शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

मुंबईतील विद्यार्थी करिअरचे; औरंगाबादचा पदवीचे बोलतो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 19:55 IST

मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले.

- राम शिनगारे 

मुंबई, पुणे, कोल्हापूर आणि औरंगाबाद येथील विद्यापीठांच्या कुलगुरूपदाचा कारभार पाहताना अनेक अनुभव आहेत. त्यात मुंबई आणि औरंगाबादेतील विद्यार्थ्यांच्या विचारसरणीमध्ये मूलभूत फरक असल्याचे जाणवले. मुंबईतील विद्यार्थी करिअरचे बोलतो. औरंगाबादेतील विद्यार्थी पदवीबद्दल बोलत असतो. हा विचारातील फरक बदलावा लागेल, असे मत कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी व्यक्त केले.

चार विद्यापीठांचे कुलगुरूपद भूषविले आहे. या सर्व ठिकाणी आपणाला काय वेगळेपण जाणवले?  मुंबई विद्यापीठाला दीर्घ परंपरा आहे. त्याठिकाणी शिक्षणाचा मोठा वारसा आहे. जागतिक दर्जाचे शहर आहे. कोल्हापूरला शाहू महाराजांच्या राजवटीचा परिणाम अद्यापही जाणवतो. त्याठिकाणी शिक्षणाची एक परंपरा निर्माण झालेली आहे. त्याठिकाणी विद्यापीठांमध्ये कोणत्याही राजकीय पक्ष, संघटनांचा हस्तक्षेप नसतो. पुण्यातही विद्वत्तेची मोठी परंपरा आहे. महात्मा फुले यांचा वारसा आहे. मात्र औरंगाबादेतील निजाम राजवटीचा प्रभाव अद्यापही जाणवतो. यातून बाहेर यावे लागेल. 

जॉब रेडी युवक कसे तयार होतील? काहीच करता येत नाही म्हणून दुसरे शिक्षण घेतल्यामुळे अनेक समस्या निर्माण होत आहेत. त्या शिक्षणाला कौशल्याची जोड द्यावी लागेल. त्यातून उद्योगासह सेवा क्षेत्रासाठी आवश्यक असलेले जॉब रेडी विद्यार्थी तयार करावे लागतील. त्यासाठी कौशल्य, संशोधन, तंत्रज्ञान आणि व्यवस्थापन या चतु:सूत्रीवर अधिक भर द्यावा लागेल.

बदलत्या तंत्रज्ञानात विद्यापीठांना सुद्धा बदलावे लागेल. हा बदल कसा असावा?  तंत्रज्ञानातील बदलाचा वेग प्रचंड आहे. हा बदल टिपताना मूलभूत ज्ञानाला सोबतच घेऊन जावे लागते. मूलभूत ज्ञान आणि बदलत्या तंत्रज्ञानाची सांगड घालतानाच  विवेक वापरावा लागेल. हा विवेक मिळण्याचे दोन ठिकाण आहेत. त्यातील पहिले ठिकाण हे घर असून, दुसरे ठिकाण ही शाळा आहे.

विद्यापीठाची प्रतिमा सुधारण्यासाठी काय करावे?  प्रत्येक व्यक्तीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हे आपले विद्यापीठ वाटले पाहिजे. त्यासाठी विद्यापीठालाही पुढे यावे लागेल. जनतेशी संवाद साधत नाळ जोडावी लागेल. त्याशिवाय होणार नाही. हे सगळे करण्यासाठी प्रशासनातील सुसंवाद महत्त्वाचा आहे. हा संवाद साधताना विद्यार्थी, कर्मचारी, अधिकारी आणि प्राध्यापक यातील प्रत्येकाच्या मताला मान-सन्मान कसा मिळेल याकडे लक्ष द्यावे लागेल. त्याशिवाय आपलेपणाची भावना निर्माण होणार नाही.

समाज एकाएकी बदलत नाही. त्यासाठी सर्वांचा सहभाग महत्त्वाचा आहे. गुलामीच्या मानसिकतेमुळे विषमता निर्माण होते. पाश्चात्त्य शिक्षण पद्धतीने ही गुलामीची पद्धती निर्माण केली. त्यामुळे स्वत:च्या विचाराने काम करावे लागेल. शाळा आणि घर या दोन्ही ठिकाणीच विवेकपूर्ण संस्कार होऊ शकतात.त्यासाठी ही ठिकाणे सक्षम असतील तर विद्यार्थी चांगले घडतील. 

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादStudentविद्यार्थीEducation Sectorशिक्षण क्षेत्रAurangabadऔरंगाबाद