शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात ७९ ठिकाणी शेतकरी भवन उभारणार; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ८ महत्त्वाचे निर्णय
2
दही, दूध, लोणी घागर भरूनी...! सर्व स्वस्त झाले, या मोठ्या डेअरीने GST कपातीपूर्वीच घोषणा केली
3
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये मसूद अझहरच्या कुटुंबाचे काय झाले? जैश कमांडर म्हणाला, 'तुकडे- तुकडे...'
4
अंजली दमानियांच्या पतीची राज्य सरकारची थिंक टँक असलेल्या 'मित्रा' संस्थेच्या सल्लागारपदी नियुक्ती
5
आता उत्तर कोरियात 'आईस्क्रीम' शब्द बोलण्यास बंदी; हुकूमशाह किम जोंग उननं काढलं फर्मान, कारण...
6
जबरदस्त दणका! आयसीसीने मॅच रेफरीला काढण्याची मागणी फेटाळली; पाकिस्तान संघ आशिया कपमधून बाहेर पडणार?
7
मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवरून जाताय? आज तातडीचा विशेष ब्लॉक, एक तासासाठी वाहतूक राहणार बंद 
8
फक्त ३ वर्षात १०,००० रुपयांच्या SIP ने खरेदी करू शकता ड्रीम कार; गुंतवणुकीचा फॉर्म्युला ठरतोय हीट
9
जगातील सर्वात ‘पॉवरफुल’ व्यक्तीचे बंगळुरुमध्ये नवे ऑफिस; भाडे 400 कोटींपेक्षा जास्त..!
10
'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मध्ये आर्यन खानच्या दिग्दर्शनाखाली केलं काम, बॉबी देओलने सांगितला अनुभव
11
IND vs PAK सामन्यानंतर हस्तांदोलन न करण्यावर अखेर BCCI ने सोडलं मौन, काय म्हणाले?
12
Akola: रेल्वेतून उतरताना घसरला आणि मृत्यूच्या जबड्यातच अडकला; मूर्तिजापूर रेल्वे स्थानकावर थरकाप उडवणारी घटना
13
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर पडणार?; राज्य निवडणूक आयोगाचा सुप्रीम कोर्टात अर्ज
14
विश्वासघातकी मैत्रिण! कॉल करून भेटायला बोलावलं अन् खोलीत डांबलं; शाळकरी मुलीसोबत नको ते घडलं...
15
नेपाळनंतर आता आणखी एका देशात सत्तांतर?; भारताच्या मित्र देशात सैन्य अलर्टवर, लोक रस्त्यावर उतरले
16
पब्लिक टॉयलेटमधील हँड ड्रायर बिघडवताहेत आरोग्य; आजारांना आमंत्रण, कोणाला जास्त धोका?
17
Video: बुडत्याला काडीचा आधार! कुणी खांबावर चढून, तर कुणी झाडाच्या फांदीला लटकून वाचवला जीव...
18
बँकांमध्ये बदलल्या जातात कापलेल्या-फाटलेल्या नोटा, परंतु 'या'साठी मिळू शकतो नकार; काय आहे RBI चा नियम?
19
Robin Uthappa: माजी क्रिकेटपटू रॉबिन उथप्पाला ईडीचे समन्स, ऑनलाइन बेटिंग प्रकरणात चौकशी!
20
९० लाख रोख अन् १ कोटीचे सोन्याचे दागिने... महिला अधिकाऱ्याच्या घरी सापडलं कोट्यवधींचं घबाड

पोलिसांचा ना धाक, ना रात्री गस्त; छत्रपती संभाजीनगरात ९ दिवसांत चोरी, लूटमारीच्या ३४ घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 11, 2025 18:28 IST

सततच्या लूटमारीच्या घटनांमुळे पोलिसांचा ना दिवसा धाक उरला, ना रात्री गस्त आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे.

छत्रपती संभाजीनगर : पोलिसांचा धाक न उरलेल्या लुटारूंनी जून महिन्याच्या नऊ दिवसांत तब्बल ३४ घटनांत लूटमार, चोऱ्या करत पोलिसांना आव्हान दिले. विशेष म्हणजे, मध्यवर्ती बसस्थानकातील मोबाइल चोरीच्या तक्रारीत क्रांती चौक पोलिसांनी गहाळ झाल्याची नोंद करून तक्रारदाराला ठाण्यातून पाठवून दिले. सततच्या लूटमारीच्या घटनांमुळे पोलिसांचा ना दिवसा धाक उरला, ना रात्री गस्त आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया सामान्यांमधून उमटत आहे.

शहरात ठिकठिकाणी महिला, ज्येष्ठ नागरिकांच्या गळ्यातील सोनसाखळी, मोबाइल हिसकावले जात आहेत. विशेष म्हणजे, अंतर्गत रस्त्यांऐवजी मुख्य रस्त्यांवर, दिवसाढवळ्या या घटना घडत असताना पोलिसांना चोरांचा माग काढता आलेला नाही. जळगाव जिल्ह्यातील कल्पेश पाटील यांनी नुकताच नवा मोबाइल खरेदी केला होता. ७ जून रोजी ते कामानिमित्त शहरात आले होते. सकाळी मध्यवर्ती बसस्थानकात उतरताच त्यांचा मोबाइल चोरांनी लंपास केला. क्रांती चौक पोलिसांनी त्यांच्या तक्रारीची केवळ गहाळ म्हणून नोंद करत त्यांना ठाण्यातून अक्षरशः हाकलले.

घटना १ - वटसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजेला पायी निघालेल्या शोभा गोविंद होट्टे यांच्या गळ्यातील ३.५ ताेळ्यांचे मंगळसूत्र दुचाकीस्वार चोरांनी हिसकावले. शिवाजीनगर रोडवरील लक्ष्मीनगरच्या जानकी हॉटेलमागील परिसरात स्पोर्ट्स बाइकवरून आलेल्या व काळ्या टी-शर्टमधील दोघा लुटारूंनी तोंडाला रुमाल बांधला होता.

घटना २- सिटी बसमधून प्रवास करताना उषा संजय बोर्डे यांच्या पर्समधून चोरांनी २ तोळ्याचे दागिने लंपास केले. ९ जून रोजी उषा दुपारी ४ वाजता बाबा पंप ते चिकलठाणा या सिटी बसमध्ये होत्या. क्रांती चौकापर्यंत जाईपर्यंत त्यांच्या पर्समधील छोटी पर्स चोराने लंपास केली.

घटना ३- रस्त्यावर महिलेला शिवीगाळ करणाऱ्याला दूर जाण्यास सांगण्यासाठी गेलेल्या पूनमसिंग सुंदरडे (रा. गारखेडा) यांच्या पोटात एकजण चाकू खुपसून खिशातील दोन मोबाइल घेऊन पसार झाला. रविवारी रात्री ११.३० वाजता गारखेड्यातील गणेशनगरमध्ये ही घटना घडली.

घटना ४- सिडको चौकात ट्रॅव्हल्स बसची वाट पाहणाऱ्या ज्ञानेश्वर मापारी यांना ट्रिपलसीट दुचाकीस्वारांनी (एमएच २० ईएच ०८७२) गुंडगिरी करत मोबाइल, खिशातील साडेसात हजार रुपये लुटले. १ जून रोजीच्या घटनेप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी ८ दिवसांनी गुन्हा दाखल केला.

नऊ दिवसांत लूटमार, चोरीचे ३४ गुन्हे१६ (वाहन चोरी), ११ (घरफोड्या, अन्य चाेऱ्या), ७ (लूटमार) = ३४ गुन्हे

दबा धरण्याचा मुख्य हेतू हल्ला, घरफोड्यारात्रपाळीबाबत पोलिस गंभीर नसल्याची कबुलीच काही पोलिस अधिकाऱ्यांनीही दिली. गस्तीसाठीचे पथक एकाच ठिकाणी वाहन उभे करून वेळकाढूपणा करतात. अशा स्थितीत गुन्हेगार सर्रास लूटमार करतात.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारी