शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेसची पुनर्बांधणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2019 16:41 IST

ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे.

औरंगाबाद : मुंबई ते नागपूर असा समृद्धी महामार्ग बनविण्यात येत आहे. या महामार्गाला कोणतीही बँक कर्ज देण्यास तयार होत नाही. या प्रकल्पामागे आर्थिक व्यवहार्यता नसल्याचे स्पष्ट होत आहे. त्यामुळे तत्कालीन राज्य शासनाने म्हाडा, सिडकोसारख्या समृद्ध महामंडळाकडून कर्ज घेतले आहे. यातून राज्याची आर्थिक शिस्त बिघडली असल्याचा आरोप मराठवाडा पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण यांनी गुरुवारी केला.

मराठवाड्याचा युवावक्ता वक्तृत्व स्पर्धेच्या आयोजनाची माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. मराठवाड्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला अपेक्षित यश मिळाले नाही. याकडे लक्ष वेधले असता, चव्हाण म्हणाले, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद आदी जिल्ह्यांमध्ये ऐन निवडणुकीच्या तोंडावरच मोठ्या प्रमाणात पक्षांतर झाले. त्यामुळे पक्षाची पुनर्बांधणी करावी लागणार आहे. याविषयीचा निर्णय प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी घेतला आहे. मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर प्रत्येक जिल्ह्याची जबाबदारी वरिष्ठ मंत्री, नेत्यांना दिली जाणार आहे. 

बीड, जालना, परभणी जिल्ह्यांत संघटनात्मक बाजू मजबूत आहे. त्यामुळे प्रदेश पातळीवरूनच उर्वरित जिल्ह्यांत पुनर्बांधणीला प्राधान्य देण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मराठवाड्यातील राष्ट्रवादीची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत. शरद पवार यांना मानणारा मोठा वर्ग आहे. ईडीची नोटीस, पावसातील सभा आणि एकटे पाडण्याचा परिणाम राष्ट्रवादीपासून दूर गेलेला युवक परत आला आहे. त्याचा फायदाही पक्षबांधणीला होणार असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले.

संघातील अनेकांचे अर्ज दाखल केलेमराठवाडा पदवीधर मतदारसंघातील मतदार नोंदणीची तयारी पूर्णत्वाकडे पोहोचली असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आपल्याकडून अनेकांचे फॉर्म दाखल केले असल्याचे विचारले असता, त्यांनी हा आरोप फेटाळून लावला. भाजप समर्थकच नव्हे तर संघाच्या अनेकांचे फॉर्म माझ्या कार्यालयामार्फत भरण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले. यासाठीचा पुरावाही त्यांनी दिला. 

वॉटर ग्रीड प्रकल्प ही निव्वळ धूळफेकभाजपच्या काळात मराठवाड्यात पिण्याच्या पाण्यासाठी वॉटर ग्रीड योजना राबविणार असल्याचे सांगितले होते. ही निव्वळ जनतेच्या डोळ्यात धूळफेक असल्याचे आ. चव्हाण यांनी सांगितले. पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोध नाही. मात्र वैनगंगा, पैनगंगा आदी नद्यांचे पाणी जायकवाडीत आणण्याचे स्वप्न रंगविले जाते. मात्र प्रत्यक्षात ते शक्य नाही. या योजनेची उपयोगिता तपासण्यासाठी इस्रायल कंपनीला काम दिले आहे. हासुद्धा पैशांचा अपव्यय असल्याचा आरोप आ. चव्हाण यांनी केला.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसSatish Chavanसतीश चव्हाणMarathwadaमराठवाडाMSP Mandalमराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ