शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

स्ट्रेचर हवे? मग मोबाइल नाही, तर गाडीची चावी गहाण ठेवा; रुग्णाला उपचारात होतोय उशीर

By संतोष हिरेमठ | Updated: January 30, 2025 18:53 IST

छत्रपती संभाजीनगरातील शासकीय रुग्णालय घाटी येथील धक्कादायक प्रकार; एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे.

छत्रपती संभाजीनगर : घाटी रुग्णालयात स्ट्रेचर किंवा व्हीलचेअर हवी असेल, तर फक्त रुग्णाची अवस्था दाखवून भागत नाही. आधी तुमचा मोबाइल, दुचाकीची चावी किंवा घराची चावी एक प्रकारे गहाण ठेवावी लागेल, मगच स्ट्रेचर, व्हीलचेअर मिळेल. सरकारी रुग्णालयात मोफत सुविधा मिळाव्यात, अशी अपेक्षा असते, पण घाटीच्या ओपीडीत, तर काही तरी वेगळेच सुरू आहे.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाइकांसाठी ही पद्धत मोठी डोकेदुखी ठरत आहे. ओपीडीत स्ट्रेचर आणि व्हीलचेअर उपलब्ध असल्या, तरी त्या सहजासहजी मिळत नाहीत. एकीकडे स्ट्रेचर नातेवाइकांनाच ढकलावे लागते. त्यात आता मोबाइल किंवा चावी ठेवूनच स्ट्रेचर देण्याचा प्रकार सुरू आहे. एखाद्या गंभीर रुग्णाला आणताना नातेवाईक आधी मदतीसाठी धावतात, पण इथेच त्यांना अडवले जाते. आधी मोबाइल, अथवा गाडीची चावी ठेवा, मग स्ट्रेचर घेऊन जा, असे ओपीडीत सांगितले जाते. यामुळे अनेक वेळा रुग्णांच्या उपचारात विलंब होतो. ही पद्धत चुकीची असून, रुग्णालय प्रशासनाने त्वरित यावर उपाययोजना करायला हवी, अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांकडून होत आहे.

मोबाइलच नसेल तर?घाटीत बहुतांश गोरगरीब रुग्ण येतात. एखाद्या रुग्णाकडे, नातेवाइकाकडे मोबाइलच नसेल तर? मग त्याने स्ट्रेचर घ्यायचे नाही का? प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन हा प्रकार बंद करून स्ट्रेचर मिळवण्याची प्रक्रिया सोपी करायला हवी. यासाठी ओपीडीबाहेर पुरेसे स्ट्रेचर्स आणि व्हीलचेअर्स ठेवण्याची व्यवस्था करावी. स्ट्रेचर नेल्यानंतर परत ओपीडीत आणून ठेवण्याची सक्ती न करता त्याची जबाबदारी कर्मचाऱ्यांवर सोपवणे गरजेचे आहे.

२० स्ट्रेचरओपीडीत २० स्ट्रेचर आणि एक व्हीलचेअर आहे, परंतु ते मिळविण्यासाठी नातेवाइकांना मोठा खटाटोप करावा लागतो.

हा प्रकार बंद करूस्ट्रेचरसाठी मोबाइल, गाडीची चावी ठेवून घेण्याचा प्रकार कळला आहे. यासंदर्भात संबंधित कर्मचाऱ्यांना सूचना दिली जाईल आणि हा प्रकार बंद केला जाईल. रुग्णांना सहजतेने स्ट्रेचर मिळतील.- डाॅ. सुरेश हरबडे, वैद्यकीय अधीक्षक

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरgovermnet hospital ghatiशासकीय रुग्णालय घाटीHealthआरोग्य