शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने जिवाची मुंबई एका दिवसात नाहीच; प्रवाशांची दैना थांबवा, 'जनशताब्दी' जुन्या वेळेत सोडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 14:30 IST

Janshatabdi Express from Aurangabad: बदललेल्या वेळापत्रकाचा प्रवाशांना भुर्दंड, मुक्कामच करावा लागतो

- संतोष हिरेमठऔरंगाबाद : जनशताब्दी एक्स्प्रेसने पूर्वी मुंबईला गेल्यानंतर त्याच दिवशी इतर रेल्वेनेऔरंगाबादला परत येणे शक्य होत असे. कारण ही रेल्वे सकाळी ६ वाजता सुटून १ वाजेपर्यंत मुंबईत पोहोचत असे; मात्र कोरोना विळख्यात अचानक जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ बदलण्यात आली. त्यामुळे ही रेल्वे आता मुंबईला पोहोचेपर्यंत सायंकाळ होते. त्यामुळे मुंबईला मुक्काम करण्याची वेळ प्रवाशांवर ओढवत आहे. एका दिवसात जिवाची मुंबई करताच येत नसल्याची परिस्थिती आहे. (Janshatabdi Express from Aurangabad )

जनशताब्दी एक्स्प्रेस पूर्वी सकाळी ६ वाजता औरंगाबादहून सुटत असे. दुपारी १ वाजेपर्यंत मुंबईत ही रेल्वे पोहोचत असे. त्यामुळे मुंबईतील कामे आटोपून नंदीग्राम एक्स्प्रेस, देवगिरी एक्स्प्रेसने त्याच दिवशी परतीचा प्रवास प्रवाशांना करता येत असे; परंतु आता जनशताब्दी एक्स्प्रेसने मुंबईत गेल्यानंतर मुक्काम केल्याशिवाय पर्याय उरत नाही. कारण ही रेल्वे आता औरंगाबादहून ९.२० वाजता सुटते आणि दुपारी ४.२० वाजता मुंबईत पोहोचते. याचा व्यावसायिक, व्यापाऱ्यांना सर्वाधिक फटका बसत आहे.

९० टक्के प्रवासी बसतात औरंगाबादेतूूनजनशताब्दी एक्स्प्रेसने जालन्याहून जवळपास १० टक्के प्रवासी बसतात. या रेल्वेने प्रवास करणारे ९० टक्के प्रवासी औरंगाबादहून बसतात. त्यामुळे जालन्याहून येताना ही रेल्वे ९० टक्के रिकामी असते, ही रेल्वे जालन्याला नेऊन काय फायदा झाला, असे रेल्वे संघटनांचे म्हणणे आहे.

पूर्वीच्या वेळेनुसार सोडाजनशताब्दी एक्स्प्रेस ही सध्या दुपारी ४.२० वाजता मुंबईला पोहोचते. या वेळेत गेल्यानंतर कोणतेही काम करता येत नाही. मुक्कामच करावा लागतो. पूर्वी एका दिवसात मुंबईला ये-जा करता येत होते. त्यामुळे जनशताब्दी एक्स्प्रेसची वेळ पूर्वीसारखी केली पाहिजे.- ओमप्रकाश वर्मा, अध्यक्ष, मराठवाडा रेल्वे विकास समिती

प्रवाशांची दैना थांबवाजनशताब्दी एक्स्प्रेस जालना येथे नेल्याचा नाहक त्रास प्रवासी वर्गाला होत आहे. मुंबईला वेळेत पोहोचण्यासाठी धडपड लोकांना करावी लागत आहे. वेळेचे नियोजन चुकत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या औरंगाबादेतून जनशताब्दी एक्स्प्रेस जुन्या वेळापत्रकानुसार सोडून प्रवाशांची दैना थांबवावी.- विकीराजे पाटील, मराठवाडा रेल्वे विकास मंच

टॅग्स :railwayरेल्वेtourismपर्यटनAurangabadऔरंगाबाद