शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तीन दिवसांत औरंगाबाद शहराला देणार नवीन पोलीस आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 24, 2018 00:23 IST

११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.

ठळक मुद्देदंगलीची उच्चस्तरीय चौकशी : आमदारांच्या शिष्टमंडळाला मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती; कायदा व सुव्यवस्था विभागाचे महासंचालक बिपीन बिहारींवर जबाबदारी

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ११ आणि १२ मे रोजी शहरात झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. तीन दिवसांत शहराला नवीन पोलीस आयुक्त देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाला मंगळवारी रात्री मुंबईत दिली.औरंगाबादेत झालेल्या दंगलीत दोन जणांचा बळी गेला आणि पोलिसांचा गोळीबार आणि दंगलखोरांनी केलेल्या दगडफेकीत दोनशेहून अधिक नागरिक जखमी झाले. या दंगलीत अनेकांची वाहने आणि दुकाने जाळण्यात आली. शेकडो वाहनांची तोडफोड करण्यात आल्याने सुमारे १० कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज महसूल विभागाने केलेल्या पंचनाम्यात नमूद केला आहे. दंगल करणाऱ्या राजकीय कार्यकर्त्यांसह ६५ जणांना पोलिसांनी आतापर्यंत अटक केली आहे. अन्य दंगलखोरांची ओळख पटवून त्यांचे अटकसत्र पोलिसांकडून सुरूच आहे. शिवाय या दंगलीत काही पोलीस पक्षपाती वागल्याचा आरोप होत आहे.या पार्श्वभूमीवर आमदार इम्तियाज जलील यांच्यासह सर्वपक्षीय आमदारांच्या शिष्टमंडळाने मंगळवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबईत भेट घेतली. त्यांनी दंगलीच्या विविध व्हिडिओ क्लीप मुख्यमंत्र्यांना दिल्या. शिवाय दंगलीची चौकशी करण्याची मागणी केली.नुकसानभरपाई देण्याचीही तयारीशिष्टमंडळासोबत चर्चा करताना दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले. ही चौकशी राज्याचे पोलीस महासंचालक (कायदा व सुव्यवस्था) बिपीन बिहारी यांच्यामार्फत केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. नुकसान झालेल्या लोकांना नुकसानभरपाई देण्याची तयारीही त्यांनी दर्शविल्याचे शिष्टमंडळातील सदस्य आ.जलील यांनी सांगितले.दोन महिन्यांपासून आयुक्तपद रिक्त४शहराचे पोलीस आयुक्तपद दोन महिन्यांपासून रिक्त आहे. याकडे मुख्यमंत्र्यांचे लक्ष वेधले असता, तीन दिवसांत नवीन पोलीस आयुक्तांची नियुक्ती करण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.मिटमिटा दंगलीची अद्याप चौकशी नाहीमार्च महिन्यात मिटमिटा येथे झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत केली होती. गृह विभागाचे अप्पर सचिव आणि पोलीस महासंचालक ही चौकशी करण्यासाठी औरंगाबादेत येणार होते. या घोषणेची अद्याप अंमलबजावणी झाली नाही. असे असताना शहरात नुकत्याच झालेल्या दंगलीची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे आश्वासन पाळले जाईल का याविषयी उत्सुकता आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसPoliceपोलिसMLAआमदार