शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

नवीन बीड बायपासला डिसेंबरअखेरपर्यंतचा मुहूर्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 18:35 IST

१९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात

ठळक मुद्देयुद्धपातळीवर कामे सुरू  राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मानस

औरंगाबाद : सोलापूर-धुळे राष्ट्रीय महामार्गावरील येडशी ते औरंगाबाद (टप्पा क्रमांक दोन) या जवळपास १९० किलोमीटर लांबीच्या चौपदीकरणाचे काम अंतिम टप्प्यात आले असून, हे काम मार्च २०२० अखेरपर्यंत पूर्ण करण्याचा मानस राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने व्यक्त केला आहे. तथापि, झाल्टा फाट्यापासून निघालेल्या नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम साधारणपणे मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे उद्दिष्ट आहे. यामध्ये नवीन बीड बायपासच्या कामासाठी येणारे अडथळे आता जवळपास सर्वच निकाली निघाले असल्यामुळे हा बायपास डिसेंबर २०२० पर्यंत वाहतुकीसाठी सज्ज होईल, या दिशेने कामाला गती देण्यात आली आहे. मध्यंतरी राज्य राखीव पोलीस बलाकडून जमीन हस्तांतराचे काम रखडले होते. आता या कार्यालयाकडून जमिनीचे हस्तांतरण करण्यात आले आहे. त्यामुळे या कामाने गती घेतली आहे. 

बहुप्रतीक्षित धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील सोलापूर ते येडशी या १०० किलोमीटरच्या टप्प्याचे संपूर्ण काम पूर्ण होऊन रस्त्याचे लोकार्पणही झाले आहे. टप्पा क्रमांक दोनच्या येडशी ते औरंगाबाद या महामार्गाच्या चौपदीरकरणाचे १९० किलोमीटरच्या कामासाठी जवळपास भूसंपादनाचे सर्व अडथळे दूर झाले असून आता अवघ्या दोन महिन्यांतच हे काम पूर्ण करण्यात येईल. सध्या या रस्त्यावरून वाहतूकही सुरू आहे. या रस्त्यावर तीन ठिकाणी ‘आयआरबी’ या कंत्राटदार कंपनीने टोलवसुलीही सुरू केली आहे. या महामार्गावरून धावणाऱ्या वाहनांचा वेग ताशी १०० ते १२० किलोमीटर एवढा असेल, असे या रस्त्याचे डिझाईन तयार करण्यात आले आहे. हा रस्ता पूर्ण झाल्यानंतर औरंगाबाद ते बीडपर्यंत अवघ्या एका तासाच्या, तर सोलापूरपर्यंत तीन तासांत पोहोचणे शक्य होईल. हा महामार्ग  एक महत्त्वाचा टप्पा गाठणार असून, उत्तर भारताकडील उद्योग क्षेत्र आणि दक्षिणेकडील माहिती तंत्रज्ञान क्षेत्राला जोडणारा हा प्रमुख मार्ग असेल. 

औरंगाबाद-धुळे टप्पा प्रगतिपथावरया राष्ट्रीय महामार्गावरील औरंगाबादपासून धुळे येथपर्यंतच्या चौपदरीकरणाचे काम मार्च २०२१ पर्यंत पूर्ण करण्याचे प्राधिकरणाचे प्रयत्न आहेत. या रस्त्यावरील काही ठिकाणी भूसंपादनाच्या अडचणी आहेत, त्याही लवकरात लवकर निकाली काढण्यात येतील. बीड बायपासच्या कामाचे सर्व अडथळे आता दूर झाले आहेत. नवीन बीड बायपास ते कन्नड घाटापर्यंतचे काम पूर्ण करण्याची मार्च २०२१ ही अंतिम मुदत निश्चित करण्यात आली असली, तरी बीड बायपासचे काम साधारणपणे डिसेंबर २०२० अखेरपर्यंत पूर्ण होऊ शकते. - अजय गाडेकर, प्रकल्प संचालक 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादhighwayमहामार्गtourismपर्यटन