शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

ना अध्यक्ष ना निधी; मराठवाडा विकास मंडळाची पुन्हा उपेक्षा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 12, 2018 13:04 IST

राज्यातील मंडळांच्या अध्यक्षांची म्हणजे विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळ अध्यक्षांची नावे सरकारने जाहीर केली; परंतु मराठवाडा विकास मंडळ अध्यक्षाचे नाव जाहीर केले नाही. 

औरंगाबाद : मराठवाडा विकास मंडळाची सरकारने पुन्हा उपेक्षा केली आहे. राज्यातील मंडळांच्या अध्यक्षांची म्हणजे विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्र मंडळ अध्यक्षांची नावे सरकारने जाहीर केली; परंतु मराठवाडा विकास मंडळ अध्यक्षाचे नाव जाहीर केले नाही. 

मराठवाड्याचा अनुशेष दूर करणे, हक्काचे पाणी मिळवून देणे, तसेच विविध विकासकामांबाबत राज्यपालांना शिफारशी करून पदरात निधीचे माप पाडून घेण्याचे काम करणारे मराठवाडा विकास मंडळ नामधारी ठरू पाहत आहे. मराठवाडा, विदर्भ आणि उर्वरित महाराष्ट्रासाठी १९९४ यावर्षी राष्ट्रपतींच्या आदेशावरून वैधानिक विकास मंडळाची स्थापना करण्यात आली. मराठवाडा वैधानिक विकास मंडळाचे पहिले अध्यक्ष होण्याचा बहुमान कमलकिशोर कदम यांना गेला. त्यानंतर युतीच्या राज्यात दिवाकर रावते, प्रताप बांगर यांनी अध्यक्षपद भूषविले.

मधुकरराव चव्हाण यांनी १९९९ ते २००९ अशी दहा वर्षे मंडळाचे अध्यक्ष म्हणून काम  बघितले. चार वर्षांपासून येथील अध्यक्षपद सेना-भाजपच्या राजकारणात अडकले. भाजपकडून डॉ.भागवत कराड, संजय केणेकर, तर शिवसेनेकडून राज्यमंत्री अर्जुन खोतकर आदींच्या नावाची चर्चा होत राहिली. अखेरीस डॉ.कराड यांना अध्यक्षपद देण्याचे ठरले; परंतु त्यांचे नाव ऐनवेळी जाहीर झाले नसल्याची माहिती सूत्रांनी दिली. 

आदिवासींचे सर्वेक्षण ठरले अखेरचेनिधीअभावी मंडळाकडे सर्वेक्षण आणि संशोधनाचेच काम उरले आहे. २०११ यावर्षी मराठवाड्यातील आदिवासींच्या जीवनमानावर केलेले सर्वेक्षण हे अखेरचे सर्वेक्षण ठरले आहे. त्यानंतर मंडळात कोणतेही सर्वेक्षण अथवा संशोधन झालेले नाही.

महसूलमंत्री म्हणालेमुख्यमंत्री दौऱ्यावर जाण्यापूर्वी ज्या घोषणा करायचे सांगून गेले होते. तेवढ्याच्य केल्या. उर्वरित मंडळांच्या घोषणा ते परतल्यावर होतील, असे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ना अध्यक्ष ना निधीगेल्या आठ वर्षांपासून मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष मिळालेला नाही. राज्यमंत्रीपदाचा अध्यक्षपदी आपली नियुक्ती व्हावी, यासाठी सत्ताधारी आमदारांनी प्रयत्न केले होते; परंतु त्यांना यश आले नाही. राज्यात सत्तांतर झाल्यानंतरही मंडळाला पूर्णवेळ अध्यक्ष नाही. अर्थतज्ज्ञ आर. पी. कुरूलकर यांच्यानंतर तत्कालीन विभागीय आयुक्त भास्कर मुंढे, संजीव जायस्वाल यांनी अध्यक्षपद  सांभाळले. तत्कालीन विभागीय आयुक्त उमाकांत दांगट यांच्याकडे अध्यक्षपदाची सूत्रे आली. त्यानंतर सध्याचे आयुक्त डॉ.भापकर यांच्याकडे अध्यक्षपदाचा पदभार आहे. 

टॅग्स :MarathwadaमराठवाडाState Governmentराज्य सरकारfundsनिधी