औरंगाबाद : शहरातील पथदिव्यांच्या देखभाल दुरुस्तीसाठी महापालिकेने तब्बल २२ कंत्राटदार नियुक्त केले आहेत. ४० हजार पथदिव्यांपैकी २० हजार पथदिवे बंद असतानाही कंत्राटदारांना दरमहा लाखो रुपयांची बिले अदा करण्यात येत आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार दिल्लीच्या खाजगी कंपनीने साडेचार हजार नवीन पथदिवे लावल्यानंतरही जुन्या कंत्राटदारांना अक्षरश: पोसण्याचे काम सुरू आहे. यावर मनपाच्या तिजोरीतून दरवर्षी ५ कोटी ४५ लाख ४९ हजार रुपये खर्च होत आहेत.
दिल्लीच्या कंपनीला शहरात ४० हजार पथदिवे लावण्याचे काम देण्यात आले. दिवे लावल्यानंतर त्यांची ८ वर्षे देखभाल दुरुस्ती कंपनीकडेच राहणार आहे. कंपनीने मागील तीन महिन्यांमध्ये ४ हजार ५०० दिवे लावले. कंपनीला महापालिकेने अद्याप एक छदामही दिलेला नाही. यापुढे कोणत्या रस्त्यावर दिवे लावायचे याची यादीच मनपा देणार आहे. कंपनीच्या कामाची तपासणी शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे करण्यात आली. कंपनीने लावलेल्या पथदिव्यांचा प्रकाश (लक्स) गरजेपेक्षा जास्त असल्याचा अहवालही मनपाला प्राप्त झाला आहे. कंपनीच्या या कामावर पुढील ८ वर्षांमध्ये ११० कोटी रुपये खर्च होणार आहेत.
महापालिकेत मागील १० वर्षांपासून पथदिव्यांच्या देखभालीसाठी २२ कंत्राटदार नेमले आहेत. चार दिवसांपूर्वीच सर्वसाधारण सभेत २२ कंत्राटदारांना ३० जून २०१८ पर्यंत कामाची वाढीव मुदत देण्यात आली. या कंत्राटदारांवर दरवर्षी साडेपाच कोटी रुपये खर्च करीत आहे. पथदिवे बंद असतानाही महापालिका कंत्राटदारांची बिले एकानंतर एक मंजूर करीत आहे. कंत्राटदारांनी काम केले किंवा नाही हे सुद्धा तपासण्यात येत नाही. २२ पैकी बहुतांश कंत्राटदार मनपाचे नगरसेवकच आहेत. त्यामुळे त्यांचे काम बंद करण्याचे धाडस प्रशासन दाखवीत नाही. नवनियुक्त आयुक्त निपुन विनायक कोट्यवधींच्या या उधळपट्टीवर काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
एकाच कामावर डबल उधळपट्टीज्या भागात दिल्लीच्या कंपनीने पथदिवे लावले आहेत, तेथील देखभाल दुरुस्तीच्या कंत्राटदाराचे काम मनपाने थांबवायला हवे. असे न करता कंपनीसह कंत्राटदारांनाही निव्वळ पोसण्याचे काम प्रशासन करीत आहे.
हे आहेत २२ कंत्राटदार :
प्रभाग कंत्राटदार एजन्सीप्रभाग अ मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग अ मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग अ मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ब मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ब मे. श्री. इलेक्ट्रॉनिक्स अँड रेफ्रिजरेशनप्रभाग ब मे. आकाश इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ब मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग क मे. न्यू इरा इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग क मे. इगल इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग क मे. इगल इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ड मे. तिरुपती इलेक्ट्रिकल्स अँड सर्व्हिसेसप्रभाग ड मे. स्टरलिंग इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ड मे. असंसो लाईटस्प्रभाग ई म. साकळगावकर इलेक्ट्रॉनिक्स वर्क्सप्रभाग ई मे. बाणेश्वर इलेक्ट्रॉनिक्स प्रभाग ई मे. पूजा इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ मे. असंसो लाईटस्प्रभाग फ मे. न्यू इरा इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्सप्रभाग फ मे. असंसो लाईटस्देवळाई मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्ससातारा मे. मातोश्री इलेक्ट्रिकल्स