शहरं
Join us  
Trending Stories
1
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
2
"ही तर फक्त सुरूवात..." नाशिकमध्ये उद्धवसेना-मनसे संयुक्त जनआक्रोश मोर्चा; भाजपाला दिलं आव्हान
3
'मी अशिक्षित असूनही रडकुंडीला आणलं', भुजबळांच्या टीकेवर मनोज जरांगेंचे जोरदार प्रत्युत्तर
4
छत्तीसगडच्या बिजापूरमध्ये २ नक्षलवादी ठार; गेल्या २४ तासांत दुसरी मोठी कारवाई
5
दिल्लीनंतर मुंबई हायकोर्टालाही बॉम्बने उडवून देण्याची धमकी; दोन्ही कोर्टात गोंधळ
6
विजयादशमी २०२५: दसरा कधी आहे? देशभरात होतो साजरा; पाहा, महाराष्ट्रातील वैशिष्ट्य-मान्यता
7
"सरकारने ओबीसींचा विश्वासघात केला, आतातरी तो अन्यायकारी शासन निर्णय रद्द करा’’, काँग्रेसची मागणी 
8
आता जुनी कार चालवणं होणार महाग, फिटनेस टेस्टच्या नावाखाली खिसे कापायची तयारी
9
"२ वाजल्यानंतर स्फोट होणार"; दिल्ली उच्च न्यायालय उडवून देण्याची धमकी; परिसरात खळबळ
10
सोन्या-चांदीच्या किंमतीत जोरदार तेजी; चांदीत २८०० रुपयांची वाढ, खरेदीपूर्वी जाणून घ्या लेटेस्ट रेट
11
५ राशींचे शनि आयुष्यभर कल्याण करतो, सुख-सुबत्ता-समृद्धी देतो; पैशांची चणचण नसते, शुभच होते!
12
VIRAL : "हा तर आमच्या पाणीपुरीचा अपमान"; सोशल मीडियावरील व्हायरल व्हिडीओ पाहून का संतापले नेटकरी?
13
जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेत होते मंत्री, तेवढ्यात धडाधड कोसळलं छत, त्यानंतर...  
14
नोकरी गमावल्यानंतर तुमचे गृहकर्ज, गाडीचा हप्ता भरला जाईल! काय आहे जॉब लॉस इन्शुरन्स? कसा मिळवायचा?
15
जीएसटी २.० साईड इफेक्ट...! इलेक्ट्रीक दुचाकी, कारच्या किंमती कमी कराव्या लागणार? ती वेळ आलीय... 
16
ज्वाला गुट्टानं ३० लीटर ब्रेस्ट मिल्क केले दान; 'या' खास कारणामुळे उचललं कौतुकास्पद पाऊल
17
काँग्रेसने शेअर केला PM मोदी आणि त्यांच्या आईचा Ai व्हिडिओ; BJP ने केला पलटवार...
18
Nepal Crisis : नेपाळमध्ये निदर्शकांनी हॉटेलला आग लावली, जीव वाचवण्यासाठी भारतीय महिलेने चौथ्या मजल्यावरून उडी मारली; जागीच मृत्यू
19
ज्ञानेश्वरी जयंती २०२५ : ज्ञानेश्वरीचे मूळ नाव माहितीय का? महिला संतांनी दिली होती ओळख!
20
भोपाळच्या ९० डिग्री पुलाबद्दल खोटं बोललं गेलं? कंपनी ब्लॅकलिस्टेड झाल्यावर समोर आला भलताच रिपोर्ट!

मनपाने आश्वासन पाळले नाही, आता १० कोटी भरा; अन्यथा छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2025 16:40 IST

जलसंपदा विभागाची मनपाला नोटीस : आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही.

छत्रपती संभाजीनगर : शहराचा पाणीपुरवठा खंडित करू नये, यासाठी ३१ मार्चपूर्वी दीड कोटी रुपये भरतो, हे आश्वासन मनपा आयुक्तांनी पाळले नाही. यामुळे संतप्त झालेल्या जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी आता महापालिकेला नव्याने नोटीस बजावून १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत भरा, अन्यथा २८ एप्रिलपासून शहराचा पाणीपुरवठा बंद करण्याचा इशारा दिला आहे.

जायकवाडी प्रकल्पातून जुन्या आणि नवीन पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला रोज १४० एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या पाणीवापरासाठी जलसंपदा विभागाकडून महापालिकेला दरवर्षी सुमारे ७ कोटी रुपयांचे बिल देण्यात येते. मात्र, आर्थिक परिस्थिती व्यवस्थित नसल्याने मनपाकडून पाणीबिलाचा नियमित भरणा केला जात नाही. परिणामी, पाटबंधारे विभागाचे महापालिकेकडे तब्बल ५२ कोटी ४१ लाख रुपयांची पाणीपट्टी थकबाकी आहे. ३१ मार्चच्या पार्श्वभूमीवर मनपाने किमान सहा कोटी रुपयांचा भरणा करावा, यासाठी जायकवाडी पाटबंधारे विभागाने मनपा आयुक्तांकडे पाठपुरावा केला. पाणीपुरवठा खंडित करण्याच्या नोटिसाही बजावल्या. २४ फेब्रुवारी रोजी मनपा आयुक्तांसोबत बैठक झाल्यानंतर मनपाने साडेचार कोटी रुपये दिले.

३१ मार्चला काही दिवस उरले असताना पाटबंधारे विभागाचे मुख्य प्रशासक तथा मुख्य अभियंता जयंत गवळी यांनी मनपा आयुक्त जी. श्रीकांत यांच्याशी उर्वरित पाणीपट्टीसंदर्भात चर्चा केली होती. तेव्हा आयुक्तांनी त्यांना मार्चअखेरपर्यत दीड कोटी रुपये देतो, असे आश्वासन दिले होते. यामुळे शहराचा पाणीपुरवठा खंडित करण्यात आला नाही. मात्र, आता एप्रिलचा तिसरा शेवटचा आठवडा सुरू झाला तरी मनपाने दीड कोटी दिले नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी मनपाला नव्याने नोटीस बजावून गत वर्षातील ३ कोटी, तसेच चालू वर्षाचे ७ कोटी असे एकूण १० कोटी रुपये २५ एप्रिलपर्यंत एकरकमी अदा करावेत, अन्यथा शहराचा पाणीपुरवठा २८ एप्रिलपासून बंद करण्याचा इशारा दिला आहे.

पाणीपुरवठा खंडित करण्यात येणारमनपाने आम्हाला आश्वासन देऊनही पाणीपट्टीची थकबाकी दिली नाही. यामुळे आता नव्याने नोटीस बजावून २५ एप्रिलपर्यंत १० कोटींचा भरणा करण्याचे सांगण्यात आले आहे. वेळेत रक्कम जमा न केल्यास २८ एप्रिलपासून छत्रपती संभाजीनगरचा पाणीपुरवठा खंडित करण्यात येणार आहे.- दीपक डोंगरे, सहायक अधीक्षक अभियंता

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाTaxकरJayakwadi Damजायकवाडी धरणIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प