शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

नवीन बायपासच्या कामाला ‘कोविड’मुळे ब्रेक; डिसेंबरअखेरचा मुहूर्त हुकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 16, 2020 19:32 IST

जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

ठळक मुद्देपरप्रांतीय मजूर गेल्यामुळे गती मंदावलीजून २०२१ पर्यंत काम पूर्ण करणार

- विजय सरवदे  

औरंगाबाद : ‘कोरोना’च्या भीतीपोटी बहुसंख्य परप्रांतीय मजूर गावी निघून गेल्यामुळे नवीन बीड बायपासच्या कामाची गती मंदावली आहे. सध्या हे काम बंद नसले तरी स्थानिक मजुरांच्या माध्यमातून हळूहळू सुरू आहे. येत्या काही दिवसांत परप्रांतीय मजूर कामावर परतले तर जून २०२१ पर्यंत नवीन बायपास वाहतुकीसाठी सज्ज होऊ शकतो. 

झाल्टा फाट्यापासून गेलेला सध्याचा बीड बायपास आता शहरात आलेला आहे. या रस्त्यावर प्रचंड वाहतूक वाढली असून, अपघाताचे प्रमाणही वाढले आहे. दुसरीकडे, २० वर्षांत शहराचा झपाट्याने होणारा विकास व विस्तार आणि दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमध्ये उद्योग आल्यानंतर आताचे बायपास शहरामध्येच येतील. या उद्देशाने नवीन बायपासचे काम हाती घेण्यात आले. हा बायपास डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु २४ मार्चपासून लॉकडाऊन सुरू झाले. त्यामुळे कंत्राटदाराला काम अर्ध्यावरच थांबवावे लागले. त्यानंतर कामावर असलेल्या परप्रांतीय मजुरांनी कोरोनाच्या भीतीपोटी गावाचा रस्ता धरला. शासनाच्या सूचनेनुसार कामे सुरू करण्यात आली; पण त्यासाठी मजुरांची अडचण आली आहे. आता निपाणी ते करोडी आणि करोडी ते कन्नड घाटापर्यंतचे काम जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट महामार्ग प्राधिकरणाने निश्चित केले आहे. जर मजूर टिकले असते, तर कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट होते. 

सोलापूर-कन्नड महामार्ग जून अखेरपर्यंतसोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. हे काम मे २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट होते. या कामालाही लॉकडाऊनचा फटका बसला. जून २०२१ पर्यंत सोलापूर-कन्नड महामार्गाचे काम पूर्ण होईल, असा अंदाज प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. 

भूसंपादनाचे अडथळे संपलेऔरंगाबादपासून कन्नड या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्राधिकरणाचा प्रयत्न होता; परंतु कोविड-१९ मुळे या महामार्गाचे काम शासन आदेशानुसार बंद ठेवण्यात आले होते. हा महामार्ग आता तो जून २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचा प्रयत्न केला जाईल. मात्र, पुन्हा लॉकडाऊनची अडचण येऊ नये. रस्त्यावरील भूसंपादनाचे सर्व अडथळे निकाली निघाले आहेत. काही आक्षेप येत आहेत. प्रकल्प पूर्ण होईपर्यंत आक्षेप येतच राहतील. त्याचा कामावर परिणाम होणार नाही. - अजय गाडेकर, प्रकल्प अधिकारी, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गCoronavirus Unlockलॉकडाऊन अनलॉक