शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

मुंबई,पुण्यातील माझे बंगले कल्याण काळे यांनी शोधावेत, त्यांच्या नावावर करून देतो: हरिभाऊ बागडे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 28, 2023 12:21 IST

आमदार हरिभाऊ बागडे यांचे भाजपच्या व्यापारी संमेलनात करमाड येथे जाहीर आव्हान

करमाड : मुंबई, पुण्यात माझे जे काय बंगले किंवा इतर मालमत्ता असेल, ती डॉ. कल्याण काळे यांनी शोधून काढावी, ती सर्व मालमत्ता मी काळे यांच्या नावे करण्यास तयार आहे, असे जाहीर आव्हान आ. हरिभाऊ बागडे यांनी कल्याण काळे यांना मंगळवारी करमाड येथे भाजपच्या व्यापारी संमेलनात दिले.

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष विजय औताडे, बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे, तालुकाध्यक्ष राम शेळके, संचालक दत्ता उकर्डे, भागचंद ठोंबरे, नागरिक व व्यापारी उपस्थित होते. कन्नड येथे एका मेळाव्यात कल्याण काळे यांनी आरोप केला होता की, हरिभाऊ बागडे यांचे मुंबईत आणि पुण्यात बंगले आहेत. तसेच छत्रपती संभाजीनगर शहरातही त्यांचे चार बंगले आहेत. संभाजीराजे साखर कारखाना त्यांचा आहे.

त्या आरोपांना उत्तर देताना बागडे म्हणाले की, आमदारकीचे मानधन धरून मला महिन्याला अडीच लाखांचे उत्पन्न मिळते. मुंबईत आमदारांना जसा फ्लॅट मिळतो, तसा मला मिळाला होता. तो फ्लॅट पाच-सहा वर्षांपूर्वीच मी विकून छत्रपती संभाजीनगर शहरात एक बंगलावजा कॉम्प्लेक्स बांधले आहे, साखर कारखाना माझा नव्हे तर ज्यांनी शेअर्स भरले, त्यांचा आहे. मी केवळ एक सभासद आहे. जमीन माझी वडिलोपार्जित आहे, तेवढीच मालमत्ता आजही माझ्या नावावर आहे. कल्याण काळे म्हणाले होते की, माझे बागडेंसारखे नाही. मी अजूनही माझ्या वडिलांनीच मला आमदार होण्यापूर्वी बांधून दिलेल्या बंगल्यात राहतो. पण काळे यांचा हा बंगला त्यांच्या वडिलांनी ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन असताना बांधून दिला होता, हेही काळेंनी लक्षात घ्यावे, असा टोला बागडे यांनी लगावला.वेळी रामकिसन भोसले, रामेश्वर सोळुंके, सय्यद कदीर, रवीकुमार कुलकर्णी, सुदाम उकर्डे, सरसाबाई वाघ, सजनराव मते, दामोदर नवपुते आदी उपस्थित होते. संचालन दत्ता उकर्डे यांनी केले.

टॅग्स :Haribhau Bagadeहरिभाऊ बागडेAurangabadऔरंगाबाद