शहरं
Join us  
Trending Stories
1
सध्या 'मनोमिलन' नाटकाचं जोरदार प्रमोशन सुरू; एकनाथ शिंदेंचा उद्धव अन् राज ठाकरेंना टोला
2
India Still Qualify For Semifinals : टीम इंडियासाठी कसं आहे सेमीचं समीकरण? जाणून घ्या सविस्तर
3
बिहारमध्ये INDIA आघाडीत फूट? जागावाटप अन् CM चेहऱ्यावरून काँग्रेस-आरजेडीत घमासान
4
बांगलादेशी सैन्याची चाल, भारतासाठी धोक्याची घंटा; 'चिकन नेक'जवळ तैनात होणार चीनची लढाऊ विमाने?
5
ओबीसींना राजकारणापासून वंचित ठेवण्याचे षडयंत्र हाणून पाडले - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
6
IND W vs ENG W : स्मृतीची सेंच्युरी हुकली तिथंच मॅच फिरली; भारताच्या तोंडचा घास हिसकावून इंग्लंडनं गाठली सेमीफायनल
7
डोनाल्ड ट्रम्प यांच्याविरोधात सर्वात मोठं आंदोलन; अमेरिकेत रस्त्यावर उतरले ७० लाख लोक, कारण काय?
8
IND W vs ENG W : 'सासर माझं सुरेख बाई!' इंदूरच्या मैदानात स्मृतीनं तोऱ्यात साजरी केली फिफ्टी
9
ट्रेनमध्ये समोसा विकणाऱ्याची दादागिरी; २० रुपयांच्या समोशासाठी २ हजारांची स्मार्टवॉच हिसकावली!
10
...अशा लोकांचा बँन्ड जनता वाजवते; एकनाथ शिंदे यांची राज ठाकरेंवर बोचरी टीका
11
IND vs AUS : कॅप्टन्सीत जे किंग कोहलीबाबत घडलं तेच प्रिन्स गिलच्या वाट्याला आलं
12
श्रीराम नगरीत दीपोत्सवाचा विश्वविक्रम; २६ लाखांहून अधिक दिव्यांनी उजळली अयोध्या
13
भारताच्या लेकीचा जगात डंका !! बॅडमिंटनपटू तन्वीने तब्बल १७ वर्षानंतर देशासाठी जिंकलं पदक
14
डॉक्टर पतीने बायकोचा केला धक्कादायक शेवट; हत्या करायची पद्धत समजल्यावर पोलिसही चक्रावले...
15
शनिवार वाड्यात नमाज पठणाने वाद; खासदार मेधा मुलकर्णींनी शेअर केला 'तो' व्हिडिओ...
16
दहशतवाद्यांना भारतात घुसखोरी करणं भारी पडणार; 'रोबोटिक खेचर'ची नजर, सीमेवर जवानांना मिळाला साथी
17
...तर 'त्या' मुलीचं तंगडं तोडा; भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा ठाकूर यांचा आई वडिलांना अजब सल्ला
18
महायुतीत वाद! मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; शिंदेसेनेचे नेते आक्रमक
19
VIDEO : वजन कमी करण्यासाठी 'वडापाव' सोडला; आता रोहित 'पॉपकॉर्न' खाताना दिसल्यावर अभिषेक नायर म्हणाला...
20
बनावट पासपोर्ट रॅकेट उघडकीस; 400 बांग्लादेशी घुसखोरांना मिळाला भारतीय पासपोर्ट!

नाशिकलाच मिळाला साहित्य संमेलनाचा मान; २४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2021 06:58 IST

छगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले.

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : ९४ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कुठे होणार, हे साहित्यप्रेमींना कळून चुकले होतेच. पण शुक्रवारी मराठवाडा साहित्य परिषद येथे झालेल्या बैठकीत साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकच्या लोकहितवादी मंडळाकडून आलेल्या प्रस्तावावर औपचारिक शिक्कामोर्तब केले आणि ९४ व्या साहित्य संमेलनाच्या आयोजनाचा मान नाशिकला मिळाल्याचे  जाहीर केले. मार्च महिन्याच्या अखेरीस गोखले एज्युकेशन सोसायटीच्या परिसरात साहित्य संमेलन होणार आहे.

ठाले पाटील म्हणाले की, सरहद संस्थेने मे महिन्यात साहित्य संमेलन घेण्याचे सांगितले होते, परंतु महामंडळाचे आर्थिक वर्ष १ एप्रिल ते ३१ मार्च असे आहे. प्रत्येक वर्षीचे अनुदान त्याच वर्षी वापरले गेले पाहिजे, असे वाटते. त्यामुळे पुन्हा अनुदानाचा प्रश्न निर्माण होऊ नये, हे देखील प्रस्ताव नाकारण्याचे एक कारण होते. याशिवाय कोरोनामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजनासाठी दिल्ली सुरक्षित ठिकाण नाही. त्यामुळे दिल्लीला संमेलन घेण्यास महामंडळ उत्सुक नव्हते. 

सहस्रचंद्र दर्शनाची चर्चा तथ्यहीनछगन भुजबळ, शरद पवार आणि त्यांचे सहस्रचंद्रदर्शन यांचा सध्यातरी साहित्य संमेलनाशी काहीही संबंध नाही. पुढे जर अशी काही वेळ आली तर तसा विचार करू, असे स्पष्टीकरण ठाले पाटील यांनी दिले. राजकीय नेत्यांना भूमिकेशिवाय साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर स्थान दिले जाणार नाही, हे आम्ही मागच्या साहित्य संमेलनाच्यावेळीच सांगितले होते. तीच भूमिका आमची यावेळीही कायम राहील, असेही त्यांनी ठासून सांगितले. 

२४ तारखेला ठरणार संमेलनाध्यक्ष२३ जानेवारी रोजी नाशिक येथे संमेलन मार्गदर्शन समितीची बैठक होणार आहे. या बैठकीत संमेलनाच्या आयोजनाविषयी चर्चा होईल. तसेच दि. २४ रोजी नाशिक येथेच एक बैठक होणार असून, यामध्ये साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाची रचना आणि संमेलनाध्यक्ष याचा निर्णय जाहीर केला जाईल.

तिसऱ्यांदा मान नाशिकमध्ये याआधी १९४२ व २००५ असे दोन वेळा संमेलन भरविण्यात आले. तिसऱ्यांदा संमेलन आयोजनाचा मान नाशिकला मिळणार आहे. 

स्वागताध्यक्षपदी भुजबळ? मार्चच्या १९, २० व २१ तारखेला संमेलन होण्याची चिन्हे आहेत. संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ आणि माजी आमदार हेमंत टकले यांच्या नावांची चर्चा आहे. 

 

टॅग्स :akhil bharatiya marathi sahitya mahamandalअखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळ