शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेच्या पंतप्रधान आवास योजनेत मोफत घर नाही, कंत्राटदाराला कार्यारंभ आदेश दिले

By विकास राऊत | Updated: December 28, 2023 20:05 IST

घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे.

छत्रपती संभाजीनगर : महापालिका राबवित असलेल्या पंतप्रधान आवास योजनेतून एकही घर मोफत दिले जाणार नाही, असे मनपा प्रशासक जी. श्रीकांत यांनी स्पष्ट केले. घरकुल योजनेसाठी कंत्राटदारांना कार्यारंभ आदेश देण्यात आला आहे. बिल्डिंग प्लॅन सादर झाल्यानंतर तातडीने कंत्राटदाराला बांधकाम परवानगी देण्याची कार्यवाही केली जाईल, असेही प्रशासकांनी सांगितले.

घरकुल योजनेतून पडेगाव, तिसगाव, हर्सूल, सुंदरवाडी या ठिकाणी साधारणपणे ११ हजार २०० घरे बांधली जाणार आहेत. घरकुल बांधण्यासाठी पाच कंत्राटदार एजन्सींना कार्यारंभ आदेश (वर्क ऑर्डर) देण्यात आला आहे.मध्यंतरी घरकुल योजनेतून मोफत घरे मिळणार असल्याची अफवा सोशल मीडियात व्हायरल झाली होती. ही अफवा पसरताच मनपामध्ये विचारणा करण्यासाठी नागरिकांची गर्दी झाली होती. यासंदर्भात प्रशासक जी. श्रीकांत म्हणाले, प्रधानमंत्री घरकुल योजनेतून एकही घर मोफत मिळणार नाही. घरकुल योजनेसाठी अडीच लाख रुपये शासनाकडून मिळणार आहेत. त्यामुळे हे घरकुल साधारणपणे ६ ते ७ लाख रुपयांत मिळेल, असेही प्रशासकांनी स्पष्ट केले.

योजनेसाठी कंत्राटदारांनी बिल्डिंग प्लॅन तयार करून बांधकाम परवानगीसाठी नगररचना उपसंचालक कार्यालयाकडे सादर केल्यास त्यास तातडीने परवानगी दिली जाईल. बांधण्यासाठी साधारणपणे वर्षभराचा कालावधी लागेल. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांची यादी तयार करून त्यांना कोणत्या भागात घरकुल पाहिजे, यासाठी अर्ज घेतले जातील. ज्या भागात घरकुलासाठी कमी अर्ज प्राप्त झाले, तेथे सरळ घरांचे वाटप केले जाईल. काही ठिकाणी जास्त अर्ज प्राप्त झाले तर सोडत काढून वाटप होईल, असेही प्रशासक म्हणाले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका