शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

नाना संतापले, ‘आम्ही भीक मागून बंधाऱ्यांची कामे करू’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 21, 2018 00:23 IST

लोकमत न्यूज नेटवर्क औरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष ...

ठळक मुद्देहोत नसेल तर सांगा : हरिभाऊ बागडे यांनी जिल्हा परिषद सत्ताधा-यांवर साधला निशाणा; चार वर्षांपासून विषय मांडत असल्याची ‘डीपीसी’ बैठकीत तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : कोल्हापुरी बंधा-यांना दरवाजे बसविण्याची कामे पूर्ण करण्यात जि.प. सत्ताधारी आणि प्रशासन कुचकामी असल्याचा अप्रत्यक्ष शाब्दिक हल्ला चढवित, होत नसेल तर आम्हाला मंजुरी देऊन टाका, आम्ही भीक मागून बंधा-यांची कामे करू, आता लोकांचे बोलणे खाणे सहन होत नाही, असा संताप विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी डीपीसीच्या बैठकीत सोमवारी व्यक्त केला.बागडे म्हणाले, जिल्ह्यात अनेक ठिकाणी बंधा-यांना दरवाजे नसल्यामुळे पाणी वाहून जात आहे. शेतक-यांना ते देखवत नाही. दरवाजे बसविण्याचा निर्णय का होत नाही, चार वर्षांपासून विषय मांडतो आहे, संताप होणार नाही तर काय होणार, गिरिजा नदीला पाणी आले, दरवाजे नसल्याने ते वाहून गेले. ९ हजार दरवाजे बसवायचे असून किंमत वाढत असल्यामुळे प्रशासन मंजुरी देत नसल्याचे अधिकारी सांगत आहेत. ही कामे होत नसेल तर सांगा, आम्ही भीक मागून ती कामे करू.जि.प. प्रशासनातर्फे सांगण्यात आले की, दरवाजे बसविणे, डागडुजीसाठी ३ कोटींची तरतूद केली आहे. २ ते ३ महिन्यांत कार्यवाही पूर्ण होईल. ५८५ पैकी ३५७ ठिकाणी दरवाजे आहेत. २५८ बंधा-यांना दरवाजे नाहीत. ३८ बंधारे जलयुक्त शिवार योजनेत आहेत. १८०० दरवाजे उपकरनिधीतून बसविण्याचा प्रयत्न आहे. ६७८ पैकी २९४ बंधा-यांत पाणी साचल्याचा दावा प्रशासनाने केला.जि.प. अध्यक्ष देवयानी डोणगावकर म्हणाल्या, हा विषय घेतला आहे, ९ हजार गेट बसविण्याबाबत प्रक्रिया सुरू झाली आहे. जिल्हाधिकारी उदय चौधरी म्हणाले, दरवर्षी शासन दरवाजांसाठी पैसे देऊ शकत नाही. उपकरातून या कामांसाठी तरतूद केली जावी. दरम्यान आमदार निधीतून बंधाºयांच्या दरवाजांच्या कामांना मंजुरी मिळण्याचा विषय बैठकीत चर्चेला आला.पदे उपभोगायला नसतात...जिल्हा परिषद एवढी सुस्त का झाली, हे कळण्यास मार्ग नाही. जि.प.मधील पदे उपभोगायला नसतात. सर्वसामान्यांची कामे करण्यासाठी असतात, असा शालजोडा लगावून बागडे म्हणाले, फुलंब्री मतदारसंघातील केटीवेअरच्या कामांना मुहूर्त लागत नाही. दर बैठकीत तरतूद झाली आहे, असेच उत्तर प्रशासन देत आहे. असे असेल तर पाणी वाचणारच नाही. पाणी साचत नाही, याचे काही दु:ख यांना वाटत नाही. जि.प.तील पदे कामांसाठी असतात, पदे उपभोगायला नसतात. पैठण, गंगापूर, वैजापूर तालुक्यांत बंधारे बांधूनही पाणी साचले नाही.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादHaribhau Bagadeहरिभाऊ बागडेzpजिल्हा परिषद