शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

छत्रपती संभाजीनगरातील अखंड उड्डाणपूल, औट्रम घाट बोगद्याबाबतही नितीन गडकरी सकारात्मक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 28, 2024 12:15 IST

जालना रोड ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित होताच शेंद्रा ते वाळूज अखंड उड्डाणपूलाचे काम सुरू करण्यासाठी सकारात्मक

- विकास राऊत

छत्रपती संभाजीनगर : शहरात शेंद्रा ते चिकलठाणा डबलडेकर उड्डाणपुलासाठी जालना रोड भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (एनएचएआय) कडे हस्तांतरित होणे महत्त्वाचे आहे. त्यानंतर अखंड पुलासाठी निधी देण्याबाबत सकारात्मकरीत्या विचार केला जाईल. कन्नड येथील औट्रम घाटात बोगदा बांधण्याबाबत शुक्रवारी नियोजनात्मक चर्चा केल्याची माहिती केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांच्या नागरी सत्कारासाठी गडकरी शहरात आले होते. त्यावेळी ‘लोकमत’ प्रतिनिधीने त्यांच्याशी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील दोन महत्त्वाच्या प्रकल्पांबाबत संवाद साधला. बागडे यांच्या निवासस्थानी गडकरी यांनी ‘एनएचएआय’चे प्रकल्प संचालक रवींद्र इंगोले व इतर अधिकाऱ्यांकडून मंत्री गडकरी यांनी ‘एनएचएआय’च्या प्रकल्पांसह औट्रम घाट व इतर कामांचा आढावा घेतला.

जालना रोड हस्तांतरित होताच गतीशेंद्रा ते चिकलठाणा व पुढे वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल आणि मेट्रो रेल्वेची घोषणा केंद्रीय रस्ते, वाहतूक व दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांनी २४ एप्रिल २०२२ केली होती. यासाठी महापालिका स्मार्ट सिटीने विस्तृत प्रकल्प अहवाल (डीपीआर) देखील तयार केला होता. शेंद्रा एमआयडीसी ते वाळूजपर्यंत डबलडेकर उड्डाणपूल म्हणजे खाली रस्ता, वर पूल व मेट्रो प्रकल्प प्रस्तावित आहे. हा प्रकल्प २५ कि.मी. लांबीचा असणार आहे. यामध्ये १६ कि.मी. चौपदरी उड्डाणपूल आणि ९ कि.मी.चा डबलडेकर पूल असणार आहे. हा संयुक्त प्रकल्प सुमारे ६ ते ७ हजार कोटी रुपयांचा असून जालना रोड ‘एनएचएआय’कडे हस्तांतरित झाल्यानंतर या प्रकल्पाला गती मिळेल, असे गडकरी म्हणाले.

औट्रम घाटाची सद्य:स्थितीऔट्रम घाट सध्या जड वाहतुकीसाठी बंद आहे. गेल्या पंधरवड्यात ‘एनएचएआय’ने न्यायालयात बोगद्याच्या कामाबाबत बाजू मांडली. ‘युपीए’ सरकारच्या काळात सोलापूर-धुळे महामार्गाचे काम सुरू झाले. त्यात ३ हजार कोटींच्या औट्रम बोगद्याचा समावेश होता. सध्या सात हजार कोटींवर बोगद्याचे काम गेले. जड वाहतुकीसाठी मार्ग बंद असून पर्यायी मार्गासाठी वर्षभरापासून शोध सुरू आहे. सध्या औट्रम घाट जड वाहतुकीसाठी बंद आहे.

टॅग्स :Nitin Gadkariनितीन गडकरीAurangabadऔरंगाबाद