शहरं
Join us  
Trending Stories
1
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
2
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
3
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
4
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
5
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
6
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
7
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
8
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
9
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
10
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
11
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
12
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
13
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
14
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
15
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
16
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
17
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
18
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
19
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
20
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...

भाषा विकासासाठी सर्वसमावेशक संमेलनांची गरज, लोकमत परिचर्चेत लेखक, प्रकाशक व वाचकांनी व्यक्त केले मत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2017 20:07 IST

लोकमत भवन येथे पार पडलेल्या या परिचर्चेत समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला होता.

मयूर देवकरऔरंगाबाद : ‘समाजातील सर्व घटकांना समान प्रतिनिधित्व मिळवून देणाºया सर्वसमावेशक संमेलनाची आजच्या काळात गरज आहे. तरच भाषेचा विकास होईल. अन्यथा केवळ तीन दिवसांचा उत्सव याखेरीज संमेलनांना काहीच महत्त्व उरणार नाही, असे मत औरंगाबाद शहरातील साहित्यिक, प्रकाशक आणि लेखकांनी ‘लोकमत’तर्फे  आयोजित परिचर्चेत व्यक्त केले. 

शनिवारी लोकमत भवन येथे पार पडलेल्या या परिचर्चेत समीक्षक डॉ. ऋषिकेश कांबळे, प्रकाशक श्याम देशपांडे, प्रा. कैलास अंभुरे, प्रा. प्रतिभा अहिरे, कवयित्री प्रिया धारूरकर आणि पुस्तक चावडीचे सारंग टाकळकर यांनी सहभाग घेतला होता.

९१ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या पार्श्वभूमीवर संमेलनाच्या स्वरुपाच्या ठरलेल्या चौकटींच्या मर्यादा व नवे पर्याय याविषयी साहित्य वर्तुळातील मान्यवरांकडून जाणून घेण्यासाठी या परिचर्चेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये डॉ. कांबळे यांनी संमेलनाध्यक्षांनी केवळ भाषणे करीत राहण्यापेक्षा नवसाहित्यिकांचा विकास करण्यासाठी कार्यशाळा व उपक्रम होती घेण्याचा सल्ला दिला. एकदा सहभागी झालेल्या लेखकांना किमान दोन वर्षे तरी बोलवू नये. त्यामुळे नवीन लोकांना संधी मिळेल, अशी डॉ. अंभुरे यांनी सूचना केली.

‘प्रकाशकांची त्यांच्या लेखी काही किंमत नाही. त्यामुळे आता प्रकाशकांनाही अशा संमेलनांविषयी फारसे स्वारस्य वाटत नाही’ असे देशपांडे म्हणाले. डॉ. अहिरे म्हणाल्या की, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनांमध्ये समाजातील विविध घटकांना जे प्रतिनिधित्व मिळायला हवे ते मिळत नाही. त्यामुळेच विविध छोटी-छोटी संमेलने होऊ लागली. 

टाकळकर यांनी सांगितले की, संमेलनाला उत्सवी स्वरूप देऊन ती ‘इव्हेंट’ म्हणूनच गाजविली जातात. ‘केवळ आपल्या मर्जीतील किंवा ‘अभय’ असणाºयांनाच येथे संधी मिळते. विरोध करणाºया अनेक लेखक-कवींना जाणूनबुजून बाजूला केले जाते, असे धारूरकर म्हणाल्या.

- घटक संस्थांच्या सर्व आजीवन सभासदांना मतदानाचा अधिकार द्यावा, मतदारांची संख्या वाढवावी.- गट, वर्तुळ, धर्म, प्रदेश, विचारधारा, लिंग यापलीकडे जाऊन लेखकांना सामावून घेणे.- परिसंवादातील कालबाह्य झालेले विषय बदलून समकालीन विषयांवर चर्चा घडवून आणावी.- समाजातील सर्व घटकांना योग्य प्रतिनिधित्व मिळणे.- संमेलनाला उत्सवी रूप नाही तर सामाजिक-सांस्कृतिक चळवळीचे स्वरूप देणे. 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबाद