शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
3
डोंगराळ भागाचा प्रत्येक कोपरा होता ठाऊक; पहलगाम हल्ल्यातील खरा सूत्रधार कोण? पाहा
4
क्राईम थ्रिलर! गर्लफ्रेंडला साजरा करायचा होता करवा चौथ; पतीने रचला पत्नीच्या हत्येचा कट
5
"असल्या सर्जिकल स्ट्राईक तर आम्ही गल्लीबोळात करतो’’, संजय राऊतांचा सरकारला टोला 
6
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
7
वडिलांपासून दूर राहिला, किटसाठी दूध विकलं; बर्थडे बॉय रोहित शर्माचा थक्क करणारा प्रवास!
8
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
9
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
10
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
11
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
12
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
13
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांशी तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
14
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
15
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
16
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
17
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
18
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
19
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
20
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?

निकने प्रियंकाला पाठवले खोलीभर गुलाब

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:02 IST

प्रियंका चोप्रासोबत ‘व्हॅलेंटाइन डे’ला निक जोनास नव्हता. मात्र, तरीही प्रियंकाचा व्हॅलेंटाइन डे स्पेशल ठरला. होय, निकने दूर राहूनही तो ...

प्रियंका चोप्रासोबत ‘व्हॅलेंटाइन डे’ला निक जोनास नव्हता. मात्र, तरीही प्रियंकाचा व्हॅलेंटाइन डे स्पेशल ठरला. होय, निकने दूर राहूनही तो स्पेशल बनवला. कसा तर त्याने इतकी गुलाबाची फुलं पाठवलीत की, प्रियंकाची खोली लाल गुलाबांनी भरून गेली. प्रियंकाने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. यात ती सोफ्यावर बसलेली दिसतेय आणि तिच्या अवतीभवती खूप सारे गुलाब असून वातावरण अगदी रोमँटिक आहे. प्रियंका सोफ्यावर बसून गुलाबाची फुलं न्याहाळतेय. ‘जर, तू इथे असता आणि सोबत काही फुलं...,’ असे तिने लिहिले. यावर निकनेही लगेच कमेंट केली. ‘फक्त आणखी काही दिवस...,’

‘छत्रपती ताराराणी’ साकारणार सोनाली कुलकर्णी

सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची कन्या आणि छत्रपती राजाराम भोसले यांच्या पत्नी असणाऱ्या ताराबाई यांनी छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्यामागे कणखरपणे स्वराज्याची धुरा सांभाळली. अशा या रणरागिणीची शौर्यगाथा सर्वांपर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राहुल जनार्दन जाधव दिग्दर्शित ‘छत्रपती ताराराणी’ या चित्रपटाची नुकतीच घोषणा करण्यात आली आहे. डॉ. जयसिंगराव पवार लिखित ‘मोगलमर्दिनी महाराणी ताराराणी’ या चरित्रग्रंथावर आधारित या चित्रपटात ताराराणीची भूमिका सोनाली साकारणार आहे.

पूजा सावंत म्हणाली, लव्ह यू मित्रा

गेल्या काही दिवसांपासून पूजा सावंत आणि गश्मिर महाजनी या दोघांमधील अफेअरची चर्चा सुरू झाली होती. पूजा सावंतने थेट गश्मिरला लव्ह यू म्हटल्यानंतर अनेक तर्कवितर्क लावले जात होते. सोशल मीडियावर दोघांचे चॅटिंगही व्हायरल झाले होते. यामागचे कारण आता समोर आले आहेत. ‘लव्ह यू मित्रा’ नावाचा सिनमा येत असून यात पूजा सावंत, गश्मिर महाजनी हे प्रमुख भूमिकेत आहेत. या चित्रपटातील आणखी एका कलाकाराचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.