शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाचे राहुल गांधींना खडे बोल  
2
बीएसएनएलने आणला १ रुपयांत फ्रिडम प्लॅन! ३० दिवस डेटा, कॉलिंग अन्... मोफत...
3
“सप्टेंबरमध्ये देशात मोठ्या राजकीय घडामोडी”; संजय राऊतांचे भाकित, म्हणाले, “RSS बैठकीत...”
4
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
5
पाणी पाकिस्तानची पाठ सोडेना! उन्हाळ्यात पाणी प्यायला मिळेना, पावसाळ्यात महापूर
6
"मी स्किन व्हाइटनिंग सर्जरी केलेली नाही तर...", काजोलने सांगितलेलं तिच्या फेअरनेसचं रहस्य
7
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
8
Video - बँड-बाजा अन् शेवटचा निरोप! गाव रडलं पण 'तो' मित्राच्या अंत्ययात्रेत आनंदाने नाचला, कारण...
9
Lunchbox Recipe: परवलाचं चमचमीत भरीतही होऊ शकतं, कधी ट्राय केलंय का? पहा सोप्पी रेसिपी
10
रेपो दराच्या बैठकीपूर्वी सोन्या-चांदीच्या दरात वाढ, तुमच्या शहरात २४ कॅरेट सोन्याचा भाव काय?
11
१० हजारांत भारतीय थायलंडमध्ये काय काय करू शकतात? भारताच्या रुपयाची 'बाथ'मध्ये किती किंमत?
12
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
13
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
14
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
15
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
16
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
17
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
18
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
19
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
20
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली

स्मार्ट सिटीच्या सीईओ पदी नियुक्तीवर महापालिका प्रशासकांचा आक्षेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 4, 2021 19:43 IST

औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिकेच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आला.

औरंगाबाद : राज्य शासनाने स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) पदी मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांची नियुक्ती केली आहे. मात्र, आता त्यावर मनपा प्रशासक पांडेय यांनीच आक्षेप घेतला आहे. मनोहरे यांची नियुक्ती चुकीची असून, ती रद्द करण्यात यावी, अशी लेखी मागणीदेखील त्यांनी नगरविकास खात्याकडे केली असल्याचे सूत्रांनी सांगितले. मनपा प्रशासक पांडेय यांनाच सीईओपदी ठेवावे, अशी मागणी माजी महापौर नंदकुमार घोडेले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्र्यांकडे केली आहे.

औरंगाबादस्मार्ट सिटी डेव्हलपमेंट काॅर्पोरेशन प्रा. लिमिटेड कंपनीच्या चेअरमनपदी शासनाने प्रधान सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याची नियुक्ती केली, तर मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा पदभार महापालिकेच्या आयुक्तांकडे सोपविण्यात आला. पदसिद्ध सीईओ म्हणून महापालिका आयुक्त आजपर्यंत काम पाहत आले आहेत. मात्र, दोन दिवसांपूर्वी नगर विकास विभागाने स्मार्ट सिटीच्या सीईओपदी मुख्याधिकारी संवर्गातील बाबासाहेब मनोहरे यांच्या नियुक्तीचे आदेश जारी केले. त्यामुळे आपोआप मनपा प्रशासक पांडेय यांच्याकडील स्मार्ट सिटीचा पदभार कमी झाला. आता पांडेय यांनी या नियुक्तीवर आक्षेप नोंदविला असून, ही नियुक्ती रद्द करण्याची लेखी मागणी नगर विकास विभागाकडे केली आहे. नगरविकास खात्याचे प्रधान सचिव महेश पाठक यांच्याकडे याबाबतचे पत्र पाठविले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मागील काही महिन्यांपासून पांडेय उत्कृष्ट काम करीत आहेत. त्यांना सीईओपदी कायम ठेवावे, अशी मागणी माजी महापौर घोडेले यांनी मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्याकडे केली.

पत्रात काय म्हटले आहेपांडेय यांनी पत्रात १८ जून २०१६ च्या पत्राचा हवाला दिला आहे. त्यानुसार स्मार्ट सिटीचे सीईओ हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी असतील आणि भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांचा नियुक्तीसाठी प्राधान्याने विचार केला जाईल, असे नमूद आहे. मनोहरे हे भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकारी नाहीत. याशिवाय औरंगाबाद स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनच्या संचालक मंडळाने याआधीच सीईओ म्हणून मनपा आयुक्तांची नियुक्ती केलेली आहे. त्यामुळे सध्या हे पद रिक्त नाही, असा दाखला दिल्याचेही सूत्रांकडून समजते.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाSmart Cityस्मार्ट सिटी