शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी कुटुंबाची नायब तहसीलदारास शिवीगाळ करून मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 3, 2020 19:26 IST

चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल 

ठळक मुद्देमहसूल कर्मचाऱ्यांची पोलीस ठाण्यात गर्दी

खुलताबाद : नवीन विहिरीचे ब्लास्टिंगचे काम महसूल विभागाने पंचनामा करून बंद केल्याचा राग अनावर होऊन एका शेतकऱ्याने बायको व दोन मुलासंह तहसील कार्यालयात येऊन नायब तहसीलदार व कर्मचारी यांना शिवीगाळ करून मारहाण केली. यामुळे महसूल कर्मचाऱ्यांनी काम बंद करून खुलताबाद पोलीस ठाण्यात धाव घेतली. नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खुलताबाद तालुक्यातील शूलिभंजन येथील प्रभाकर दामू वरपे यांनी गट नंबर २६ मध्ये शेती आहे. या शेतात नवीन विहिरीचे काम सुरू असल्याने सदर विहिरीत ब्लास्टिंग घेत आहे. सदरील ब्लास्टिंगमुळे परिसरातील घरांवर दगडे व हादरे बसत असल्याची तक्रार तहसीलदार खुलताबाद व उपविभागीय अधिकारी कन्नड यांच्याकडे भीमशक्ती संघटनेच्या तालुकाध्यक्षा मंगलबाई बनकर व भाऊ विठ्ठल दामू वरपे यांनी ९ व १५ फेब्रुवारी रोजी केली होती. तक्रारीच्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी, कन्नड यांनी खुलताबादचे तलाठी डी.पी. गोरे यांना अहवाल सादर करण्याचे लेखी कळविले होते. सोमवारी (दि.३) प्रभाकर वरपे त्यांची बायको व मुलगा यांनी सकाळी साडेअकरा वाजेच्या सुमारास तहसील कार्यालयात जाऊन नायब तहसीलदार अशोक कापसे व कर्मचाऱ्यांना शिवीगाळ करून मारहाण केली. तहसील कार्यालयात सुरू असलेल्या या राड्यामुळे पोलिसांना पाचारण करण्यात येऊन संबंधित शेतकऱ्यास पोलीस ठाण्यात नेण्यात आले. खुलताबाद तहसील कार्यालयाचे अधिकारी-कर्मचारी यांनी कामकाज बंद करून पोलीस ठाण्यात जमा होऊन गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. यावेळी महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष आर.एल. चंदेल व कर्मचारी उपस्थित होते.दरम्यान, नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी खुलताबाद पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून प्रभाकर वरपे, त्याची बायको व दोन मुले यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणून शिवीगाळ करून मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक पंकज उदावंत करीत आहेत.शनिवारीही केली होती अरेरावी तलाठी डी.पी. गोरे यांनी शनिवारी (दि.१) शूलिभंजन येथील प्रभाकर दामू वरपे यांच्या ब्लास्टिंग सुरू असलेल्या विहिरीचा पंचनामा केला होता. दरम्यान प्रभाकर वरपे याने बायको व मुलासह शनिवारी दुपारीच तहसील कार्यालयात जाऊन अव्वल कारकून राऊत व लिपिक पांढरे यांच्याशी अरेरावी करून शिवीगाळ केली होती. यावेळी नायब तहसीलदार अशोक कापसे यांनी त्यांची समजूत घालून परत पाठवले होते.न्याय देण्याची मागणीशेतकरी प्रभाकर वरपे म्हणाले की, आम्ही न्याय मागण्यासाठी तहसील कार्यालयात गेलो असता उडवा उडवीची उत्तरे महसूलचे अधिकारी देत होते. मला व बायकोस शिवीगाळ करून लोटालोट केली असून याप्रकरणी न्याय देण्याची मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादPoliceपोलिसRevenue Departmentमहसूल विभाग