शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

लोह्याची नेहा ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत टॉपर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 16:02 IST

खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये एकाच वेळी यश मिळवण्याचा विक्रम केला आहे.

औरंगाबाद : मेहनत, जिद्द आणि चिकाटीने प्रयत्न केल्यास यश निश्चितच मिळते. याचा प्रत्यय नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील नेहा नरेंद्र पवार हिला आला आहे. खाजगी कंपनीतील नोकरी सोडून अधिकारी होण्याचे स्वप्न पाहणाऱ्या नेहाने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) दोन परीक्षांमध्ये टॉपर येण्याचा विक्रम केला आहे.

एमपीएससी परीक्षेच्या माध्यमातुन अधिकारी होण्यासाठी राज्यातील लाखो विद्यार्थी रात्रंदिवस मेहनत करतात. यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद सारख्या शहरांमध्ये राहून खाजगी शिकवणी लावतात. मात्र प्रत्येक वर्षी तुटपुंज्या जागा निघाल्यामुळे अनेकांना मेहनत करूनही संधी मिळत नाही. यात आपला नंबर लागलाच पाहिजे, यासाठी प्रत्येकजण प्रयत्नाची परकाष्टा करतो. नांदेड जिल्ह्यातील लोहा येथील रहिवाशी असलेल्या नेहा नरेंद्र पवार या विद्यार्थिनींने एमपीएससीच्या एकच नव्हे तर दोन परीक्षेत यश मिळविले.

विक्रिकर निरिक्षक या परीक्षेचा निकाल २ मे रोजी जाहीर झाला. एमपीएससीतर्फे घेतलेल्या सहायक कक्ष अधिकारी पदासाठीच्या परीक्षेचा निकाल २१ एप्रिल रोजी लागला. यात सहायक कक्ष अधिकारी पदाच्या परीक्षेत पहिल्या आणि विक्रिकर निरिक्षकमध्ये दुसऱ्या प्रयत्नात महिला खुल्या गटात तिसरा आणि पहिला क्रमांकाने उत्तीर्ण होण्याचा बहुमान नेहाने पटकावला. या दुहेरी यशामुळे नांदेड जिल्ह्यात नेहाचे सर्वत्र कौतुक होत आहे. वडिलांच्या निधनानंतर कुटुंबातील व्यक्तींनी केलेल्या सहकार्यामुळेच हे यश मिळवता आले असल्याचे नेहाने ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.

कौटुंबिक पार्श्वभूमी बेताचीचनांदेड जिल्ह्यातील लोह्याची रहिवाशी असलेल्या नेहाच्या वडिलांचे १८ वर्षांपुर्वीच निधन झालेले आहे. यानंतर आईनेच दोन्ही मुलींचा सांभाळ करत शिक्षण दिले. नेहाची मोठी बहिण नयना हिने एमपीएससीची तयारी करत विक्रिकर निरिक्षक परीक्षेत यश मिळवले. नेहानेही अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर पुण्यातील नामांकित खाजगी कंपनीत नोकरी सुरू केली. मात्र बहिणीच्या पावलावर पाऊल ठेवत अधिकारी होण्यासाठी नोकरीचा राजीनामा देत नांदेड येथे स्पर्धा परीक्षांची तयारी सुरू केली. 

राज्यसेवा परीक्षेत यश मिळवायचे आहे कोणत्याही प्रकारचे क्लासेस न लावताही  ‘एमपीएससी’च्या दोन परीक्षेत यश मिळवले. मात्र यावरच समाधान न मानता राज्यसेवा परीक्षेत यश मिळवायचे आहे. उपजिल्हाधिकारी होण्याचे स्वप्न पाहिले आहे. ते पूर्ण करणार आहे. त्यासाठी तयारी सुरू आहे. - नेह पवार

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रexamपरीक्षाSales Tax Officeविक्रीकर कार्यालय