शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! खेळाच्या मैदानावर महापालिकेने दिली बांधकाम परवानगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2025 19:33 IST

परवानगी रद्द करण्यासाठी सिडको प्रशासनाचे मनपाला पत्र

छत्रपती संभाजीनगर : एन १३ मधील सर्व्हे नं. ११७ मध्ये अडीच एकर खुले मैदान असून तेथे मनपाने खासगी बांधकामाला परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. तेथील बांधकामाची परवानगी रद्द करून ते बांधकाम पाडण्यासाठी सिडको प्रशासनाने पालिकेला पत्र दिल्याची माहिती सिडकोचे मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे यांनी गुरुवारी दिली.

सिडकोने क्रीडांगणे, खुली मैदाने, ग्रीन बेल्ट नागरिकांच्या सोयीसाठी आराखड्यात नियोजित केले. १३ उद्याने, २६ क्रीडांगणांवर सध्या अतिक्रमण होत असल्याचे दिसत असून मनपानेही बांधकाम परवानगी दिल्याच्या प्रकारामुळे कुुंपणच शेत खात असल्याचे दिसते आहे.

अधिकारी साटोटे म्हणाले, टीव्ही सेंटर मैदानात पालिकेने वॉर्ड कार्यालयाचे बांधकाम केले, त्यासाठी सिडकोकडे काहीही परवानगीची विचारणा केली नाही. तसेच एन-६ येथील मनपाच्या शाळेचीही विनापरवाना तोडफोड केली. ती शाळा सिडकोने बांधलेली आहे. एप्रिल २००६ मध्ये सिडकोतील वसाहतींचे सोयी-सुविधांसाठी मनपाकडे हस्तांतरण झाले. त्यात खुली मैदाने, उद्याने, क्रीडांगणांसाठी एनओसीचे अधिकार सिडकोकडे ठेवून हस्तांतरण झाले. परंतु १८ वर्षांत सिडकोने आरक्षित केलेल्या उद्यान, क्रीडांगण, मैदानांची वाताहत झाल्याचे दिसते आहे. शाळांसाठी जे क्रीडांगण, मैदान राखीव ठेवले आहे. त्यावर सिडकोने एनओसी दिल्याशिवाय भाडेकरार किंवा बांधकाम करण्यास परवानगी देता येत नाही. तसेच ते मैदान इतरांना देता येणार नाही. व्यावसायिक वापर करता येणार नाही, असेही त्यावेळी ठरले होते.

ऑडशेपच्या विक्रीच्या तक्रारीसिडकोने भूखंड विक्री वेळेस जे करार केले, त्यात भूखंडालगत असलेली ओपन स्पेस (ऑडशेप) बांधकाम करून विक्री अथवा भाडेकरारावर देता येत नाही. विक्री, भाडेकरारावर ती ओपन स्पेस द्यायची असेल तर सिडकोची एनओसी बंधनकारक असेल. तसेच त्या जागेच्या उत्पन्नातून मिळणारी ५० टक्के रक्कम सिडकोला मालकांना द्यावी लागेल. ऑडशेप भाड्याने अथवा विक्रीचे प्रमाण वाढल्याच्या तक्रारी येत आहेत.

सिडको ॲक्शन मोडवरतेरणा संस्थेने खुल्या मैदानाची, एन : १३ येथील बांधकामाची गुरुवारी सिडको मालमत्ता अधिकारी गजानन साटोटे व पथकाने पाहणी केली. सर्व्हे नं. ११७ मधील एन:१३ येथे मनपाने दिलेली बांधकाम परवानगी रद्द करा, असे पत्र मनपाला दिले आहे. अडीच एकर जागा तेथे आहे. तसेच झालर क्षेत्रातील पाच अनधिकृत बांधकामांवर गुन्हे दाखल केले आहेत. आजवर ३१ अनधिकृत बांधकामांविरोधात सिडकोने कारवाई केली आहे. सहा ठिकाणी अतिक्रमणे पाडली आहेत. अनधिकृत आरसीसी बांधकामे विनापरवाना होत आहेत. हिरापूर, सुंदरवाडी, हिरापूर येथील बांधकामांचा समावेश आहे. मनपाने परवानगी दिल्यानुसार सुरू असलेल्या बांधकामाचे फोटो न्यायालयात ठेवण्यात येतील, असेही सिडकोने सांगितले.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरMuncipal Corporationनगर पालिकाEnchroachmentअतिक्रमण