शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

एनएचके, कॉस्मोची प्रतिस्पर्धी संघांवर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2018 00:55 IST

एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एन.एच.के. संघाने राज्य वस्तू व सेवाकर संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत कॉस्मो फिल्म संघाने एशियन हॉस्पिटल संघावर २५ धावांनी सहज मात केली. ज्ञानेश्वर वैद्य आणि सचिन चोबे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. कॉस्मो फिल्म्सचा कर्णधार सतीश जामखेडकर याने भेदक मारा करीत आपला विशेष ठसा उमटवला.

ठळक मुद्देऔद्योगिक क्रिकेट स्पर्धा : सचिन, ज्ञानेश्वर सामनावीर, जामखेडकरही चमकला

औरंगाबाद : एमजीएम क्रिकेट मैदानावर सुरू असलेल्या शहीद भगतसिंह औद्योगिक टष्ट्वेंटी-२० क्रिकेट स्पर्धेत एन.एच.के. संघाने राज्य वस्तू व सेवाकर संघावर ८ गडी राखून दणदणीत विजय मिळवला. अन्य लढतीत कॉस्मो फिल्म संघाने एशियन हॉस्पिटल संघावर २५ धावांनी सहज मात केली. ज्ञानेश्वर वैद्य आणि सचिन चोबे हे आज झालेल्या सामन्यात सामनावीर किताबाचे मानकरी ठरले. कॉस्मो फिल्म्सचा कर्णधार सतीश जामखेडकर याने भेदक मारा करीत आपला विशेष ठसा उमटवला.सकाळच्या सत्रात झालेल्या सामन्यात राज्य वस्तू व सेवाकर संघाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ८ बाद ११० धावा केल्या. त्यांच्याकडून गजेंद्र रामदिन याने ४५ चेंडूंत झटपट ४२ धावांची खेळी केली. राजू मदन याने २३ चेंडूंत २३ धावा केल्या. एन.एच.के.तर्फे अनिल भवर आणि योगेश परदेशी यांनी प्रत्येकी ३ गडी बाद केले. यासाठी त्यांनी प्रत्येकी १४ धावा मोजल्या. प्रत्युत्तरात एनएचके संघाने विजयी लक्ष्य १३.५ षटकांत पूर्ण केले. त्यांच्याकडून ज्ञानेश्वर वैद्य याने अवघ्या ४१ चेंडूंत ४ चौकार व ३ षटकारांसह ५५ धावांची आक्रमक खेळी केली. सौरभ अलक याने २८ चेंडूंत ३० धावांचे योगदान दिले. राज्य वस्तू व सेवाकर संघाकडून राजू मदन याने २७ धावांत २ गडी बाद केले.दुसºया सामन्यात कॉस्मो फिल्म संघाने प्रथम फलंदाजी करताना १९.४ षटकांत सर्वबाद १४४ धावा केल्या. त्यांच्याकडून सचिन चौबे याने ३४ चेंडूंत ५ चौकारांसह ३८ धावा केल्या. विपुल इनामदार याने २७ व गणेश काकडे याने २० धावांचे योगदान दिले. एशियन संघाकडून विजय वालतुरे याने २१ धावांत ४ गडी बाद केले. हर्षवर्धन त्रिभुवन याने २५ धावांत २ बळी घेतले. प्रत्युत्तरात एसियन संघ १४.३ षटकांत ५९ धावांत गारद झाला. त्यांच्याकडून रणजित सावेने २० चेंडूंत २ चौकारांसह १८ धावा केल्या. अन्य फलंदाज दुहेरी आकडी धावसंख्या गाठू शकले नाहीत. कॉस्मो फिल्मतर्फे कर्णधार सतीश जामखेडकरने ९ धावांत ३ गडी बाद केले. त्याला विपुल इनामदार व विराज चितळे यांनी प्रत्येकी २ गडी बाद करीत साथ दिली. विपुलने ६ व विराजने १० धावा मोजल्या.आज झालेल्या सामन्यात पंच म्हणून राजेश सिद्धेश्वर, महेश जहागीरदार, उदय बक्षी, अ‍ॅड. बाळासाहेब वाघमारे आदींनी काम पाहिले. गुणलेखन तन्मय ढगे व राजेश भिंगारे यांनी केले. येत्या १६ मार्च, शुक्रवारी सकाळी ७.३० वाजता डीआयएजीईओ व बडवे इंजिनिअरिंग यांच्यात लढत होणार आहे. याच दिवशी दुसरा सामना सकाळी १०.३० वाजता सार्वजनिक बांधकाम विभाग व वैद्यकीय ब या संघात रंगणार असल्याचे संयोजक गंगाधर शेवाळे व दामोदर मानकापे यांनी कळवले आहे.