शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
2
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
3
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
4
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
5
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
6
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
7
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
8
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
9
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
10
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
11
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
12
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
13
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
14
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
15
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
16
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
17
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
18
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
19
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
20
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
Daily Top 2Weekly Top 5

औरंगाबादमध्ये प्लॉटिंगच्या वादातून हॉटेल व्यवसायिकाचा खून; पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 28, 2017 15:33 IST

मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणार्‍या हॉटेल व्यवसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवन समोर झाली.

ठळक मुद्देपोलिसांच्या रेकॉर्डनुसार मृताविरोधात गंभीर स्वरुपाचे चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहे. पूर्व वैमन्यस्यातून अथवा प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाला असावा,असा पोलिसांना संशय आहे. 

औरंगाबाद : मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर दुचाकीने छावणीतील पेन्शनपुरा येथे घरी जाणार्‍या हॉटेल व्यवसायिकाचा लोखंडी रॉडने हल्ला करून खून करण्यात आले. ही घटना बुधवारी रात्री दिड वाजेच्या सुमारास छावणी आणि लक्ष्मी कॉलनीच्या सीमेवर असलेल्या अजिंठा भवन समोर झाली.  पोलिसांच्या रेकॉर्डनुसार मृताविरोधात गंभीर स्वरुपाचे चार वेगवेगळे गुन्हे दाखल आहे.  पूर्व वैमन्यस्यातून अथवा प्लॉटिंगच्या वादातून हा खून झाला असावा,असा पोलिसांना संशय आहे. 

हुसेनखान अलियारखान उर्फ शेरखान(५५,रा.पेन्शनपुरा, छावणी)असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी सांगितले की, मृत शेरखान नावानेच ओळखला जात. मृत प्लॉटिंग आणि हॉटेल व्यवसायिक होता. रोज रात्री उशीरापर्यंत शहरातील मित्रांसोबत गप्पा मारणे, हॉटेलमध्ये थांबून ते घरी जात. बुधवारी रात्री १ .१५ वाजेच्या सुमारास मोतीकारंजा येथील मित्रांसोबत गप्पा मारल्यानंतर ते दुचाकीने एकटचे घरी निघाले. छावणी परिसरातील अजिंठा भवन समोरून ते जात असताना आधीच दबा धरून बसलेल्या मारेकर्‍यांनी अचानक त्यांच्यावर रॉडने  हल्ला चढविला.

या हल्लयात ते दुचाकीसह खाली कोसळले. यानंतर हल्लेखोरांनी आणखी दोन ते तीन वार केल्याने ते निपचित पडले. यानंतर आरोपी तेथून पसार झाले. सुमारे सव्वा दोन वाजेच्या सुमारास एका वाटसरूने पोलीस नियंत्रण कक्षाला फोन करून दुचाकी अपघातात एक जण गंभीर जखमी अवस्थेत पडलेला असल्याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली तेव्हा शेरखान हे बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले.शिवाय घटनास्थळी लोखंडी रॉड आढळला. यामुळे कोणीतरी त्यांच्यावर रॉडने हल्ला केल्याचे निष्पन्न झाले. त्यांना बेशुद्धावस्थेत शेरखानला घाटीत दाखल केले. अपघात विभागातील डॉक्टरांनी शेरखान यास तपासून मृत घोषित केले.या प्रकरणी छावणी पोलीस स्टेशनमध्ये पाच संशियत आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.