शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics : सांगलीत जयंत पाटलांना धक्का! अण्णासाहेब डांगे यांनी सोडली साथ; भाजपामध्ये केला प्रवेश
2
ट्रम्प सत्य सांगतील, म्हणून PM मोदी त्यांचे नाव घेत नाहीत; राहुल गांधींची बोचरी टीका
3
लडाख: गलवान खोऱ्यात लष्करी वाहनावर दरड कोसळली, २ जवान शहीद, ३ जण गंभीर जखमी
4
निखिल रविशंकर यांच्या हाती एअर न्यूझीलंडची धुरा; कोण आहेत ते? जाणून घ्या अधिक माहिती
5
शौचालयात गेलेला मुलगा बाहेर येईना, घरच्यांनी दार तोडलं अन् समोर भयंकर दिसलं!
6
Sheetala Saptami 2025: आज रात्री थोडा जास्तच स्वयंपाक करा, कारण उद्या आहे शितला सप्तमी!
7
PM मोदींवर कारवाई करण्यास निवडणूक आयोगाची टाळाटाळ, हायकोर्टात जाणार- पृथ्वीराज चव्हाण
8
रतन टाटांच्या कंपनीचे शेअर्स आपटले! बँक निफ्टीही घसरला! पण L&T ने घेतली भरारी!
9
दिग्गज शास्त्रज्ञ आइन्स्टाईन यांचा जगप्रसिद्ध प्रयोग चुकीचा होता; MIT च्या शास्त्रज्ञांनी केलं सिद्ध!
10
निवृत्तीच्या २ दिवस आधी दया नायक यांना ACP पदावर बढती, गुरुवारी होणार रिटायर
11
Health Tips: मांड्यांचा आतला भाग काळवंडलाय? करा डॉक्टरांनी सांगितलेला घरगुती उपाय
12
'काळजीपूर्वक ऐका, मोदी-ट्रम्प यांनी चर्चा केली नाही'; राज्यसभेत एस जयशंकर संतापले
13
England Playing XI 5th Test : इंग्लंडला मोठा धक्का; या कारणामुळे कर्णधार बेन स्टोक्स प्लेइंग इलेव्हनमधून OUT
14
शाब्बास पोरा! शिक्षणासाठी केली फूड डिलिव्हरी, मजुराचा लेक होणार मोठा सरकारी अधिकारी
15
रिलायन्स जिओचा ५२,००० कोटींचा 'महा-आयपीओ'! मुकेश अंबानी आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडणार?
16
सर्वत्र कर्मचारी कपात होत असतानाच 'ही' दिग्गज IT कंपनी करतेय हायरिंग; हजारो ग्रॅज्युएट्सना देणार संधी
17
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
18
ICC Rankings : अभिषेक शर्मा टी-२० चा नवा किंग; जड्डू टेस्टमधील बेस्ट ऑलराउंडर
19
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
20
५ वर्षांत ३०००% रिटर्न, पहिल्या तिमाहित नफाही दुप्पट; आता लागलं अपर सर्किट, ऑर्डर बुकही मजबूत

ना खत, ना फवारणी; पावसाळ्यात रानभाज्या खा, तब्येत होईल सोन्यावानी!

By प्रशांत तेलवाडकर | Updated: July 13, 2023 17:30 IST

मेथी, शेपू, पालक भाज्या खाऊन ‘वीट’ आला; मग खा ‘रानभाज्या ’

छत्रपती संभाजीनगर : वर्षभर मेथी, शेपू, पालक, करडी या पालेभाज्या खाऊन तुम्हाला ‘वीट’ आला आहे? जिभेला तोडी वेगळी चव पाहिजे? मग, विचार कसला करता? पावसाच्या आगमनासोबत भाजीमंडईत ‘रानभाज्या’ विक्रीला येऊ लागल्या आहेत. शहरवासीयांना ‘रानभाज्यां’चे औषधी गुणधर्म कळाल्याने, मिळेल त्या भावात ‘रानभाज्या’ खरेदीची तयारी त्यांनी ठेवली आहे. यामुळे ‘करटुले’ चक्क ३०० रुपये किलोने विकले जात आहे.

कुठून येतात रानभाज्या?पावसाळा सुरू झाला की, रानभाज्या उगवायला सुरुवात होते. विशेष म्हणजे अलीकडील काळात जिल्ह्यातील २५ ते ३० शेतकरी रानभाज्यांची शेती करीत आहेत. या रानभाज्या नैसर्गिक पद्धतीने उगवल्या जातात. लागवड न करता या भाज्या येतात. त्यांना बियाणे लागत नाही, रासायनिक खताचा वापर केला जात नाही. कीटकनाशक वापरले जात नाही. डोंगरदऱ्यांत, शेताच्या बांधावर, माळरानात त्या येतात.

तब्बल ९३ प्रकारच्या रानभाज्यामहाराष्ट्रात ९३ प्रकारच्या रानभाज्या आढळतात. त्यातील मोजक्याच भाज्या तुरळक प्रमाणात बाजारात विक्रीला येतात. करटुले, तांदूळजा, रान तोंडोळी, भुई पालक, रानशेपू, कुर्डू, माटला, करटोली, घोळ, आंबुशीकुुर्डू, केना, सुरण, दिंडा, फांदा, पाथ्री, भुईआवळील, कपाळफोडी, तरोटा, आगडा, उबर, चिमुर, सराटे, मयाळू तेर आळू, रान माठ, हरभऱ्याची कोवळी पाने आदी भाज्यांचा त्यात समावेश असतो.

रानभाज्या महोत्सवामुळे शहरात जनजागृतीकृषी विभागाच्या वतीने मागील काही वर्षांपासून नियमितपणे जुलै-ऑगस्ट दरम्यान ‘रानभाज्या महोत्सव’ भरविला जात आहे. त्यात जिल्ह्यातील २५ ते ३० शेतकरी त्यांच्या भागातील रानभाज्या विक्रीसाठी घेऊन येतात. महोत्सवाच्या माध्यमातून कृषी विभागाने ‘रानभाज्यां’चे महत्त्व नागरिकांना पटवून दिल्याने रानभाज्या खरेदी करणारा एक ग्राहकवर्ग शहरात तयार झाला आहे.

१) देशात १४५ कंद, ५२९ हिरव्या भाज्या तर १०१ फुलभाज्यांचे प्रकार आहेत.२) देशात ६४७ प्रकारच्या फळभाज्या आहेत.३) महाराष्ट्रातील मुख्य आदिवासी जमाती २५ प्रकारच्या रानभाज्यांचा उपयोग करतात.४) आरोग्यवर्धक, शक्तीवर्धक, त्रिदोषहारक असे रानभाज्यांचे फायदे आहेत.५) १४ वनस्पतींचा मधुमेह, पोटदुखी, खोकला आदींवर औषधी म्हणून वापर होतो.६) काही रानभाज्या गर्भवती आणि बालकांसाठी उपयुक्त मानल्या जातात.७) शहरातील भाजीमंडईत बोटावर मोजण्याइतक्याच रानभाज्या विक्रीला येतात.८) श्रावणात रानभाज्यांची आवक वाढते.

टॅग्स :FarmerशेतकरीRainपाऊसAurangabadऔरंगाबाद