शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

निमीत गोयल नवे पोलीस अधीक्षक, मोक्षदा पाटील यांची बदली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 10, 2021 12:22 IST

शहर पोलीस आयुक्तालयातील दोन उपायुक्तांच्या बदल्या

ठळक मुद्देपोलीस दलात मोठे फेरबदल 

औरंगाबाद : ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची लोहमार्ग पोलीस अधीक्षक, औरंगाबाद याठिकाणी बदली झाली आहे. त्यांच्या जागी मुंबई शहर पोलीस उपायुक्तपदी असणारे आयपीएस अधिकारी निमीत गोयल यांची नियुक्ती करण्यात आली. शहर पोलीस दलातील उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील, मीना मकवाना यांचीही बदली करण्यात आली आहे.

राज्य शासनाने आयपीएस, पोलीस अधीक्षक, उपायुक्त, उपअधीक्षक, सहायक पोलीस आयुक्त या पदावरील अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश गुरुवारी सायंकाळी काढले. आयपीएस अधिकाऱ्यांमध्ये ग्रामीण पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांची औरंगाबादेतील लोहमार्ग पोलीस अधीक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्या जागी मुंबईत शहर पोलीस दलात उपायुक्त असणारे निमीत गोयल यांची पदस्थापना करण्यात आली. याशिवाय अमरावती ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अविनाश बारगल यांची पोलीस अधीक्षक, दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद याठिकाणी, राज्य राखीव पोलीस बल, गट १३, नागपूर येथील समादेशक पवन बनसोड यांची औरंगाबाद ग्रामीणमध्ये अप्पर पोलीस अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राज्य पोलीस सेवेतील पोलीस अधीक्षक, पोलीस उपायुक्तांच्या बदल्यांमध्ये शहर पोलीस दलातील उपायुक्त निकेश खाटमोडे पाटील यांची पोलीस अधीक्षक, फाेर्स वन, यूसीटीसी, मुंबई आणि दुसऱ्या उपायुक्त मीना मकवाना यांची उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग औरंगाबाद येथे बदली झाली आहे. याशिवाय उस्मानाबादचे अप्पर पोलीस अधीक्षक संदीप पालवे यांची पोलीस अधीक्षक दहशतवाद विरोधी पथक औरंगाबाद, औरंगाबाद लोहमार्ग पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे यांची पोलीस प्रशिक्षण केंद्र लातूर येथे प्राचार्य, नाशिक येथील अप्पर पोलीस अधीक्षक शर्मिला घार्गे यांची औरंगाबाद गुन्हे अन्वेषण विभागाच्या पोलीस अधीक्षकपदी बदली झाली आहे. याशिवाय राज्य गुप्तवार्ता विभाग औरंगाबाद येथील उपायुक्त उज्वला वानकर आणि नांदेड येथील नागरी हक्क संरक्षणच्या पोलीस अधीक्षक अपर्णा गिते यांची औरंगाबाद शहर पोलिसात उपायुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

उपअधीक्षक पदावरील यांच्या झाल्या बदल्याशहरातील सहायक पोलीस आयुक्त रवींद्र काळोखे यांची कोल्हापूर जिल्ह्यातील शाहुवाडी उपविभागाच्या उपविभागीय अधिकारीपदी बदली झाली. चंद्रपूर येथील शिलवंत नांदेडकर यांची पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा, औरंगाबाद, उस्मानाबाद येथील विशाल खांबे यांची अप्पर पोलीस अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, औरंगाबाद परिक्षेत्र, डॉ. विशाल नेहुल यांची उपविभागीय अधिकारी पैठण उपविभाग, गडचिरोली येथील जयदत्त भवर यांची उपविभागीय पोलीस अधिकारी, औरंगाबाद ग्रामीण, गंगापूर उपविभागाचे संदीप गावीत यांची पोलीस उपअधीक्षक जळगाव याठिकाणी बदली करण्यात आली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिस