शहरं
Join us  
Trending Stories
1
आता बिगुल वाजणार! "४ आठवड्यांच्या आत..."; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबद्दल SC चा महत्त्वाचा निकाल
2
Cashless Treatment Scheme: अपघातातील जखमींवर होणार कॅशलेस उपचार, नवी योजना लागू; केंद्राने काढली अधिसूचना
3
पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतीस्थळ विकासासाठी ६८१ कोटींचा आराखडा; CM फडणवीसांची चौंडीत घोषणा
4
"मला वास्तवासोबत..."; बिग बॉस फेम अभिनेत्रीने सोडली इंडस्ट्री, निवडला अध्यात्माचा मार्ग
5
CID Recruitment: परीक्षा न देता सरकारी नोकरी, सीआयडीमध्ये 'या' पदासाठी भरती, 'इतका' पगार मिळणार!
6
पुन्हा सुरु होणार जीवघेणा खेळ! 'Squid Game 3' चा टीझर आऊट; रिलीज डेटही समोर
7
भारताने दहशतवादाविरोधात लढा द्यावा, आम्ही सोबत आहोत; अमेरिकेचा भारताला पाठिंबा...
8
दरमहा ५००० रुपयांची SIP केली तर किती वर्षात १ कोटी रुपये जमा होतील? गणित समजून घ्या
9
Noida Dog Attack: वॉक करणाऱ्या महिलेवर पाळीव कुत्र्याचा हल्ला; जीव वाचवायला गेली आणि अन्...
10
भारतीय अब्जाधीशाला दुबईमध्ये तुरुंगवास, मुलासह ३२ जणांना शिक्षा; कोण आहे व्यक्ती, प्रकरण काय?
11
७ मे रोजी देशभरात वॉर मॉक ड्रिल; सामान्य नागरिक म्हणून आपण करायच्या 'या' १० गोष्टी 
12
जातीय जनगणनेबाबत मल्लिकार्जुन खरगे यांचे पीएम मोदींना पत्र; केल्या तीन महत्वाच्या सूचना...
13
नवऱ्यासोबत पहिल्यांदाच काम करणार मराठी अभिनेत्री; आनंद व्यक्त करत म्हणाली, "तो दिग्दर्शक..."
14
UNSC बैठकीत अमेरिका, फ्रान्सनं पाकिस्तानला फटकारलं; चीननेही दिला गुलीगत धोका
15
"आम्हाला सैन्यात भरती करा, बॉर्डरवर लढू"; पाकिस्तानला गेली गर्भवती पत्नी, तरुणाची मोठी मागणी
16
सिंधु करार मोडून भारताने उचललं मोठं पाऊल! पाकिस्तानात नेमकी किती पाणी टंचाई भासणार?
17
पाकिस्तान विरोधात मोठी तयारी! अजित डोवाल यांनी २४ तासांत दुसऱ्यांदा पंतप्रधान मोदींची भेट घेतली
18
३२८ रुपयांवर लिस्ट झाला Ather Energy IPO; लिस्टिंगनंतर शेअर जोरदार आपटला, शेअर विकायला रांग
19
टीसीएसमध्ये पगारवाढ नाही! पण, ७० टक्के कर्मचाऱ्यांना मिळाली गुड न्यूज; काय आहे कारण?
20
रशियाकडून भारताकडे युद्धनौका निघणार, याच महिन्यात पोहोचणार; रडारही पकडू शकणार नाही, ब्राह्मोस क्षेपणास्त्र डागणार...

राष्ट्रवादी रस्त्यावर !

By admin | Updated: January 9, 2017 23:42 IST

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत.

उस्मानाबाद : केंद्र शासनाने केलेल्या नोटबंदीमुळे शेतकऱ्यांसह शेतमजूर, व्यापारी आणि लहान-मोठे व्यावसायिक अडचणीत आले आहेत. ग्रामीण भागातील अर्थव्यवस्था अक्षरश: खिळखिळी झाली आहे. चलन तुटवडा असल्याने बाजारपेठेतही शुकशुकाट आहे. शेतीमालाला उठाव नसल्याने शेतकऱ्यांवर कर्जबाजारी होण्याची वेळ आली आहे. असे असतानाही शासनाकडून कुठल्याही स्वरूपाच्या ठोस उपाययोजना होत नसल्याचा आरोप करीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाभरात आंदोलने करण्यात आली. नळदुर्गसह उमरग्यात रास्तारोको, तर कळंब, भूम, परंडा, लोहारा आणि वाशी येथे धरणे आंदोलन करण्यात आले. केंद्र शासनाने ८ नोव्हेंबरच्या रात्री अचानक नोटाबंदीचा निर्णय जाहीर केला. या निर्णयान्वये पाचशे आणि हजार रूपयांच्या नोटा चलनातून बाद झाल्या. तेव्हापासून ते आजतागायत जिल्हाभरात चलनकल्लोळ सुरूच आहे. या नोटबंदीचा सर्वाधिक फटका शेतकऱ्यांसह शेतमजुरांना बसला आहे. शेतीमालाचे दर प्रचंड घसरले आहेत. असे असतानाही शासनाकडून ग्रामीण भागात आवश्यकतेनुसार चलन उपलब्ध करून दिले जात नाही. शासनाच्या या धोरणाविरूद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे. सोमवारी प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी आंदोलने करून उपरोक्त प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधले. तहसील कार्यालयावर मोर्चापरंडा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चामध्ये तालुकाध्यक्ष अ‍ॅड. संदीप पाटील, नवनाथ जगताप, शहराध्यक्ष वाजीद दखणी, युवक तालुकाध्यक्ष धनंजय हांडे, अ‍ॅड. सुभाष वेताळ, बापू मिस्किन, भाऊसाहेब खरसडे, अ‍ॅड. जफर जिनेरी, अ‍ॅड. सुहास पाटील, राहुल बनसोडे, जावेद पठाण, राजकुमार देशमुख, रवी मोरे, अमोल जगताप, सचिन पाटील, सुधाकर कोकाटे, घनशाम शिंदे, पोपट चव्हाण, महावीर भोई, नंदू शिंदे, श्रीहरी नाईकवाडी, विक्रम ढोरे, नाना मांडवेसह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते. मोर्चानंतर कार्यकर्त्यांनी तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करुन सरकारविरोधी घोषणाबाजी केली. पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तहसीलदार स्वरूप कंकाळ यांना निवेदन देण्यात आले.लोहाऱ्यात धरणे आंदोलनलोहारा तालुका राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने लोहारा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अच्युत साठे, राष्ट्रवादी कॉग्रेसचे जिल्हा सरचिटणीस शब्बीर गवंडी, युवक तालुकाध्यक्ष अजित जाधव, उपनगराध्यक्षा नाजमीन शेख, बाजार समितीचे माजी सभापती दयानंद गिरी, बाजार समितीचे संचालक अनंत गोरे, गटनेते गगन माळवदकर, नगरसेवक आयुब शेख, नगरसेविका जयश्रीताई वाघमारे, शहराध्यक्ष आयुब हबीब शेख, नरदेव कदम, विजयकुमार लोमटे, कानेगावचे माजी सरपंच उज्वल कदम, प्रकाश भगत, दिलीप शिंदे, गोविंद साळुंके, बळीराम लव्हळे, निहाल मुजावर, सुरेश दंडगुले, जाकीर कुरेशी आदी उपस्थित होते.कळंबमध्ये ‘जनआक्रोश’केंद्र शासनाच्या शेतकरी विरोधी धोरणाच्या निषेधार्थ कळंबमध्ये ‘जनआक्रोश’ आंदोलन करून तहसीलदारांना निवेदन देण्यात आाले. यावेळी कळंब पालिकेच्या नगराध्यक्षा सुवर्णा मुंडे, तालुकाध्यक्ष रामहारी शिंदे, भास्कर खोसे, उपनगराध्यक्ष संजय मुंदडा, कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती धनंजय वाघमारे, श्रीधर भवर, विकास बारकूल, प्रा. तुषार वाघमारे, शहराध्यक्ष सागर मुंडे, संदीप मडके, प्रा.संजय कांबळे, इंद्रजीत गायकवाड, अमर गायकवाड, औदुंबर धोंगडे, बालाजी भातलवंडे, संदीप मडके, प्रणव चव्हाण, तारीक मिर्झा आदी उपस्थित होते.भूममध्येही धरणे आंदोलननोटबंदीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वेठीस धरल्याचा आरोप करीत भूममध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी आमदार राहुल मोटे, तालुकाध्यक्ष हनुमंत पाटुळे, प्रतीकसिंह पाटील, ज्ञानेश्वर गीते, अरूण सोन्ने, सतीश सोन्ने, सभापती शिवाजी जालन, प्रवीण खटाळ, सभापती संजय पाटील, राहुल पाटील, संजय बोराडे, श्रीहरी बारस्कर, उध्दवराजे सस्ते, सुग्रीव दराडे, आदिनाथ पालके, राजकुमार घरत, राजाभाऊ हुंबे, दिग्विजय लोंढे आदी उपस्थित होते.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनउस्मानाबाद येथील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हा कार्याध्यक्ष सुरेश देशमुख, माजी नगराध्यक्ष संपत डोके, रामचंद्र पाटील, सभापती सुनिल खळदकर, सतीश दंडनाईक, भारत डोलारे, नगरसेवक अभय इंगळे, प्रदीप मुंडे, खलिफा कुरेशी, अभिजित काकडे, रोहित निंबाळकर, अमित शिंदे, दत्ता पेठे, ओम मगर, राजसिंह राजेनिंबाळकर, कैैलास पाटील, डॉ. इंद्रजित जाधव, अमित पडवळ यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी पदाधिकाऱ्यांनी शासन धोरणविरोधी घोषणाबाजी केली.(प्रतिनिधी)