शहरं
Join us  
Trending Stories
1
'बीडच्या रेल्वेखाली जीवन संपविणारा मी पहिला असेल'; तरुणाचे मुख्यमंत्र्यांना पत्र, कारण काय?
2
राज ठाकरे यांच्याशी अधिकृत युती कधी जाहीर करणार?; उद्धव ठाकरे यांनी सरळ सांगितले, म्हणाले…
3
“देवाभाऊंच्या जाहिरातीला कोट्यवधी उधळले, तेच पैसे शेतकऱ्यांना दिले असते तर...”: उद्धव ठाकरे
4
टीम इंडियाला ज्या ज्या कंपन्यांनी स्पॉन्सर केले, त्यापैकी तीन कंपन्या बुडाल्या, बंद झाल्या...
5
'जत्रा २' येणार का? दिग्दर्शक केदार शिंदे म्हणाले, "मनापासून इच्छा आहे पण..."
6
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर; ३१ जानेवारी २०२६ पर्यंत मुदतवाढ, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
7
बाजारात 'सुपर' तेजी! सेन्सेक्स-निफ्टीमध्ये मोठी उसळी; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
8
भारतावर आणखी टॅरिफ लावण्याची धमकी अमेरिकेवरच उलटू शकते, जाणून घ्या का?
9
गायीने कहरच केला... धावता-धावता उडी मारून थेट कौलावरच चढली, Video पाहून व्हाल थक्क
10
Pitru Paksha 2025: पितृ पक्षात एखादी अंत्ययात्रा दिसणे शुभ की अशुभ? काय करावे उपाय? वाचा
11
सोन्याच्या किंमतीनं रचला इतिहा, विक्रमी पातळीवर पोहोचला भाव; पटापट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट!
12
झोमॅटोने रचला नवा विक्रम! टाटा-अदानी समुहातील मोठ्या कंपन्यांनाही 'या' बाबतीत टाकलं मागे
13
"जे झालं ते अचानक अन् चुकून झालं"; BMW कार अपघातातील आरोपी मागतेय जामीन
14
अपोलो टायर्स प्रत्येक मॅचमागे ४.५ कोटी रुपये मोजणार; टीम इंडियाला नवा स्पॉन्सर मिळाला
15
इस्राइल-गाझाचं उदाहरण देत शाहिद आफ्रिदीने भारताविरोधात ओकली गरळ, मोदींबाबत म्हणाला... 
16
धोक्याची घंटा! कच्ची केळी बादलीत टाकली अन् १ मिनिटात पिकली; लोकांच्या जीवाशी खेळ?
17
दबंग सून... मध्यरात्री गुंडांना घेऊन सासरी आली आणि केला धडाधड गोळीबार, त्यानंतर...  
18
IND vs PAK: पाकिस्तान जय शाहला घाबरला; आधी 'बड्या बाता' केल्या, आता गपचूप बसला, काय घडलं?
19
स्विगीने खास पुणेकरांसाठी लाँच केले 'Toing' ॲप; केवळ ५० रुपयांत मिळणार भरपेट जेवण, काय आहे वैशिष्ट्ये?

दुसऱ्या दिवशी मनपाने कापले १२७ अनधिकृत नळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 17:48 IST

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली.

ठळक मुद्दे मनपाच्या ७ पथकांनी कारवाई करून १२७ अनधिकृत नळ कापले.कारवाई करताना नागरिक आणि पालिकेच्या पथकात वाद होऊन तणाव

औरंगाबाद : महापालिकेच्या मुख्य जलवाहिनीवरून घेण्यात आलेल्या अनधिकृत व्यावसायिक नळांवर गुरुवारी दुसऱ्या दिवशीही कारवाई करण्यात आली. शहरातील मुख्य व्यावसायिक भागात मनपाच्या ७ पथकांनी कारवाई करून १२७ अनधिकृत नळ कापले.

पथकांनी पहाटे ६ वाजेपासून शहरातील विविध भागांत कारवाई सुरू केली. कारवाई करताना नागरिक आणि पालिकेच्या पथकात वाद होऊन तणाव निर्माण झाला. चिकलठाणा परिसरात मातोश्री लॉन्स, कांचन लॉन्स, शिवनेरी रेस्टॉरंट, शिवनेरी लॉन्स, आॅक्सिफ्लो आर ओ प्लांट, इंडियन आॅईल पेट्रोलपंप, निसर्ग हॉटेल, हनुमाननगर येथील आॅटो वॉशिंग सेंटर, आशादीप रेस्टॉरंट व बार या व्यावसायिकांचे अनधिकृत नळ कनेक्शन पथकाने कापले. तसेच एमजीएमसमोर हॉटेल शालिमार, रॉयल गॅरेज, गुलाम मोटर गॅरेज, हॉटेल प्रशांत, लक्की गोल्ड फर्निचर, हॉटेल रसोई जकात नाका आणि एमजीएम गेट समोरील आदर्श महिला बँकेचे नळ कनेक्शन तोडण्यात आले. महापालिकेच्या पथकाने नंतर कांचनवाडी येथील धील्लन, मिथियाल आणि नाथपुरम येथील घेण्यात आलेले अनधिकृत नळ कनेक्शनही तोडण्यात आले. मोंढानाका भागात हॉटेल साई प्रसाद, बिरला सिमेंट आणि एन-२ भागात जयभवानी पेट्रोलपंप, सलीम खुर्चीवाला, चंद्रलेखा परमिट रूम अ‍ॅण्ड बार तसेच शहागंज येथील सिटी प्लाझा व्यापारी संकुल, पेट्रोलपंप आणि भाजी मंडई येथील पाणपोईचे नळ पथकांनी  तोडले. 

नळ कनेक्शन रात्रीतून पुन्हा जोडलेमोतीकारंजा परिसरात एका धार्मिकस्थळात मुख्य जलवाहिनीवरून बेकायदा घेतलेले दीड इंचाचे नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई  पालिकेने बुधवारी केली होती. मात्र मनपाने तोडलेले नळ कनेक्शन त्या धार्मिकस्थळावरील मंडळींनी रात्रीतून जोडून पुन्हा पाणीपुरवठा सुरू केला. नळ कनेक्शन पुन्हा जोडल्याची माहिती मिळताच गुरुवारी सकाळी पथक कारवाईसाठी धार्मिकस्थळावर धडकले. नळाच्या पाण्याने टँकर भरणा होत असल्याचे पालिका पथकाने रंगेहाथ पकडले. नळ कनेक्शनवर कारवाईस विरोध करण्यासाठी जमाव पथकावर चालून आला. परंतु उपायुक्त मंजूषा मुथा यांनी थेट धार्मिकस्थळात जाऊन बेकायदा जोडलेले नळ कनेक्शन पुन्हा तोडले. पोलीस बंदोबस्त असल्यामुळे तणाव निवळला. 

रॅकेट सर्वानुमतेच चालत असावेपालिकेच्या मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन कुणी जोडून दिले. पाणीपुरवठा विभागातील महाभागच याला जबाबदार आहेत का? आजवर या कनेक्शनला अभय कुणी दिले. मनपाचे प्लंबर, उपअभियंता, शाखा अभियंता ही मंडळी आणि लोकप्रतिनिधी यांच्या संगनमताने मुख्य जलवाहिनीवर नळ कनेक्शन दिल्याचे बोलले जाते. पाणीपुरवठा विभागातील यंत्रणेला वरकमाई आणि लोकप्रतिनिधींना निवडणुकीसह वॉर्डातील पक्षांच्या कार्यक्रमांसाठी अनधिकृत व्यावसायिक नळधारकांकडून गंगाजळी मिळते. त्यामुळे मनपासह राजकारणीदेखील अनधिकृत व्यावसायिक नळांची पाठराखण करतात, अशी चर्चा ऐकायला मिळाली.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद