शहरं
Join us  
Trending Stories
1
Donald Trump Tariff on India: डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफवर सरकारचा प्लान तयार, आता देणार ‘जशास तसं’ उत्तर
2
मतदार याद्यांचा घोळ कायम, बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांच्याच नावे २ व्होटर कार्ड; तेजस्वी यादव यांनी केली पोलखोल
3
कीबोर्डच्या F आणि J बटणांवर लहान रेषा का असतात? ९९ टक्के लोक अज्ञात असतील...
4
ग्रीन झोनमध्ये शेअर बाजाराची कामकाजास सुरुवात; मोठ्या चढ-उतारासह 'हे' शेअर्स उघडले
5
'निमिषा प्रियाला अजिबात माफ केले जाणार नाही, तिला ताबडतोब फाशी द्या', तलालच्या भावाने तिसऱ्यांदा दाखल केली याचिका
6
Tarot Card: ध्येयपूर्तीकडे वाटचाल करायला लावणारा आठवडा; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
7
१२ वर्षं वय... ३ महिन्यांत 200 जणांनी केलं 'वाईट कृत्य'! तुम्हालाही हादरवून टाकेल मुंबईतून रेस्क्यू करण्यात आलेल्या चिमुकलीची कहाणी
8
पठ्ठ्याने एकहाती सामना फिरवला! तब्बल ८ षटकार ठोकून टीम डेव्हिडने केली गोलंदाजांची धुलाई
9
ना अमेरिकन F-35, ना रशियन Su-57...; या मित्र देशाकडून लढाऊ विमाने खरेदी करून आणखी ताकद वाढवणार भारत! IAF ची मोठी मागणी
10
Viral Video : भर रस्त्यात हाय वोल्टेज ड्रामा! पत्नीने पतीच्या कानशिलात लगावल्या, कशावरून सुरू झालेला वाद?
11
आमिर खानच्या कुटुंबियांनी जारी केलं स्टेटमेंट, भाऊ फैजल खानचे सर्व आरोप फेटाळले
12
FD-RD सर्व विसराल; हा आहे LIC चा ‘तरुण’ प्लान; आयुष्यभर पडेल पैशांचा पाऊस, टेन्शचा होईल The End
13
मंगळवारी श्रावण अंगारक संकष्ट चतुर्थी: ६ राशींना कल्याण काळ, अनपेक्षित लाभ; आर्थिक भरभराट!
14
Video: अल्लू अर्जुनने विमानतळावर अधिकाऱ्यासमोर दाखवला माज; अखेर काढावाच लागला मास्क
15
श्रावण संकष्ट चतुर्थी: यशोदामातेने केले होते व्रत, इच्छा होतील पूर्ण; यंदा विशेष अंगारक योग
16
नेत्यांना घेऊन जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाचे आपत्कालीन लँडिंग; खासदार म्हणाले - आम्ही थोडक्यात बचावलो!
17
आजचे राशीभविष्य, ११ ऑगस्ट २०२५: विविध लाभ, मान-सन्मानाचा दिवस; संयम राखा, शांत राहा
18
१८७७ गावांमध्ये पूर, घराघरांत शिरलं पाणी, ६ लाख बाधित; 'या' राज्यात पावसाचा कहर सुरूच!
19
भारत जगात सर्वांत वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था; ट्रम्प यांच्या 'डेड इकॉनॉमी'ला अप्रत्यक्ष उत्तर
20
शरद पवारांनी निवडणूक आयोग-पोलिसांकडे तक्रार का केली नाही? : फडणवीस

वीजही नाही, पाणीही नाही, नागरिक घामाघूम, ४० हजार वीज ग्राहकांना ‘शाॅक’

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 19:23 IST

झाड कोसळले व केबलच्या नादुरुस्तीने विविध भागांचा वीजपुरवठा खंडित

छत्रपती संभाजीनगर : ग्रामीण पोलिस कॉलनीजवळ वीजवाहिन्यांवर झाड कोसळून, तर सिडको बस स्थानक परिसरात भूमिगत केबल नादुरुस्त झाल्याने शहरातील विविध भागांचा वीजपुरवठा बुधवारी खंडित झाला. याचा तब्बल ४० हजार वीजग्राहकांना फटका बसला. विजेअभावी घामाघूम होण्याची वेळ त्यांच्यावर ओढावली. ऐन पाणी येण्याच्या वेळेत वीज ‘गुल’ झाल्याने काही भागांत नागरिकांना पाणी भरताना मोठी कसरतही करावी लागली.

सिडको बस स्थानक परिसरात ३३ केव्ही वाहिनीच्या भूमिगत केबलमध्ये बिघाड झाला. सकाळी ९ वाजता महावितरणचे अभियंते-कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन पर्यायी केबलचे काम सुरू केले. त्यासाठी एन-४ व म्हाडा या ३३ केव्ही वाहिन्यांचा वीजपुरवठा खबरदारीचा उपाय म्हणून सकाळी १० ते दुपारी १२:३० वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आला. यामुळे एन-४ व म्हाडा उपकेद्रांवरील सुमारे ३५ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा बंद होता. पर्यायी केबलचे काम करून १२.३० वाजता वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. अधीक्षक अभियंता मनीष ठाकरे, कार्यकारी अभियंता महेश पाटील, अतिरिक्त कार्यकारी अभियंता दिनेश चावडा, प्रशांत नाखले, सहायक अभियंता विजय काथार, जितेंद्र पन्नाभट्टी, प्रदीप निकम, अक्षय अबदलवार यांनी वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

कटकट गेट, एसटी कॉलनीतील ५ हजारांवर ग्राहक अंधारातसकाळी १०:३० वाजेच्या सुमारास पोलिस कॉलनी, एन-१० येथे सुराणानगर व कटकट गेट फिडरवरील कट पाॅइंट पोलवर झाड पडल्याने दोन्ही पोल पूर्णपणे वाकून तारा तुटल्या. यामुळे कटकटगेट, एसटी कॉलनी, सुराणानगर, बायजीपुरा परिसरातील ५ हजार ५०० ग्राहकांचा विद्युतपुरवठा खंडित झाला.

झाड कापण्याचे यंत्र पडले बंदपडलेले झाड बाजूला करण्यासाठी अग्निशमन दलास निरोप देण्यात आला. परंतु, त्यांचे झाड कापण्याचे यंत्र बंद पडल्याने त्यांना झाड तोडता आले नाही. त्यानंतर खासगी व्यक्ती बोलावून झाड तोडण्यात आले. यामध्ये ३ तास गेले. झाडात अडकलेल्या तारा काढून एक खांब उभा करून तारा जोडण्यात आल्या. सायंकाळी ५:३० वाजता वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. अतिरिक्त कार्यकारी अभियंता संजीव कोंडगुळी, सहायक अभियंता अभय अरणकल्ले यांच्यासह कर्मचारी व ठेकेदारांनी कटकटगेट, एसटी कॉलनी, सुराणानगर आदी भागांतील वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी परिश्रम घेतले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरelectricityवीज