शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
4
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
7
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
8
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
9
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
10
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
11
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
12
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
13
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
14
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
15
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
16
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
17
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
18
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
19
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
20
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
Daily Top 2Weekly Top 5

ऐनवेळी नाफेडचा तूर खरेदीस नकार; शेतकऱ्यांना बसणार दीड कोटीचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 29, 2020 18:08 IST

शेतकऱ्यांना दिड कोटीचा फटका, व्यापारी मालामाल

ठळक मुद्देनाफेडच्या तुघलकी निर्णयाचा ८०० शेतकऱ्यांना फटकाशासनाने तूर खरेदीसाठी ५८०० प्रति क्विंटल भाव घोषित केला आहे.

- संजय जाधव

पैठण : शासनाच्या आधारभूत किंमतीनुसार तुर घालण्यासाठी कागदपत्रासह नोंदणी पूर्ण केलेल्या पैठण तालुक्यातील ८०० शेतकऱ्यांची तूर खरेदीस नाफेडने अचानक नकार दिल्याने शेतकरी वर्गात मोठी खळबळ उडाली आहे. नाफेडच्या या तुघलकी निर्णयामुळे १० हजार क्विंटल तूर शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांच्या घशात घालावी लागणार आहे शासनाची आधारभूत किंमत व बाजारातील भाव लक्षात घेता शेतकऱ्यांना १ कोटी ४० लाख रूपयाचा फटका बसणार आहे. नोंदणी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांची तूर खरेदी करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

शासनाने तूर खरेदीसाठी ५८०० प्रति क्विंटल भाव घोषित केला आहे. १ जानेवारी पासून नोंदणी सुरू असून १४ फेब्रुवारी, २०२० पर्यत नाव नोंदणीची मुदत आहे. शेतकऱ्यांनी तूर घालण्यासाठी सातबारा उतारा, चालू बॅंक खाते पासबुक प्रत, आधारकार्ड  आदी कागदपत्रासह नोंदणी केली. नोंदणी यशस्वी झाल्याचा शेतकऱ्यांना मोबाइलवर एसएमएस आला. मात्र ऐनवेळी शेतकऱ्यांना नाफेडच्या अधिकाऱ्यांनी तुमची नोंदणी रद्द करण्यात आली असून तूर आणू नका अशा सूचना दिल्या. दरम्यान, शेतकऱ्यांनी नाफेडच्या अधिकाऱ्यांना नोंदणी का रद्द करण्यात आली या बाबत विचारणा केली वेगवेगळी कारणे सांगण्यात येत आहेत. यामुळे तूर खरेदी न करण्याबाबत संशयास्पद वातावरण निर्माण झाले आहे.

शेतकऱ्यांना दिड कोटीचा फटका, व्यापारी मालामाल८०० शेतकऱ्यांची तूर नाफेडने खरेदी केली नाही तर शेतकऱ्यांना ही तूर खाजगी व्यापाऱ्यांना विकावी लागणार आहे. शासनाची तूर खरेदीची आधारभूत किंमत ५८०० तर व्यापाऱ्यांचा खरेदीचा भाव ४४०० प्रती क्विंटल असा आहे. म्हणजेच प्रती क्विंटल शेतकऱ्यांना १४०० रूपयाचा फटका सहन करावा लागणार आहे. ८०० शेतकऱ्यांना अंदाजे  १० हजार क्विंटल तूर खाजगी व्यापाऱ्यांना द्यावी लागणार असल्याने तालुक्यातील शेतकऱ्यांचे १ कोटी ४० लक्ष रूपयाचे नुकसान होणार आहे. 

व्यापारी व नाफेड अधिकाऱ्यांचे साटेलोटे...?ऐनवेळी तूर खरेदीस नकार देण्यात नाफेडचे अधिकारी व व्यापारी यांचे साटेलोटे असल्याचा आरोप अन्नदाता शेतकरी संघटनेचे अध्यक्ष जयाजी सुर्यवंशी यांनी केला आहे. याविरोधात ३१ जानेवारी रोजी आंदोलनाच इशारा त्यांनी दिला आहे.

टॅग्स :FarmerशेतकरीagricultureशेतीMarketबाजारfundsनिधी