारे शिवाजीने सुमारे १ लाख ८० हजार रुपये परस्पर काढून घेतले.

शेती विकून भरले कर्जशेतकरी  कौतिक देवराव पांडे यांनी सिल्लोड येथील आयसीआयसीआय बँकेतून २ वर्षांपूर्वी दीड लाख रुपये कर्ज घेतले होते. घरची परिस्थिती हलाखीची असल्याने व शेतीत उत्पन्न न झाल्याने या शेतकऱ्याने शेती विकून बँकेचे कर्ज भरले. त्यानंतर बँकेने पुन्हा त्यांना कर्ज दिले. कर्जाचे पैसे सेव्हिंग अकाउंटवर जमा केले. कर्ज मंजूर करण्यासाठी सदर आरोपी बँकेत त्यांच्यासोबत येत होता. त्यामुळे त्याला सर्व माहिती होती. त्याचा गैरफायदा त्याने घेतला असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश बिरादार यांनी दिली.

बँक कर्मचाऱ्याला आला संशय सदर शेतकरी अशिक्षित आहे. कर्जाची रक्कम परस्पर खात्यातून निघत आहे. एटीएम शेतकऱ्याला वापरता येत नाही व पैसे गायब होत आहेत. यामुळे बँक कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यास घरी जाऊन विचारणा केली, तेव्हा मी पैसे काढलेच नाही. याची चौकशी करा अशी मागणी शेतकऱ्याने केली. बँक अधिकारी व शेतकऱ्यांनी अजिंठा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी सर्व एटीएमचे सीसीटीव्ही फुटेज तपासले व शेतकऱ्यास दाखविले. त्यावरून मित्रानेच घात केल्याचे समोर आले व पोलिसांनी आरोपीस जेरबंद केले. 

आरोपीला पोलीस कोठडी या प्रकरणी पांडे यांनी सायबर सेल विभागाकडे तक्रार अर्ज केला होता. या तक्रारीच्या अनुषंगाने सायबर सेल विभागाचे पोलीस उपनिरिक्षक सय्यद मोहसीन अली अझर अली यांनी शुक्रवारी अजिंठा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून शिवाजी भिका शेकळे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. सदर आरोपीला सिल्लोड न्यायालयाने १६ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी दिली असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक किरण आहेर यांनी दिली. पुढील तपास पोलीस उपविभागीय अधिकारी गणेश बिराजदार, सपोनि. किरण आहेर, बीट जमादार अनंत जोशी, दीपक भंगाळे, समद शेख करीत आहेत.

आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्याकितीही जवळचा व्यक्ती असो त्यावर विश्वास ठेवू नका. काळजीपूर्वक एटीएम व चेकबुक हाताळा. आॅनलाईन व्यवहार करताना काळजी घ्या.- गणेश बिरादार, उपविभागीय पोलीस अधिकारी 

टॅग्स :atmएटीएमbankबँकtheftचोरीArrestअटकPoliceपोलिस