शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

उत्तरानगरीत टँकरद्वारे मोफत पाणी देण्याचे महापालिकेचे आश्वासन 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2018 16:54 IST

उत्तरानगरीतील जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील अधिकृत नळजोडणीधारकांना शुक्रवार (दि.२७ एप्रिल) पासून महापालिकेतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेतर्फे देण्यात आले.

ठळक मुद्देउत्तरानगरीत राहणाऱ्या उच्च न्यायालयातील ७ वकिलांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल केली

औरंगाबाद : उत्तरानगरीतील जलवाहिन्यांचे काम पूर्ण होईपर्यंत या भागातील अधिकृत नळजोडणीधारकांना शुक्रवार (दि.२७ एप्रिल) पासून महापालिकेतर्फे टँकरद्वारे मोफत पाणीपुरवठा करण्यात येईल, असे आश्वासन महापालिकेतर्फे देण्यात आले. यावर समाधान व्यक्त करीत न्या. एस. एस. शिंदे आणि न्या. एस. एम. गव्हाणे यांनी जनहित याचिका आणि अवमान याचिकांची पुढील सुनावणी ३ मे २०१८ रोजी ठेवली आहे. 

उत्तरानगरीत राहणाऱ्या उच्च न्यायालयातील ७ वकिलांनी खंडपीठात जनहित याचिका दाखल करून या भागातील रहिवाशांनी ९६ लाख रुपये कर भरूनही महापालिका त्यांना पाणीपुरवठा करीत नसल्याबाबत म्हणणे मांडले. तसेच त्यांनी खंडपीठाच्या १९ डिसेंबर २०१६ च्या आदेशाच्या अनुषंगाने पालिकेने आठ दिवसांत पाणी देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्यापही या भागाला पाणीपुरवठा केला जात नाही, याकडे खंडपीठाचे लक्ष वेधले. याचिकाकर्त्यांनी तत्कालीन मनपा आयुक्त ओम प्रकाश बकोरिया आणि डी. एम. मुगळीकर तसेच विद्यमान प्रभारी मनपा आयुक्त उदय चौधरी, नगरविकास विभागाच्या सचिव मनीषा म्हैसकर यांना वैयक्तिक प्रतिवादी केले आहे. 

आज जनहित याचिका आणि अवमान याचिकेवर एकत्रित सुनावणी झाली. प्रभारी मनपा आयुक्तांनी खंडपीठात पत्र सादर करून माहिती दिली की, त्यांनी बुधवारी (दि.२५ एप्रिल) रोजी उत्तरानगरी भागाला भेट दिली. येथील ५० टक्केभागाला एन-५ मधील जलकुंभातून पाणीपुरवठा केला जातो. उर्वरित भागात ‘डी.आय.’ जलवाहिन्या टाकण्यासाठीची निविदा ५ मे २०१८ रोजी उघडण्यात येणार असून, त्यानंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.उत्तरानगरीतील केवळ ३४१ सदनिकाधारकांनी अधिकृत नळजोडणीसाठी अर्ज केले असून, त्या सर्वांना रीतसर जोडणी दिली आहे. त्यांच्यापैकी २५० पेक्षा जास्त लोकांना पाणीपुरवठा होत आहे. उच्च न्यायालयाने पाणीपुरवठ्याच्या तात्काळ उपाययोजनेबद्दल विचारले असता मनपातर्फे टँकरद्वारे पाणी देण्याचे आश्वासन देण्यात आले. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. ए. बी. काळे तर महापालिकेतर्फे अ‍ॅड. संभाजी टोपे आणि शासनातर्फे अमरजितसिंह गिरासे काम पाहत आहेत.  

टॅग्स :WaterपाणीAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाMunicipal Commissioner Aurangabadमहानगरपालिका आयुक्त औरंगाबादAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठ