शहरं
Join us  
Trending Stories
1
सुभेंदु अधिकारी नसते तर ५,००० कार्यकर्त्यांची हत्या झाली असती; ममतांच्या प्रवक्त्याचा खळबळजन दावा
2
धक्कादायक! अनैतिक संबंधात अडसर, पतीला शॉक देऊन संपवण्याचा प्रयत्न; पत्नीसह प्रियकराला अटक
3
शेअर मार्केट, बँक बॅलेन्स २१३ कोटी, १०० कोटींच्या FD...! CM विजय यांची संपत्ती आहे तरी किती? असा आहे गुंतवणुकीचा 'फंडा'
4
Urvil Patel Fastest Fifty Record : उर्विल पटेलचं वादळी अर्धशतक; यशस्वी जैस्वालच्या विक्रमाची बरोबरी
5
धक्कादायक! मोदींच्या नियोजित सभेच्या ठिकाणापासून जवळच सापडली स्फोटके, बंगळुरूत खळबळ
6
तमिळनाडूत थलपती सरकारचा पॉवरफुल निर्णय! मोफत विजेची मर्यादा थेट 'दुप्पट', सर्वसामान्यांचे बिल निम्म्यावर
7
IPL 2026 : १८० पेक्षा अधिक धावसंख्येचा पाठलाग करताना कसा आहे CSK चा रेकॉर्ड?
8
Thalapathy Vijay : Video - 'डाऊन टू अर्थ' मुख्यमंत्री! शपथ होताच उचललं टेबल; विजय यांच्या साधेपणाने जिंकली लोकांची मनं
9
लग्नाचा हट्ट नडला! प्रियकराने भावोजीच्या मदतीने प्रेयसीचा काटा काढला; रेल्वे ट्रॅक शेजारी फेकला मृतदेह
10
CSK vs LSG : हाऊ इज द जोश! Josh Inglis चा धमाका! शतक हुकलं; पण वादळी खेळीसह साधला मोठा डाव
11
Video - अतूट बंध! तू एकटी नाहीस... कॅन्सरशी लढणाऱ्या पत्नीसाठी पतीनेही कापले स्वत:चे केस
12
किम जोंगच्या जीवाचं काही बरंवाईट झाल्यास थेट अणुबॉम्बच टाकणार, उत्तर कोरियाने घेतला मोठा निर्णय
13
Persian Gulf Tension: समुद्रात पुन्हा रक्ताची होळी? कतारच्या किनाऱ्याजवळ ब्रिटनच्या जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
14
शेअर बाजारात 'या' ५ शेअर्सचा धुमाकूळ! पाचच दिवसांत दिला ४५ ते ८० टक्क्यांपर्यंत परतावा; बघा लिस्ट
15
हंटाव्हायरस बाधित जहाज अखेर स्पेनला पोहोचलं! ३ जणांचा बळी; प्रवाशांच्या सुटकेसाठी WHO कडून 'स्पेशल ऑपरेशन'
16
जे बंगालमध्ये घडलं नाही ते तामिळनाडूत घडलं, विजय यांनी भाजपाच्या हातून मोठा मुद्दा पळवला? शपथविधीवेळी घडलं असं काही...  
17
तामिळनाडूचे CM होताच जोसेफ विजय यांनी काढला १० लाख कोटींच्या कर्जाचा मुद्दा, स्टालीन भडकले! प्रकरण काय?
18
Video - आता हे काय नवीन? "आणखी अभ्यास केला असता तर..."; लेकाला ४९९/५०० गुण मिळूनही आई नाराज
19
Hanta Virus : "घाबरण्याची गरज नाही, परिस्थिती नियंत्रणात, पण..."; हंटा व्हायरसबाबत WHO चा मोलाचा सल्ला
20
बूट पळवण्याच्या खेळावरून इतका वाद झाला की, चिडलेल्या नवरीनं मांडवातूनच नवऱ्याला माघारी धाडला!
Daily Top 2Weekly Top 5

मुरबाड जमिनीत पिकलं सोनं़़!

By admin | Updated: June 18, 2014 01:43 IST

चेतन धनुरे ,लातूर घरात शिक्षणाचा मागमूस नाही़़़ उन्हातान्हात राबायचे, कष्ट करायचे इतकेच त्यांच्या ध्यानी़

चेतन धनुरे ,लातूर
घरात शिक्षणाचा मागमूस नाही़़़ उन्हातान्हात राबायचे, कष्ट करायचे इतकेच त्यांच्या ध्यानी़ घरात कसलीही पार्श्वभूमी नसताना औसा तालुक्यातील हसलगण येथील एका कष्टकऱ्याच्या मुलाने लातूरच्या शिवाजी विद्यालयातून घवघवीत यश मिळविताना ९५़६० टक्के गुण मिळविले आहेत़ मुरबाड शेतात नाही पिकलंच नसलं तरी घरात सोनं पिकल्याचा आनंद या विद्यार्थ्याच्या घरी ओसंडून वाहत होता़
हसलगण येथील प्रसाद मोरे असे या विद्यार्थ्याचे नाव आहे़ वडील धनंजय मुरबाड जमिनीत राबून उदरनिर्वाहाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी धडपड करतात़ आई अरुणा त्यांना घरासोबतच शेतीकामातही मदत करतात़ दोघांच्याही शिक्षणाचा पत्ता नाही़ प्रसाद या त्यांच्या पुत्ररत्नातील चमक ओळखून शिक्षक तसेच नातेवाईकांनी धनंजय मोरे यांना त्यास शिक्षणासाठी लातुरात ठेवण्याचा सल्ला दिला़ बेताच्या परिस्थितीमुळे प्रसादला बँकेत काम करणाऱ्या चुलतभावाकडे ठेऊन लातूरच्या शिवाजी विद्यालयात प्रवेश दिला़ येथे खोलीत ५ जण राहत असल्याने थोडासा गोंधळ असायचा़ परंतु, परिस्थितीमुळे परिक्षेच्या अगदी शेवटच्या टप्प्यात अभ्यासिका लावून अभ्यास केला़ त्याचा फायदा झाल्याचे प्रसाद सांगतो़ शाळेतच बराच वेळ अभ्यासाची तयारी करवून घेतली जात होती़ उर्वरीत वेळेपैकी ४ ते ५ तास अभ्यास करायचा़ विषय कुठलाही अवघड वाटत नसत़ परंतु अभ्यास कमी पडतो की काय, अशी थोडीशी भिती वाटायची़ परंतु, मन लावून अभ्यास केल्यामुळे माझा निकाल चांगला लागल्याचे प्रसादने सांगितले़ प्रसादचा दहावीचा निकाल लागला तेव्हाही वडील धनंजय मोरे शेतातच राबत होते़ त्याच्या गुणवत्तेची माहिती कानी टाकल्यानंतर झालेल्या आनंदाने त्यांना कौतुकाचे शब्दही सूचत नव्हते़ त्यांनी धावतच घराकडे जाऊन पोराचे कौतुक केले़
मुरबाड जमिनीत वर्षभर राबूनही पोटभर धान्य पिकविता आले नाही़ परंतु, आमच्या कष्टाची जाण ठेऊन पोरगं सोन्यासारखं पिकलं, अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या़
कलेक्टर व्हायचंय़़़्
दहावीनंतर आता अकरावी, बारावी करुन मेडिकलला प्रवेश घ्यायचा आहे़ एमबीबीएस झाल्यानंतर केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परिक्षा देऊन कलेक्टर व्हायचंय्, असा मानस प्रसाद मोरे याने व्यक्त केला आहे़