शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नोटाबंदी, राफेल, बँक घोटाळ्यांच्या अभ्यासाची भाजपाला भीती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 29, 2018 23:50 IST

भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंवर दबाव टाकून घोटाळ्याचा भाग अभ्यासक्रमातून बाद करण्यास भाग पाडल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्तेवर भाजपाने सेन्सॉर बसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.

ठळक मुद्दे स्वायत्ता कुंठित : कुलगुरूंवर दबाव टाकून मोदींच्या काळातील घोटाळे अभ्यासक्रमातून बाद

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या बीबीए अभ्यास मंडळाच्या तज्ज्ञ सदस्यांनी विद्यमान केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांचा समावेश अभ्यासक्रमात केला होता. नोटाबंदी, बँक घोटाळे, राफेल करार आदींचा समावेश असलेला अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईटवर टाकताच सोशल मीडियात व्हायरल झाला. भाजपच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी कुलगुरूंवर दबाव टाकून घोटाळ्याचा भाग अभ्यासक्रमातून बाद करण्यास भाग पाडल्याने विद्यापीठाच्या शैक्षणिक स्वायत्तेवर भाजपाने सेन्सॉर बसविल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले.बॅचलर आॅफ बिझनेस अ‍ॅडमिनिस्ट्रेशन (बीबीए) या पदवीला कॉर्पोरेट गर्व्हनन्स- भाग २ हा विषय आहे. या विषयाच्या अभ्यासक्रमात चौथे युनिट ‘केसेस आॅन कॉर्पोरेट गर्व्हनन्स इन इंडिया’ या नावाचे आहे. विद्यार्थ्यांना चालू घडामोडींवर केस स्टडी करता यावी, या हेतूने २०१४ नंतर बँकिंग क्षेत्रात झालेले विविध बदल अभ्यासासाठी ठेवण्यात आले होते. यात नोटाबंदी, राफेल करार, पंजाब नॅशनल बँक घोटाळा- नीरव मोदी, अमित मोदी, निशाल मोदी, मेहुल चौकसी आणि किंगफिशर घोटाळा- विजय मल्ल्या याचा समावेश केला. हा नवीन अभ्यासक्रम २६ नोव्हेंबर रोजी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अपलोड करण्यात आला. मात्र, काही वेळातच हा अभ्यासक्रम प्राध्यापकांच्या व्हॉटस्अ‍ॅप ग्रुपमधून भाजपाच्या स्थानिक पदाधिकाºयांकडे पोहोचला. भाजपाचे शहराध्यक्ष किशनचंद तणवाणी यांनी केंद्रात, राज्यात भाजपाचे सरकार असताना विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात या सरकारच्या संबंधित बाबींचा समावेश कसा होऊ शकतो, असा सवाल उपस्थित करीत हा भाग अभ्यासक्रमातून वगळण्याची मागणी कुलगुरूंकडे केली. वगळला नाही तर याविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला. या इशाºयामुळे कुलगुरूंनी वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांना बोलावून घेत सर्व पार्श्वभूमी समजावून घेतली. हा अभ्यासक्रम भाजपा व अभाविप प्रणित विद्यापीठ विकास मंचच्या पॅनलमध्ये निवडून आलेले अभ्यास मंडळाचे अध्यक्ष डॉ. एस. ए. घुमरे, प्राचार्य डॉ. किशोर साळवे आणि डॉ. सय्यद अझरुद्दीन यांनी बनवला आहे. यात अभ्यासपूर्ण अशी रचना केली आहे. यात वादग्रस्त असे काहीही नसल्याचे डॉ. सरवदे यांनी कुलगुरूंकडे स्पष्ट केले. तरीही कुलगुरूंनी ज्यावर आक्षेप आहे, असा भाग वगळून टाकण्याचे आदेश दिले. यानुसार अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी पुन्हा एक बैठक घेत हा भाग वगळून टाकण्याचा निर्णय घेतला. नवीन भागात नोटाबंदी, बँक घोटाळे, कॉग्निटिव्ह मॉरल डेव्हलपमेंट आणि अकॉटॅबिलिटी इश्यू अ‍ॅण्ड कॉर्पोरेट गर्व्हनन्स या अभ्यासक्रमाचा समावेश केला. भाजपाच्या पदाधिकाºयांना राफेल, नोटाबंदी, बँक घोटाळ्याच्या अभ्यासाचीही भीती निर्माण झाली असल्याचा टोमणा उत्कर्ष पॅनलकडून निवडून आलेले विद्यापरिषदेचे सदस्य डॉ. विलास खंदारे यांनी हाणला.व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीपूर्वीच अभ्यासक्रमात बदलव्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत या विषयावर खडाजंगी झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. मात्र, हा विषय व्यवस्थापन परिषदेत शेवटपर्यंत चर्चेला आलाच नाही. बैठक संपल्यानंतर एका सदस्याने भाजपाच्या घोटाळ्याचा समावेश असलेला अभ्यासक्रम सोशल मीडियात फिरत असल्याचे कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर कुलगुरूंनी हा वादग्रस्त भाग वगळण्याचा निर्णय अभ्यास मंडळाच्या अध्यक्षांनी घेतला असल्याचे संबंधितांच्या निर्दशनास आणून दिल्याची माहिती या विद्याशाखेचे अधिष्ठाता डॉ. वाल्मीक सरवदे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.

टॅग्स :Educationशिक्षणBJPभाजपाPoliticsराजकारण