शहरं
Join us  
Trending Stories
1
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
2
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
3
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
4
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
5
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
6
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
7
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
8
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
9
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
10
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
11
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
12
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
13
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
14
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
15
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
16
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
17
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
18
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
19
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
20
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
Daily Top 2Weekly Top 5

दुप्पट पैस्यांचे आमिष दाखवून माय डायल डिजिटलने घातला १६ कोटींचा गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 27, 2018 19:08 IST

शहरातील सुमारे पाचशे गुंतवणूकदारांमार्फत साडेचार हजार नागरिकांना सुमारे १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले.

औरंगाबाद : कंपनीत गुंतवणूक करा आणि पुढील दहा महिन्यांत दुप्पट रक्कम घ्या, तसेच एलईडी मिळवा, अशा प्रकारचे आमिष दाखवून शहरातील सुमारे पाचशे गुंतवणूकदारांमार्फत साडेचार हजार नागरिकांना सुमारे १६ कोटी रुपयांचा गंडा घातल्याचे समोर आले. याप्रकरणी तक्रार प्राप्त होताच आर्थिक गुन्हे शाखेने शुक्रवारी रात्री  वेदांतनगर ठाण्यात कंपनीच्या संचालकांविरोधात गुन्हा नोंदविला.  

आकाश सरोदे, पुरुषोत्तम चचेरे, प्रणव बाला, अभिजित देव, योगेश टोपले, सचिन मेश्राम, स्वीटी आकाश सरोदे, अशी गुन्हा नोंद झालेल्या कंपनी संचालकांची नावे आहेत. याविषयी आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक श्रीकांत नवले म्हणाले की, माय डायल डिजिटल एलईडी अ‍ॅण्ड प्रा.लि. कंपनीने गतवर्षी शहरात विविध सेमीनार घेऊन कंपनी गुंतवणुका स्वीकारून दहा महिन्यांत दुप्पट रक्कम देते.त्यासाठी कंपनीत गुंतवणूक करा आणि हवा तेवढा परतावा घ्या, असे आमिष दाखविले जाई.

कंपनीच्या संचालकांच्या आमिषाला बळी पडून जटवाडा रस्त्यावरील अमोल प्रकाश मावस यांनी आॅगस्ट २०१७ मध्ये कंपनीत दहा लाख १ हजार रुपये गुंतविले. कंपनीने जानेवारी २०१८ पर्यंत अमोल यांना परतावा दिला, त्यानंतर पैसे देणे थांबविले. एवढेच नव्हे, तर कंपनीची वेबसाईट बंद केली. कंपनीच्या संचालकांसोबत त्यांचा संपर्क होईना. कंपनीने आपल्यासह सुमारे ५०० जणांमार्फत सुमारे साडेचार हजार नागरिकांचे आय.डी. तयार करून १६ कोटी रुपये गोळा केल्याचे त्यांना समजले. अमोल यांनी याप्रकरणी पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांच्याकडे तक्रार केली. 

२१ हजारांच्या बदल्यात ३७ हजार देण्याचा दावा२१ हजार रुपये गुंतवणूक केल्यास  दरमहा ३ हजार ७८० रुपयांप्रमाणे दहा महिन्यांत ३७ हजार ८०० रुपये, ४९ हजार रुपये गुंतवणुकीवर दहा महिन्यांत ८८ हजार २०० रुपये आणि प्रत्येक गुंतवणूकदाराला जाहिरातीचा एक एलईडी देण्यात येईल, असे सांगितले होते. गुंतवणूकदारांना त्यांचा परतावा त्यांच्या खात्यात जमा होईल, शिवाय कंपनीच्या वेबसाईटवर त्यांची नावे दिसतील, असेही संचालक सांगत.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस