शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

घरफोडीत पोलिसांना नाव सांगितल्याचे कारण; शिवाजीनगरमध्ये तीन गुन्हेगारांमध्ये तुफान राडा

By सुमित डोळे | Updated: February 29, 2024 20:03 IST

तीस दिवसांत तीनदा कारागृहात, पुन्हा जामिनावर सुटताच धिंगाणा, पाय तोडण्याचा प्रयत्न

छत्रपती संभाजीनगर : तीस दिवसांत तिसऱ्यांदा गंभीर गुन्ह्यात जामिनावर सुटलेला कुख्यात गुन्हेगार इम्रान रशिद अली सय्यद उर्फ मालेगाव (२८, रा. सातारा) व लल्लन ऊर्फ शेख अय्याज शेख रहिम, सलमान जफ्फर खान (रा. गारखेडा) यांच्यामध्ये टोळीयुद्ध झाले. छावणीच्या घरफोडीत पाेलिसांना नाव सांगितल्याच्या रागातून हे वाद उफाळून आले. त्यात लल्लन व सलमानने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फाेडून इम्रानचे दोन्ही पाय फ्रॅक्चर केले तर सलमानदेखील इम्रानच्या मारहाणीत जखमी झाला. रविवारी सायंकाळी ७ वाजता शिवाजीनगरच्या नेहरू महाविद्यालयाजवळ हा राडा झाला. या घटनेमुळे पोलिसांचे रेकॉर्डवरील गुन्हेगारांचे नियंत्रण सुटल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

इम्रान व त्याची पत्नी जयश्री सोबत रविवारी सायंकाळी ७ वाजता गारखेड्यात असताना त्याचे अन्य गुन्हेगारांसोबत पैशांवरून वाद झाले. तेवढ्यात लल्लन व सलमानने कारमधून येत त्यांच्यावर हल्ला चढविला. लल्लनच्या पत्नीने इम्रानच्या पत्नीच्या डोक्यात दारूची बाटली फोडली तर सलमानने इम्रानला रस्त्यावर पाडून दोन्ही पायांवर गंभीररीत्या वार केले. या वादात इम्रानने देखील सलमानला पैसे न दिल्यास जिवंत मारून टाकण्याची धमकी दे चाकूने गंभीर वार केले. दोघांच्या परस्पर तक्रारीवरून गुन्हे दाखल करण्यात आले. इम्रान मालेगाव व पत्नीवर शस्त्रक्रिया पार पडली. घटनेनंतर सलमान व लल्लनला उपनिरीक्षक संदीप काळे यांनी तत्काळ अटक केली.

साताऱ्यात राहणाऱ्या इम्रान मालेगाववर आतापर्यंत १० ते ११ गंभीर गुन्हे दाखल आहेत. मालेगावहून तो काही वर्षांपूर्वी शहरात आला व गुन्हेगारांमध्ये सक्रिय झाला. शहरातील सर्व गुन्हेगारांमध्ये त्याची ऊठबस असते. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव, लल्लन, सलमान यांचे त्याच परिसरात वाळूचे ठेले देखील आहेत. त्यातूनही त्यांच्यासह स्थानिक गुन्हेगारांमध्ये वाद आहेत.

-सातारा पोलिसांकडून इम्रान ३० डिसेंबरला घरफोडीत अटकेत.- त्यात जामिनावर सुटताच ३ जानेवारीला गुन्हेगारांच्या टोळीसोबत गांधीनगरमध्ये राडा करून मोठा तणाव निर्माण केला.-क्रांती चौक पोलिसांकडून ४ जानेवारीला अटक. त्यात १५ ते २० दिवस तो कारागृहात राहिला.-त्यातून जामिनावर सुटताच १६ फेब्रुवारीला छावणीत घर फोडून २३ तोळे सोन्यासह लाखोंचा ऐवज चोरला. गुन्हे शाखेकडून २१ फेब्रुवारीला अटक.-२४ फेब्रुवारीला पुन्हा जामिनावर सुटला. त्यानंतर पुढील २४ तासांत पुन्हा टोळीयुद्ध केले.

लल्लन ऊर्फ शेख अय्याजवर यापूर्वी एक मारहाणीचा तर दोन हत्येचा प्रयत्न केल्याचे गुन्हे दाखल आहेत. विशेष म्हणजे, इम्रान मालेगाव गांधीनगर तणावात जमावाच्या हल्ल्यात बालंबाल वाचला. रविवारच्या घटनेत देखील स्थानिकांनी धाव घेतल्याने त्याचे प्राण वाचले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीAurangabadऔरंगाबाद