शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणूक : संपूर्ण रचना बदलून सातारा-देवळाईत होणार पाच वॉर्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2019 18:22 IST

महापालिकेला नव्याने सर्व ११५ वॉर्ड तयार करावे लागणार असल्याने सर्वांची हद्द आणि रचना बदलणार हे निश्चित.

ठळक मुद्देशहरातील तीन वॉर्ड कमी होणारइच्छुक कार्यकर्त्यांमध्ये चिंता

- मुजीब देवणीकर 

औरंगाबाद : राज्य निवडणूक आयोगाने प्रभाग पद्धतीला स्थगिती दिली. त्यामुळे एप्रिल २०२० मध्ये होणाऱ्या मनपाच्या निवडणुका जुन्या वॉर्ड पद्धतीनेच होणार आहेत. वॉर्ड पद्धतीत शहरातील ११५ वॉर्डांमधील ३ वॉर्ड गायब होणार आहेत. ते वॉर्ड कोणते हे अद्याप निश्चित नाही. सातारा-देवळाई भागात नव्याने तीन वॉर्ड तयार होतील. या भागात एकूण पाच वॉर्ड ठेवण्यात येणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. महापालिकेला नव्याने सर्व ११५ वॉर्ड तयार करावे लागणार असल्याने सर्वांची हद्द आणि रचना बदलणार हे निश्चित.

राज्य निवडणूक आयोगाने १८ डिसेंबर रोजी प्रभाग रचनेच्या सोडतीला स्थगिती दिली. त्यामुळे आता निवडणूक वॉर्ड रचनेप्रमाणेच होणार हे जवळपास निश्चित आहे. राज्य निवडणूक आयोगाकडून अद्याप यासंदर्भात अंतिम मार्गदर्शन आलेले नाही. दोन ते तीन दिवसांमध्ये यासंदर्भात आयोगाकडून सविस्तर पत्र प्राप्त होईल, असा अंदाज वर्तविण्यात येत आहे. महापालिका प्रशासनाने वॉर्ड रचनेप्रमाणे निवडणूक घ्यायची ठरल्यास त्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, यादृष्टीने जवळपास तयारी पूर्ण केली आहे. 

महापालिकेला ११५ पेक्षा अधिक वॉर्ड तयार करता येणार नाही. सातारा-देवळाईचा परिसर २०१५ मध्ये मनपात समाविष्ट करण्यात आला. त्यामुळे या भागात दोन वॉर्ड तयार करून निवडणूक घेण्यात आली होती. २५ हजार मतदारांचा एक वॉर्ड या भागात आहे. वॉर्ड रचनेनुसार महापालिकेच्या निवडणूक विभागात सर्व वॉर्डांची रचना आता दहा हजार मतदारांच्या अनुषंगाने तयार करावी लागेल. सध्या काही वॉर्डांमध्ये ७ हजार, तर काही ठिकाणी १२ हजार मतदार आहेत.

 प्रत्येक वॉर्डात एक हजार मतांचा एक ब्लॉक तयार करण्यात येतो. जास्त मतदार असलेल्या वॉर्डातील ब्लॉक काढून शेजारच्या वॉर्डात जिथे कमी मतदार आहेत, तेथे टाकावे लागतील. या प्रक्रियेत वॉर्डांची रचना पूर्णपणे बदलणार आहे. कोणत्या दिशेने ही प्रक्रिया सुरू करावी, कशा पद्धतीने करावी यासंदर्भातील मार्गदर्शन राज्य निवडणूक आयोग करणार आहे.

गायब होणारे तीन वॉर्ड कोणते?नवीन वॉर्ड रचनेनुसार तीन वॉर्ड कमी होणार आहेत. आता हे तीन वॉर्ड कोणते असतील यावर आता महापालिकेत खल सुरू झाला आहे. विद्यमान ११५ पैकी तीन वॉर्डांचे नावच गायब होणार आहे. त्यामुळे त्या वॉर्डातील विद्यमान नगरसेवकांना आसपासच्या वॉर्डांमध्ये घुसखोरी करण्याशिवाय पर्याय राहणार नाही.

तीन नवीन वॉर्ड जन्माला येतीलसातारा-देवळाईत सध्या दोनच वॉर्ड आहेत. या भागातील लोकसंख्या लक्षात घेऊन मनपा प्रशासन तेथे पाच वॉर्ड तयार करणार आहे. त्यामुळे या भागातील इच्छुकांना नवीन वॉर्डांमध्ये निवडणूक लढवावी लागणार आहे. इच्छुकांनी आतापासूनच तयारीही सुरूकेली आहे. मात्र वॉर्ड कसा राहील हे त्यांनाही माहीत नाही.

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाElectionनिवडणूकSatara areaसातारा परिसरAurangabadऔरंगाबाद