शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

फुकट कचोरी दिली नाही, गुन्हेगारांचा नारळीबागेत राडा; व्यावसायिकावर प्राणघातक हल्ला

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2025 20:04 IST

पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर पुन्हा गुंडांना नेत भावावरही केला हल्ला, एकाला अटक, तिघे पसार

छत्रपती संभाजीनगर : स्वत:ला परिसराचा दादा म्हणत, खाल्लेल्या कचोरीचे शंभर रुपये न देता, व्यावसायिकावर दोन गुंडांनी प्राणघातक हल्ला केला. या प्रकरणी व्यावसायिक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाताच, पुन्हा याच टोळीने त्यांच्या भावावर हल्ला चढवत जीवे मारण्याची धमकी देत, राडा केला. नारळीबाग परिसरातील शेगाव कचोरी सेंटरवर १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ही घटना घडली.

आकाश हाडुळे, संताेष भिसे आणि प्रथमेश भल्हाळ (सर्व रा.नारळीबाग) अशी गुंडांची नावे असून, त्यांच्यावर सिटीचौक पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल करण्यात आले. नामदेव कराडे (२५, रा.पडेगाव) यांची नारळीबागेत शेगाव कचोरी सेंटर आहे. १० ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता ते हॉटेलमध्ये असताना आराेपी आकाश मित्रासह तेथे गेला. शंभर रुपयांच्या कचोरी खाऊन पैसे न देताच निघाला. कराडेने त्याला बिलाचे पैसे मागितले. मात्र, आकाश हाडुळेने ‘तू मला पैसे कसे मागतो, मी इथला दादा आहे,’ असे म्हणत शिवीगाळ केली. कराडेने त्याकडे दुर्लक्ष करत निघून जाण्यास सांगितले. मात्र, तरीही त्याने त्यांच्या दुकानातील झाऱ्याने त्यांच्यावर हल्ला चढवला. लाकडी दांडा आणत त्यांच्यासह त्यांच्या भावाला गंभीर मारहाण केली, शिवाय तू इथे धंदा कसा करतो, हेच पाहतो, अशीही धमकी दिली.

यापूर्वी गंभीर गुन्हे दाखल, अटकहीकराडे हे रुग्णालयात उपचार घेऊन सिटीचौक पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी गेले. या दरम्यान, कराडेंचा भाऊ संतोष दुकान बंद करण्यासाठी परत गेला, तर आकाश, संतोष भिसे, प्रथमेश भल्हाळने तेथे जाऊन पुन्हा हल्ला चढवला. पोलिसांकडे तक्रार का केली, असे म्हणत डोक्यात दांड्याने वार करत जीवे मारण्याची धमकी देत, भर रस्त्यावर धिंगाणा घातला. सिटीचौक पोलिस ठाण्याच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षक निर्मला परदेशी यांनी आरोपींवर दोन गुन्हे दाखल केले. त्यानंतर, उपनिरीक्षक संजय राठोड यांनी आकाशला तत्काळ अटक केली. त्याला अटक होताच, अन्य गुंड पळून गेले. आकाशवर यापूर्वी गंभीर गुन्हे असून, गंभीर कारवाई केली जाणार असल्याचे उपनिरीक्षक राठोड यांनी सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Free Kachori Refusal Sparks Gang Violence; Shopkeeper Attacked in Narlibag

Web Summary : Refusing free food, gangsters attacked a shopkeeper in Narlibag, Aurangabad. They assaulted him and his brother for reporting the crime. Police arrested one accused, while others fled. Serious charges were filed.
टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी