शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

मस्तवाल घोड्याचा लगाम हातात घेण्याची गरज : बाळासाहेब आंबेडकर 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2019 13:34 IST

जाहीर सभेत भाजप-सेनेवर घणाघाती टीका

ठळक मुद्देमुख्यमंत्री व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची भाषा हुकूमशाहीची असदुद्दीन ओवेसी हा चांगला माणूस आहे, पण त्यांचे साथीदार चुकीचे राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला ‘राफेलवर बोलू नको’

औरंगाबाद : या निवडणुकीत चूक झाली तर पुन्हा  संधी मिळेल, असे वाटत नाही. मुख्यमंत्र्यांनी व भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची हिंमत असेल तर करून दाखवा वगैरे ही भाषा हुकूमशाहीची आहे. ती लोकशाहीला पूरक नाही. आम्हाला अडवणार कोण, असा आभास निर्माण केला जात आहे. हुकूमशाही प्रवृत्तीला जनताच काबूत आणत असते. यांचा मस्तवाल व बेलगाम घोडा उधळलेला आहे. त्याला वठणीवर आणण्याची गरज आहे व त्याचा लगाम तमाम वंचितांनी हातात घेण्याची गरज आहे, असे स्पष्ट प्रतिपादन आज येथे वंबआचे सर्वेसर्वा अ‍ॅड.बाळासाहेब आंबेडकर यांनी केले व युतीवर टीकेची झोड उठविली. 

ते आमखास मैदानावर आयोजित जाहीर सभेत बोलत होते. सभेला मोठी गर्दी होती.‘असदुद्दीन ओवेसी हा चांगला माणूस आहे, पण त्यांचे साथीदार चुकीचे आहेत, असा टोला त्यांनी इम्तियाज जलील यांचे नाव न घेता मारला व मुुस्लिम बांधवांना वंबआबरोबर राहण्याचे आवाहन केले. वंबआ सत्तेत आल्यास घनकचऱ्यापासून वीज निर्मिती करण्याचे व उकाई धरणाचे पाणी औरंगाबादपर्यंत आणण्याचे आश्वासन आंबेडकर यांनी दिले. मध्यचे अमित भुईगळ, फुलंब्रीचे जगन्नाथ रिठे, औरंगाबाद पश्चिमचे संदीप शिरसाट, पैठणचे विजय चव्हाण या उमेदवारांची भाषणे झाली. ऑल इंडिया उलेमा बोर्डाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष  नायब अन्सारी यांनी बाळासाहेब आंबेडकर यांची प्रशंसा करीत मुस्लिम समाजाच्या मागण्या तात्काळ मान्य करणारे ते एकमेव नेते होत, असे सांगताच टाळ्यांचा कडकडाट झाला. गोविंद दळवी यांनी, आता वंचित बहुजन आघाडीची लढाई भाजप- सेनेविरुद्ध असल्याचे जाहीर केले. रवी तायडे यांनी सूत्रसंचालन केले तर जिल्हाध्यक्ष महेश निनाळे यांनी आभार मानले. प्रारंभी, समता सैनिक दलाने बाळासाहेबांना सलामी दिली. 

राहुल गांधींना प्रेमाचा सल्ला ‘राफेलवर बोलू नको’बाळासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण भाषणात राहुल गांधी यांचा उल्लेख असा केला : हा राहुल गांधी का प्रचारात आला? कुंभकर्णासारखा झोपला होता, हेच बरं होतं. ३७०, राफेलचा महाराष्ट्राच्या निवडणुकीत काय संबंध? राहुलला माझा प्रेमाचा सल्ला आहे. राफेलवर बोलू नकोस. पोरं तुझी टिंगल करतात. राफेलवर  मनमोहनसिंग यांनी अधिकृतपणे बोलावं. त्यांनी तोंड उघडलं तर नरेंद्र मोदी यांचे कपडे फाटतील.

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019aurangabad-central-acऔरंगाबाद मध्यaurangabad-west-acऔरंगाबाद पश्चिमphulambri-acफुलंब्रीpaithan-acपैठण