शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादसाठी नवीन पाणीपुरवठा योजना; निविदा १५०४ कोटींवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2020 18:30 IST

कंपनीने वाढीव रक्कम कमी करावी, यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

ठळक मुद्दे१३८० कोटीची योजना राज्य शासनाकडून मंजूर  ९.९ टक्के अधिक दराने आली निविदा

औरंगाबाद : राज्य शासनाने शहरासाठी नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर केली आहे. या कामासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने निविदा प्रक्रिया राबविली. ज्या मोठ्या कंपन्यांनी निविदा प्रक्रियेत भाग घेतला त्यातील एका कंपनीने ९.९ टक्के अधिक दराने निविदा भरली आहे. इतर कंपन्यांनी यापेक्षा अधिक दर दिले आहेत. त्यामुळे सर्वाधिक कमी दराची निविदा मंजुरीसाठी शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. कंपनीने वाढीव रक्कम कमी करावी, यासाठी प्राधिकरणाचे प्रयत्न सुरू आहेत. 

राज्य शासनाने १६८० कोटी रुपये किमतीची नवीन पाणीपुरवठा योजना औरंगाबाद शहरासाठी मंजूर केली. त्यापैकी १३०५ कोटींची निविदा महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने काढली. पहिल्या प्रयत्नात निकषानुसार निविदा न आल्याने प्राधिकरणाने फेर निविदा काढली. त्यानंतर मात्र जीबीपीआर कंपनी लि. मुंबई, मेघा कंपनी प्रा.लि. हैदराबाद आणि नागार्जुन कन्स्ट्रक्शन प्रा. लि., हैदराबाद या कंपन्यांनी निविदा दाखल केल्या होत्या. जीबीपीआर कंपनीची सर्वात कमी दराची म्हणजे ९.९ टक्के जादा दराची निविदा ग्राह्य धरण्यात आली. 

अंदाजपत्रक १३८० कोटींचेनवीन पाणीपुरवठा योजना राबविताना पहिल्या टप्प्यातील पूर्ण काम करण्यासाठी १३८० कोटी रुपयांचे अंदाजपत्रक तयार करून निविदा प्रसिद्ध करण्यात आली. जीबीपीआर कंपनीने इतर कंपन्यांच्या तुलनेत ९.९ टक्के  अधिक दराने निविदा भरली आहे. यानुसार पाणीपुरवठ्याचा खर्च १५०४ कोटी २० लाखांपर्यंत जात आहे. कंपनीने वाढीव दर कमी करावा यादृष्टीने प्राधिकरण जोरदार प्रयत्न करीत आहे. जीबीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी पाचारण करण्यात आल्याची माहिती प्राधिकरणाचे अधीक्षक अभियंता अजय सिंह यांनी दिली.

अहवाल शासनाला पाठविणारजीबीपीआर कंपनीच्या अधिकाऱ्यांना चर्चेसाठी तीन दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. सध्याचा लॉकडाऊनचा काळ लक्षात घेता चार दिवस जास्त लागू शकतील, असे गृहीत धरण्यात आले आहे. नंतर जो काही दर ठरेल त्याचा अहवाल शासनाला सादर केला जाईल. शासनाची त्याला मंजुरी मिळाल्यावर पुढील कार्यवाही सुरू केली जाईल, असे अजय सिंह यांनी सांगितले. 

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणी