शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगनगरीतील ‘मुन्नाभाई’ आरोग्य विभागाच्या रडारवर; दोन बोगस डॉक़्टरांना पथकाने पकडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2023 12:45 IST

गरीब कामगारांच्या अज्ञानाचा फायदा; रांजणगावात दोन मुन्नाभाई डॉक़्टरांना पथकाने पकडले

वाळूज महानगर : उद्योगनगरीत गरीब कामगारांच्या अज्ञानाचा फायदा घेत रुग्णालय थाटून रुग्णांच्या जिवाशी खेळणाऱ्या दोन बोगस डॉक्टरांना शुक्रवारी आरोग्य विभागाच्या पथकाने रांजणगावात पकडले. शैलेंद्र नितू दास (२८) व संजय दिलीप मंडल (३५, दोघेही रा. रांजणगाव) या दोन बोगस डॉक़्टरांना पकडून त्यांच्या ताब्यातून औषध साठा व वैद्यकीय उपकरणे जप्त करण्यात आली.

उद्योगनगरीतील रांजणगाव, जोगेश्वरी, वाळूज व परिसरात अनेकांनी वैद्यकीय शाखेची कुठलीही पदवी नसताना रुग्णालये थाटून गरीब रुग्णांच्या जिवाशी खेळत असल्याच्या तक्रारी दक्ष नागरिकांनी आरोग्य विभागाकडे केल्या. गंगापूरचे तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. रंगनाथ तुपे, सहायक गटविकास अधिकारी डॉ. स्नेहल शेलार, वाळूज प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. योगिता निर्मळ, अन्न व औषध विभागाच्या औषध निरीक्षक अंजली मिटकर, विस्तार आरोग्य अधिकारी हिरामण गोरे, आरोग्य सहायक रामचंद्र निकम, कानबा झाटे, पोहेकॉ. रेखा चांदे, पोकॉ. राहुल बंगाळे आदींच्या पथकाने शुक्रवारी दुपारी रांजणगावातील श्रीकृष्ण नॅचरोपॅथिक व पार्वती नॅचरोपॅथिक या दोन दवाखान्यांवर छापा मारला. पथकातील सदस्यांनी या दोघांकडे वैद्यकीय पदवी, रुग्णालय नोंदणीची कागदपत्रे इ. विषयी चौकशी केली असता त्यांनी परवाना व वैद्यकीय पदवी नसल्याचे सांगितले. दोघांकडे भारत सेवक समाज संस्थेचे प्रमाणपत्र आढळले. या प्रमाणपत्रावर बीएसएस डिप्लोमा इन नॅचरोपॅथी ॲण्ड योगिक सायन्स असा मजकूर आहे.

गुन्हा दाखलआरोग्य विभागाच्या पथकाने छापा पकडलेल्या शैलेंद्र दास व संजय मंडळ यांच्या ताब्यातून विविध प्रकारची औषधे तसेच रुग्णांना दिलेल्या औषधांच्या पावत्या, वैद्यकीय उपकरणे इ. साहित्य जप्त करण्यात आले. या दोन बोगस डॉक्टरांविरुद्ध डॉ. तुपे यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीवरून या दोन मुन्नाभाईंविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलिस निरीक्षक अविनाश आघाव यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक अशोक इंगोले करीत आहेत.------------------- 

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादdoctorडॉक्टरCrime Newsगुन्हेगारी