लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.महापालिकेसाठी नालेसफाई अत्यंत आवडीचा विषय होता. मागील काही वर्षांमध्ये या नालेसफाईतील खाबूगिरी तत्कालीन आयुक्त ओम प्रकाश बकोरिया यांनी संपविली. त्यामुळे कोट्यवधींच्या उधळपट्टीला ब्रेक लागला.प्रशासनाचाही या नालेसफाईतील ‘रस’ संपला. यंदाही शहरातील ९ झोनसाठी फक्त ६० ते ७० लाखांच्या खर्चाचा अंदाज बांधण्यात आला आहे.दरवर्षी जून महिन्यात पावसाळ्याला सुरुवात होते, हे माहीत आहे. मार्च, एप्रिल महिन्यापासूनच तयारी करायला हवी.महापालिका मे किंवा जून महिन्यात कामाला लागते. आणीबाणी कायद्याचा वापर करून ही कामे उरकण्यावर अधिकाऱ्यांचा अधिक भर असतो. दरवर्षी ज्या पद्धतीने नालेसफाई करायला हवी त्या पद्धतीने होत नाही. नाल्याच्या दर्शनी भागातील केरकचरा काढण्यात येतो. नाल्यातील एक इंचही गाळ काढण्यात येत नाही. गाळ काढण्यासाठी कोट्यवधी रुपये लागतील, असा दावा प्रशासनाकडून दरवर्षी करण्यात येतो.मोठा पाऊस झाल्यासऔरंगाबाद शहरात अनेकदा मुसळधार पाऊस झाला आहे. मागील वर्षी जयभवानीनगर येथे असंख्य घरांमध्ये पाणी शिरले होते. त्यानंतर यंदा मनपाने नाल्यातील अनेक अतिक्रमणे हटविली. जयभवानीनगरसारखी अवस्था शहरात अनेक ठिकाणी आहे.कचºयाने नाले तुडुंब४शहरात मोठा पाऊस झाल्यास उथळ नाल्यामुळे सखल भागात हाहाकार उडतो. यापूर्वी अनेकदा मोठा पाऊस झाल्यावर शहराची ‘मुंबई’प्रमाणे अवस्था झाली. शहरातील दहा मोठ्या नाल्यांची अवस्था अत्यंत वाईट आहे. नाल्यांमध्ये प्रचंड गाळ, केरकचरा आणि नाल्यांवर झालेल्या मोठमोठ्या अतिक्रमणांनी पाण्याचा नैसर्गिक प्रवाहच बंद झाला आहे.४मागील तीन महिन्यांपासून कचराकोंडी निर्माण झाली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमध्ये सर्वाधिक कचरा दिसून येत आहे.नियोजनाचा बट्ट्याबोळ४दरवर्षीप्रमाणे यंदाही वेधशाळेने पाऊस चांगला, भरपूर होणार, असा अंदाज वर्तविला आहे. वेधशाळेचे अंदाज दरवर्षी किती अचूक ठरतात हे नागरिकांना माहीत आहे. तरी महापालिकेने तयारी काहीच केलेली नाही. मान्सूनपूर्व कामांच्या आढावा घेण्यासाठी नवनियुक्त आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी बैठक आयोजित केली होती. तांत्रिक कारणांमुळे ही बैठक पुढे ढकलण्यात आली. प्रशासनाप्रमाणेच पदाधिकारीही आता ‘आपल्या’ कामांमध्ये मग्न झाले आहेत.
औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 00:10 IST
मान्सून यंदा लवकर धडकणार आहे. मान्सूनपूर्वी महापालिकेला दरवर्षी नालेसफाई करावी लागते. मे महिना संपत आला तरी नालेसफाईचा नारळ प्रशासनाने फोडला नाही. प्रशासनाकडून १९ मेपासून बैठकांचे नियोजन करण्यात येत आहे. पावसाळा संपल्यावर महापालिका नालेसफाई करणार का? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.
औरंगाबाद शहरातील नालेसफाईकडेही मनपाचे दुर्लक्ष
ठळक मुद्देतयारी शून्य : मे महिना संपतासंपता मनपा करणार नियोजन; नालेसफाई कागदावरच होण्याची शक्यता