शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या माजी शहराध्यक्षाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 22, 2020 19:34 IST

राष्ट्रवादी भवनातील प्रकार

ठळक मुद्देखा. सुप्रिया सुळे यांच्या भेटीसाठी आला होता पदाधिकारी

औरंगाबाद : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खा. सुप्रिया सुळे राष्ट्रवादी भवनमध्ये संवाद साधत असतानाच त्यांना भेटण्यासाठी आलेले राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष अ‍ॅड. तुषार पाटील शेजवळ यांनी विद्यमान शहराध्यक्ष विजयराव साळवे, कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी बेदम मारहाण केली. तसेच जिवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप करणारे निवेदन उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पाठविले आहे.

खा. सुप्रिया सुळे यांनी गुरुवारी सायंकाळी राष्ट्रवादी भवनमध्ये महापालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्याचवेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस तथा  कोकण विभागीय निरीक्षक अ‍ॅड. तुषार शेजवळ पाटील यांना बेदम मारहाण झाल्याचा प्रकार रात्री अकरा वाजता घडला आहे. याविषयी अ‍ॅड. शेजवळ यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मेलद्वारे तक्रार केली आहे. या तक्रारीत म्हटले की, खा. सुळे या महापालिका निवडणुकीची आढावा बैठक घेत होत्या. त्या बैठकीत नगरसेवकपदाची उमेदवारी मिळावी, याविषयी मत मांडले. बैठकीनंतर शहर कार्याध्यक्ष अभिषेक देशमुख यांनी माझा हात पकडून जोरात धक्का मारून ‘तू खूप माजला का?’ असा सवाल केला. तेव्हा शहराध्यक्ष विजयराव साळवे हे आले. त्यांनी थेट मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच कार्यकर्त्यांना मारण्यास सांगितले. साळवेंपासून जिवाला धोका असून, यातत पक्षाने लक्ष घालावे, अशाी मागणी केली.

काही दिवसांपूर्वी शहराध्यक्ष बदलण्याच्या हालचाली सुरू होत्या. तेव्हा बारामतीमध्ये शरद पवार यांची भेट घेऊन शहराध्यक्ष निवडताना संधी देण्याची मागणी केली होती. औरंगाबादच्या दौऱ्यावर असताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनाही निवेदन दिले होते. त्यामुळेच मला मारहाण करण्यात आली आहे. पक्षाची बदनामी होऊ नये म्हणून पोलिसात तक्रार दिली नाही.-अ‍ॅड. तुषार  पाटील शेजवळ, माजी शहराध्यक्ष

मारहाणीचा प्रकार घडलाच नाहीराष्ट्रवादी भवनमध्ये गुरुवारी सायंकाळी खा. सुप्रिया सुळे आल्या होत्या. महानगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला. बैठक अतिशय चांगली झाली. मात्र अ‍ॅड. तुषार पाटील यांना मारहाण झाल्याचा प्रकार घडलेला नाही. त्यांनी कशामुळे उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली, याची शहानिशा करावी लागेल. त्याविषयी अधिक माहिती नाही.-अभिषेक देशमुख, शहर कार्याध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसAurangabadऔरंगाबादSupriya Suleसुप्रिया सुळे