शहरं
Join us  
Trending Stories
1
कोणत्याही परिस्थितीत पीडितेला न्याय अन् आराेपींना शिक्षा मिळेल; देवेंद्र फडणवीस यांची फलटणमध्ये ग्वाही
2
पाऊस पुन्हा मुक्कामी, मुसळधारेमुळे महामुंबईत धावपळ; ३० ऑक्टोबरपर्यंत मुंबईसह कोकणात मुसळधार
3
रशियावरच्या निर्बंधाने भारतीय तेल कंपन्या अडचणीत; फटका बसू नये म्हणून ONGC जाणार न्यायालयात
4
पश्चिम उपनगरातील वाहतूककोंडी सुटण्यास आणखी ३ वर्षे; गोरगाव ते ओशिवरा केबल-स्टेड पूल उभारणार
5
"मृत डॉक्टर तरुणीला तिच्यावर कोणत्या ठिकाणी बलात्कार झाले, हे..."; आरोपी गोपाळ बदनेच्या वकिलने कोर्टात काय म्हटलं?
6
देशभरातील आठ हजार शाळा ‘रिकाम्या’; २० हजार शिक्षक घेताहेत फुकटचा पगार
7
Womens World Cup 2025: पावसाचा 'षटकार'; ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या सेमीफायनलआधी टीम इंडियाला मोठा धक्का
8
Buldhana Crime: पुण्यावरून गावी निघाला अन् बापाने चिमुकल्या जुळ्या मुलींचा गळा चिरून केला खून
9
सलग दुसऱ्या दिवशीही प्रसूतिगृहाचा काेंडवाडा; सहा महिला वेटिंगवर, दाटीवाटीने लावले बेड
10
दिल्ली विद्यापीठाच्या विद्यार्थिनीवर ॲसिड हल्ला, ओळखीतल्याच तरुणाचं भ्याड कृत्य 
11
भारत-ऑस्ट्रेलियात नवी मुंबईमध्ये सेमीफायनल रंगणार, पावसामुळे सामना रद्द झाल्यास कोण फायनलमध्ये जाणार?
12
Nanded Crime: "मंगल माझ्याशी लग्न कर"; प्रेयसीकडे लावला तगादा, तिने नकार देताच संपवलं
13
Bihar Election: आजी-माजी आमदार, माजी मंत्र्यांसह १६ जणांची पक्षातून हकालपट्टी, नितीश कुमारांचा तडाखा
14
मतदार याद्यांत घोळ, मतचोरीचे आरोप, निवडणूक आयोग मोठा निर्णय घेणार, उद्या संध्याकाळी घोषणा करणार
15
मध्य रेल्वेच्या नागपूर विभागात 'रेल्वेला कवच'; आमला-परासिया मार्गावर झाली ट्रायल
16
पंकजा मुंडे यांचा मनोज जरांगेंना मैत्रीचा प्रस्ताव; म्हणाल्या, "आपल्या समाजांमधील दरी..."
17
"मुख्यमंत्रिपदाला जो नडला तो फोडला, अब तेरा क्या होगा मुरली ?’’ सुषमा अंधारेंचा खोचक टोला  
18
अजबच... असं कसं घडलं...? अल्बानियाची AI मंत्री 'डिएला' 'प्रेग्नेंट'! एकाच वेळी 83 बाळांना देणार जन्म
19
दिवाळी-छठपूजा उत्सवासाठी नागपूरहून पुणे, मुंबईकरिता स्पेशल ट्रेन, मध्य रेल्वेचा निर्णय, सोमवारी महाराष्ट्रात एकाच दिवशी २३ स्पेशल ट्रेन
20
कोण असणार देशाचे पुढचे सरन्यायाधीश? CJI बीआर गवईंनी केली घोषणा

'नेशन फर्स्ट'; सोशल मीडिया 'लाईव्ह'मधून भीमजयंती पोहचली ६ लाख घरांत

By सुमेध उघडे | Updated: April 14, 2020 05:38 IST

भीमजयंती : 'बोधिसत्व' फेसबुक पेजच्या माध्यमातून महिनाभर ऑनलाईन भीमजयंती

ठळक मुद्देमुंबई ते परळीतून नामवंत गायक लाईव्ह७ एप्रिलपासून सुरू झालेली ऑनलाइन भीमजयंती महिनाभर चालणार

- सुमेध उघडे

औरंगाबाद : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यावर्षीची भीम जयंती मोठ्याप्रमाणावर साजरी करता येणार नाही. मात्र 'बोधिसत्व' या फेसबुक पेजवर ऑनलाइन लोकसहभागातून वेगळ्या पद्धतीने भीमजयंती साजरी करण्यात येत आहे. ७ एप्रिलपासून दररोज संध्याकाळी ७ वाजता नामवंत कलाकारांचा आंबेडकरी 'जलसा' यावर सादर होत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा 'प्रथम आणि अंतिमतः भारतीय ' या विचारांचे पालन करत सुरू झालेली ही ऑनलाइन भीमजयंती १४ एप्रिलच्या पूर्वसंध्येपर्यंत ६ लाख घरात पोहचली असून संपूर्ण महिनाभर हा उपक्रम सुरू राहणार आहे.

देशविदेशात साजरी होणाऱ्या भीमजयंतीचे वैशिष्ट्य म्हणजे आंबडेकरी जलसा आणि प्रबोधनात्मक व्याख्याने याची महिनाभर पर्वणी. मात्र यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीम अनुयायांनी गर्दी करणारे उपक्रम टाळत साध्या पद्धतीने घरीच राहून भीमजयंती साजरी करण्याचे ठरवले आहे. दरम्यान, एकत्र जमता येत नसले तरी सोशल मीडियाच्या माध्यमातून जयंतीचे कार्यक्रम घराघरात पोहचवता येतील असा विचार निखिल बोर्डे या युवकाच्या मनात आला. त्याने लागलीच  'बोधिसत्व' या फेसबुक पेजच्या माध्यमातून ७ एप्रिलपासून नामवंत गायक-शाहीर यांचा 'जलसा' घराघरात पोचवण्याचे नियोजन केले. यात गायकांनी स्वतःच्या घरात राहून संध्याकाळी ७ वाजता बोधिसत्वच्या फेसबुक पेजवर लाईव्ह गायन सादर केले. याला सोशल मीडियात चांगला प्रतिसाद मिळाला असून १३ एप्रिलपर्यंत हे सादरीकरण ६ लाख घरात पोहचले आहे. सुरुवातीला केवळ १३ एप्रिलपर्यंतच हा 'ऑनलाइन भीमजयंती जलसा' नियोजित होता. मात्र लॉकडाऊन वाढल्याने आता ३० एप्रिलपर्यंत राज्यभरातील इतर नामवंत कलाकारांना घेऊन ही ऑनलाइन भीमजयंती पुढे चालूच राहणार असल्याचे निखिल याने सांगितले.

मुंबई ते परळीतून गायक लाईव्हऑनलाईन भीमजयंतीची सुरुवात ७ एप्रिलला औरंगाबाद येथील अमर वानखेडे याने भीमगीतांचे सिंथ वादन सादर करत केली. यानंतर मुंबईतुन डॉ. गणेश चंदनशिवे यांनी पारंपरिक भीमगिते व शिरिष पवार यांनी भीमस्पंदन, जालन्यातुन प्रसिद्ध अभिनेते कैलास वाघमारे यांनी 'बाबासाहेब आणि मी' तर परळी येथून चेतन चोपडे यांनी "तुफानातले दिवे " हा भीमगीतांचा कार्यक्रम सादर केला. यासोबतच औरंगाबादयेथून कुणाल वराळे यांनी 'युगपुरुष' व अजय देहाडे यांनी 'तुफानातले दिवे' याचे सादरीकरण केले. यानंतरच्या दुसऱ्या टप्प्यात आनंद शिंदे, उत्कर्ष शिंदे, साजन बेंद्रे, शितल साठे, सचिन माळी व आणखी प्रसिद्ध गायक येथे लाईव्ह सादरीकरण करणार आहेत अशी माहिती निखिल याने दिली.

देश हितासाठी पुढाकारमी प्रथमतः व अंतिमतः भारतीय असे म्हणत बाबासाहेबांनी नेहमीच देशहिताच्या भूमिका घेतल्या.त्यांचे विचार डोक्यात घेत कोरोनाच्या संकट काळात सर्वांनी घरात राहणे गरजेचे आहे. यातूनच ऑनलाईन भीमजयंती ही संकल्पना पुढे आली. याला सर्व स्तरातून जबरदस्त प्रतिसाद मिळत असून संपूर्ण महिनाभर राज्यभरातील नामवंत कलाकार यावर लाईव्ह येतील. - निखिल बोर्डे, दि बोधिसत्व 

लोकमतने 'लाईव्ह' साठी केले होते आवाहनलॉकडाऊन लागू होण्याआधी २१ मार्चला 'लोकमत'ने 'गर्दी टाळण्यासाठी सोशल मीडियावरील लाईव्हचा उत्तम पर्याय' अशी बातमी प्रसिद्ध करत या माध्यमातून नागरिकांना घरात राहूनच विविध कार्यक्रमात सहभागी होता येईल असे आवाहन केले होते. यानंतर विविध समाजाचे ऑनलाईन कार्यक्रम सुरू झाले. तर निखिल बोर्डे याने बोधिसत्व या फेसबुक पेजवरून सर्वात प्रथम ऑनलाईन भीमजयंतीचा उपक्रम सुरू केला. यानंतर अनेक संस्था आणि मान्यवरांनी हा पर्याय वापरणे सुरू केले आहे. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरAurangabadऔरंगाबादSocial Mediaसोशल मीडियाcorona virusकोरोना वायरस बातम्या