शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या एपीआय, तीन हवालदारांना लाच घेताना औरंगाबादेत अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2019 19:08 IST

अन्य गुन्ह्यात अटक न करण्यासाठी लाचेची मागणी

ठळक मुद्देकैलास काकडे विरोधात नाशिकमधील आडगाव पोलीस ठण्यात गुन्हा दाखल

औरंगाबाद: अटकेतील आरोपीला गुन्ह्यात मदत करण्यासाठी चार हजार रुपयांची लाच  घेताना नाशिक मधील आडगाव ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक आणि तीन पोलीस हवालदारांना लाचलूचपत प्रतिबंधक विभागाने औरंगाबादेत रंगेहात अटक केली. ही कारवाई ६ सप्टेंबर रोजी रात्री चिकलठाणा परिसरातील चौधरी कॉलनीत करण्यात आली.

सहायक पोलीस निरीक्षक योगेश चंद्रकांत पाटील, पोलीस नाईक अनिल दामाजी केदारे, पोलीस नाईक मिथून किसनराव गायकवाड आणि पोलीस शिपाई प्रदीप कचरू जोंधळे अशी अटकेतील पोलिसांची नावे आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांनी सांगितले की, चिकलठाण्यातील चौधरी कॉलनी येथे राहणाऱ्या तक्रारदार महिलेचा भाऊ कैलास काकडे विरोधात नाशिकमधील आडगाव पोलीस ठण्यात गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यात कैलासला अटक करण्यात आली होती.  या गुन्ह्याचा तपास करणारे सहायक पोलीस निरीक्षक योगेश पाटील हे अन्य तीन कर्मचारी यांचे पथक आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेत आले होते. तत्पूर्वी पोलीस नाईक केदारे यांनी तक्रारदार यांना फोन करून तुमच्या भावाला अटक झाली आहे. त्याला अन्य गुन्ह्यात अटक न करण्यासाठी तसेच पुढे मदत करण्यासाठी दहा हजार रुपये लाचेची मागणी केली होती. 

याविषयी महिलेने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदविली होती. दरम्यान शुक्रवारी रात्री सपोनि पाटील आणि अन्य कर्मचरी आरोपी कैलासला घेऊन औरंगाबादेतील चौधरी कॉलनीत आले. याविषयी माहिती मिळताच लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱ्यांनी चौधरी कॉलनीत दोन पंच पाठवून लाचेच्या मागणीची पडताळणी केली.  यावेळी सपोनि योगेश पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे दहा हजार रुपये लाच मागणी केली तेव्हा तक्रारदार यांनी चार हजार रुपये देण्याची तयारी दर्शविली. तेव्हा सर्वांनी संगणमत करून लाचेची रक्कम तक्रारदार यांच्या भावाकडे देण्यास सांगितले. तक्रारदार यांनी त्यांच्या भावाकडे लाचेचे चार हजार रुपये दिल्यानंतर  आरोपी पोलिसांनी कैलासकडून लाचेची रक्कम घेताच दबा धरून बसलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी सपोनि पाटील आणि अन्य पोलीस हवालदारांना रंगेहात पकडले. सर्व आरोपीपोलीस अधिकारी,कर्मचाऱ्यांविरोधात एमआयडीसी सिडको ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

यांनी केली कारवाईपोलीस अधीक्षक अरविंद चावरिया, अप्पर अधीक्षक अनिता जमादार, उपअधीक्षक ब्रम्हदेव गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश धोकरट, पोहेकॉ गणेश पंडुरे, पोलीस नाईक विजय ब्राम्हंदे आणि सुनील पाटील यांनी ही कारवाई केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबादPoliceपोलिसCorruptionभ्रष्टाचारArrestअटक