शहरं
Join us  
Trending Stories
1
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
2
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
3
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
4
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
5
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
6
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
7
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
8
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
9
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
10
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
11
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
12
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
13
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
14
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
15
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
16
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
17
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

उतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:08 IST

पर्यटकांना भुरळ : गौताळा अभयारण्यात घडतेय निसर्गसौंदर्याचे दर्शन

सुरेश चव्हाणकन्नड : धुंद धुंद ही हवा, मंद मंद गारवाउतरला धरेवरी स्वर्ग हा नवा नवा!!या गीतातील अपेक्षित निसर्गसौंदर्य गौताळा अभयारण्यात फुलू लागल्याने हे सौंदर्य डोळ्यात साठविण्यासाठी पर्यटकांची पावले आता अभयारण्याकडे वळू लागली आहेत. सध्याच्या वातावरणात अभयारण्यात अधूनमधून पडणारा पाऊस, थंडगार हवा, पक्षांची किलबिल आणि सर्वत्र पसरलेली हिरवीगार चादर असे मनमोहक सौंदर्य काल्पनिक स्वर्गापेक्षा नक्कीच कमी नाही, असे उद्गार सहजच पर्यटकांच्या मुखातून बाहेर पडत आहेत.कन्नडपासून अवघ्या पाच कि.मी. अंतरावर नागद रस्त्यावर गौताळा अभयारण्य असून प्रवेशद्वारावर तपासणी नाका आहे. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे अभयारण्यास बाधा पोहोचेल अशा वस्तू अथवा प्रतिबंधात्मक वस्तू नेण्यास प्रतिबंध करण्यास मदत होते. तपासणी नाक्यावर नोंद करून नियमाप्रमाणे शुल्क भरुन अभयारण्यात प्रवेश घेता येतो. अभयारण्य औरंगाबाद व जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर २६० चौ.कि.मी.क्षेत्रावर नैसर्गिक वनराईने व्यापलेले आहे. पानगळीचे जंगल असल्याने उन्हाळ्यात पानगळ होत असल्याने डोंगर उघडे, बोडखे दिसू लागतात. त्यामुळे उन्हाळ्यात अभयारण्यातील निसर्गसौंदर्य लोप पावते. मात्र पावसाळा सुरु झाला की डोंगरावर हिरव्यागार गवताची चादर पसरते तर वृक्षही हिरवा शालू पांघरतात. उन्हाळयात मुके झालेले झरे बोलू लागतात आणि हे सगळे सौंदर्य पाहून पक्षांचाही किलबिलाट वाढतो. मधूनच मोरांचा कर्णमधूर आवाज ऐकू येतो. अशा या सौंदर्यांची अनुभुती पर्यटकांना खुणावल्याशिवाय राहत नाही.बांधातील पाण्याने मिटली तहानअभयारण्यात ठिकठिकाणी बांधण्यात आलेले सिमेंट, मातीनाला बांधामध्ये पाणीसाठा होत आहे. त्यामुळे प्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सध्यातरी मिटला आहे.ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबेअभयारण्यात ठिकठिकाणी व्ह्यू पॉइंट, धबधबे, निरीक्षण टॉवर, पॅगोडा आहेत. अभयारण्यातील निसर्गाच्या मुक्त सौंदर्याची उधळण नजरेत साठविण्यासाठी परदेशी पर्यटकही अभयारण्याकडे वळू लागले आहेत. शुक्रवारी (६ जुलै) जपानच्या कॅटसुकी ओटा आणि हिरोशी अ‍ॅसेनो यांनी भेट देऊन निसर्गसौंदर्याचा आनंद लुटला. दरम्यान, पर्यटकांनी आनंद लुटताना, सेल्फी घेताना काळजी घ्यावी, असे आवाहन अभयारण्य सूत्रांनी केले आहे.

टॅग्स :forestजंगलRainपाऊस