शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
4
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
5
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
6
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
7
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
8
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
9
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
10
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
11
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
12
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
13
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
14
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
15
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
16
लोकसभेत असं काय घडलं की अमित शाह यांच्या सुरक्षेसाठी धावले मार्शल? विधेयकाची प्रतही फाडली गेली!
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पडेगाव, मिटमिटात ४३ वर्षांनंतर हातोडा; लाखावर लोकसंख्या गेल्यानंतर मनपाचे उघडले डोळे

By विकास राऊत | Updated: July 4, 2025 20:25 IST

तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या.

छत्रपती संभाजीनगर : पडेगाव, मिटमिटा परिसर महापालिका हद्दीत १९८२ साली आला. दि. ८ डिसेंबर १९८२ रोजी महापालिकेची स्थापना झाल्यानंतर लगतचे १८ खेडी पालिका हद्दीत आले. त्यात पडेगाव आणि मिटमिटा या गावांचादेखील समावेश आहे. सुमारे तीन हजार लोकसंख्या असलेली ही गावे ग्रामपंचायतीमध्ये होती. मनपा हद्दीत ही दोन्ही गावे आल्यानंतर ४३ वर्षांत त्या गावांची लोकसंख्या एक लाखाहून पुढे गेल्यानंतर आता कुठे विकास आराखड्यानुसार रस्ता रुंदीकरणासाठी पालिकेचे डोळे उघडले.

समृद्धी महामार्ग आणि सोलापूर-धुळे हायवे होण्यापूर्वी शहरातून मुंबईकडे जाण्यासाठी पडेगाव-मिटमिटामधून हाच प्रमुख मार्ग होता. वेरूळ, खुलताबाद, दौलताबाद, कन्नड ते चाळीसगावमार्गे धुळ्याकडे जाण्यासाठी पडेगाव ओलांडून जावे लागत असे. मनपावर १९८२ ते १९८८ पर्यंत प्रशासक हाेते. प्रशासकराज १९८८ साली संपल्या पहिल्या निवडणुकीत पडेगाव हा एकमेव वॉर्ड होता. २०१५ साली झालेल्या निवडणुकीत पडेगाव आणि मिटमिटा हे स्वतंत्र वॉर्ड होते. ४३ वर्षांत गावांचे शहरात रूपांतर झालेला हा परिसर सध्या समृद्धी महामार्ग, सोलापूर धुळे हायवे, वाळूज औद्योगिक वसाहतीलगतचा मध्यवर्ती भाग आहे.

अपघातांचा मार्ग म्हणून चर्चेतअलीकडच्या काळात जडवाहतुकीला पर्यायी मार्ग सुरू झाल्यामुळे पडेगाव ते मिटमिटा या रस्त्यावर होणारे अपघात कमी झाले आहेत. मागील वर्षभरात तीन मोठे अपघात झाले. यात दोघांचा मृत्यू झाला. किरकोळ अपघातांची संख्या तर मोठी आहे.

पडेगाव वॉर्डामध्ये किती वसाहतीरामगोपालनगर, माजी सैनिक कॉलनी, देवगिरी व्हॅली, चिनार गार्डन, फिरदौस गार्डन, गुलमोहर कॉलनी, कादरी हॉस्पिटल परिसर, प्रिया कॉलनी, पावर हाऊस, चेतननगर, सुंदरनगर, मीरानगर या वसाहती आहेत, तर मिटामिटा वॉर्डात बकतुलनगर, तारांगण, आर्चअंगण, मिस्बाह कॉलनी, मच्छिंद्रनाथ मंदिर परिसर, अप्पावाडी, शरणापूर फाटा परिसर येतो. या भागातील नागरी वसाहतींना शहरात येण्यासाठी विद्यमान रस्ता एकमेव आणि सोयीचा आहे. २० ते २२ वसाहतींमधील वाहनांचे दळणवळण वाहतुकीच्या कोंडीतून येथे नित्याचे आहे.

एक्सपर्ट काय म्हणतातशहरात प्रवेश करणारा तो महत्त्वाचा रस्ता आहे. ४३ वर्षांनंतर मनपाने कारवाई केली आहे. ही कारवाई मागेच करणे अपेक्षित होते. तीन विकास आराखडे आजवर झाले असतील. त्यानुसार मागेच कारवाई झाली असती तर एवढ्या टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या नसत्या. आता लोकसंख्या लाखाच्या पुढे गेली असेल. अतिक्रमणांवर कारवाई व्हावी, तर मालकी असलेल्यांना मनपााने टीडीआर, एफएसआय द्यावा.-जयंत खरवडकर, सेवानिवृत्त मनपा अधिकारी

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीEnchroachmentअतिक्रमणAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिका