शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

नवीन पायंडा! छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्र्यांचे बस्तान

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 16:24 IST

जिल्हाधिकारी कार्यालयात स्थायी स्वरूपाचे दालन पालकमंत्र्यांना देणे नियमबाह्य ठरू शकते.

छत्रपती संभाजीनगर : जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या संपर्क कार्यालयासाठी जागा देण्यात आली आहे. तळमजल्यावर ज्या ठिकाणी हायस्पीड रेल्वेचे दालन सुरू केले हाेते. त्या दालनात सरकारी कर्मचाऱ्यांसह पालकमंत्र्यांच्या चमूचे बस्तान असणार आहे. पालकमंत्र्यांकडे येणाऱ्या तक्रारींच्या अनुषंगाने त्या ठिकाणी निवेदने स्वीकारली जातील. या प्रशासकीय निर्णयामुळे नवीन पायंडा पडणार असल्याचे बोलले जातेय.

पालकमंत्री शिरसाट यांच्या निवासस्थानी कुणाला भेटणे शक्य होत नाही. तसेच कोकणवाडी कार्यालयात त्यांना दैनंदिन व्यस्ततेमुळे भेटता येत नाही. परिणामी, सामान्य नागरिकांना त्यांना भेटून निवेदन देता येत नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांच्याशी, शासनाशी निगडित, प्रशासकीय अडचणींबाबत निवेदने स्वीकारण्यासाठी कार्यालयाचा नारळ फोडण्यात आला आहे.

मला बसण्यासाठी ते दालन नाहीजिल्हाधिकाऱ्यांसह अधिकारी भेटले नाहीत तर त्यांच्याशी निगडित निवेदने देण्यासाठी ते दालन सुरू केले आहे. तेथे सगळी प्रशासकीय यंत्रणा असेल. आमचा त्यांच्याशी समन्वय असेल. जनतेसाठी ते दालन असून पालकमंत्र्यांना बसण्यासाठी नाही. मुख्यमंत्री सहायता निधीसह विविध योजनांच्या लाभासाठी नागरिकांनी केलेल्या अर्जाचा पाठपुरावा तेथून केला जाईल.-संजय शिरसाट, पालकमंत्री

अटी व शर्तींवर...काही अटी व शर्तींवर पालकमंत्र्यांशी निगडित निवेदनांसाठी दालनास जागा दिली आहे. तेथे कुठलाही राजकीय पत्रव्यवहार होणार नाही, अशी मुख्य अट जिल्हाधिकाऱ्यांनी घातलेली आहे.संगीता राठोड, उपजिल्हाधिकारी

कायदेशीर तरतूद नाहीजिल्हाधिकारी कार्यालय हे प्रशासकीय अधिकाराचे कार्यक्षेत्र आहे. पालकमंत्री हे राजकीय पद आहे. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात स्थायी स्वरूपाचे दालन पालकमंत्र्यांना देणे नियमबाह्य ठरू शकते. पालकमंत्र्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात दालन देण्याची कोणतीही कायदेशीर तरतूद नसल्याचे तज्ज्ञ सांगतात. पालकमंत्री जिल्ह्याच्या दौऱ्यावर असताना, बैठकीसाठी तात्पुरते दालन वापरण्याची मुभा असते. पालकमंत्र्यांना कायमस्वरूपी दालन दिले गेले, तर त्याचा अर्थ प्रशासनावर राजकीय हस्तक्षेप वाढतो, असा होऊ शकतो.

यांच्या दालनांवरून वादमाजी आ. बच्चू कडू यांनी येथील कडा कार्यालय आवारात संपर्क दालन सुरू केले होते. त्या दालनावरूनही वादंग घडले होते. खासदार, आमदार, किंवा पालकमंत्र्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात कायमस्वरूपी दालन ठेवण्याची नियमित व्यवस्था नसल्याची टीका करीत अमरावतीच्या माजी खा. नवनीत राणा यांच्या विरोधात विरोधकांनी आंदोलन केले हाेते.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरSanjay Shirsatसंजय शिरसाट