शहरं
Join us  
Trending Stories
1
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
2
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
3
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
4
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
5
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
6
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
7
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
8
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
9
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
10
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
11
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
12
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
13
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
14
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
15
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
16
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
17
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
18
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
19
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
20
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा

‘माणिक’च्या राखेवर मनपाचे पाणी; साधी नोटीसही बजावण्याची घेतली नाही तसदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 5, 2018 19:34 IST

गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलला लागलेली आग विझून ४८ तासही झालेले नसताना महापालिका प्रशासनाने  प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देमाणिक हॉस्पिटल सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णसेवा देत होते हे जगजाहीर असतानाही मनपा प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्यास अजिबात तयार नाही. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रुग्णालयाला साधी नोटीसही बजावण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही.

औरंगाबाद : गारखेड्यातील माणिक हॉस्पिटलला लागलेली आग विझून ४८ तासही झालेले नसताना महापालिका प्रशासनाने  प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. ३६ पेक्षा अधिक रुग्णांचा जीव धोक्यात घालणाऱ्या रुग्णालयाला साधी नोटीसही बजावण्याची तसदी प्रशासनाने घेतली नाही. रुग्णालयाने संपूर्ण मनपा प्रशासनालाच मॅनेज केले काय? अशी चर्चा आता सुरू आहे.

माणिक हॉस्पिटल सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णसेवा देत होते हे जगजाहीर असतानाही मनपा प्रशासन कारवाईचा बडगा उगारण्यास अजिबात तयार नाही. बांधकाम परवानगीत असंख्य घोटाळे, अग्निशमन एनओसीही अक्षरश: बोगस पद्धतीची दिली आहे.  रुग्णालयाचे जिथे आयसीयू होते त्याच्या बाजूलाच २४ तास डागडुजीचे काम सुरू होते.  बांधकाम परवानगीत दाखविलेल्या पार्किंगचा रुग्णालयाचे विविध विभाग चालविण्यासाठी उपयोग सुरू होता. सोमवारी सकाळी  जेव्हा रुग्णालयाला आगीने वेढा घातला तेव्हा सर्व बिंग फुटले. मोठा राजकीय वरदहस्त असल्यास सर्व नियम धाब्यावर बसवून रुग्णालय कशा पद्धतीने चालविले जाऊ शकते याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे माणिक हॉस्पिटल होय. येथे सर्व काही नियमानुसारच सुरू होते असा खोटा अहवाल मंगळवारी रात्री अग्निशमन अधिकाऱ्यांनी महापौरांना दिला.

खाजगी फायर आॅडिटची मागणीनवीन इमारतींसाठी बांधकाम परवानगी देताना उपाययोजना कराव्यात,  अग्निशमन विभागाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेण्यात यावे, असे आवाहन महापालिकेतर्फे वारंवार करण्यात येत आहे; मात्र त्याला प्रतिसाद मिळत नाही. ज्यांनी अग्निशमन यंत्रणा बसविली आहे, त्यांनी वर्षातून दोन वेळा फायर आॅडिट करून घेणेदेखील बंधनकारक आहे.अग्निशमन विभागात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त आहेत. त्यामुळे फायर आॅडिटची कामेदेखील रखडली असून, या कामासाठी शासनाची मान्यता असलेल्या खासगी एजन्सीची नियुक्ती करावी, अशी सूचना महापौर  घोडेले यांनी  केली.

टॅग्स :hospitalहॉस्पिटलHealthआरोग्यAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाfireआग